हार्डवेअरमधील खास आणि टॉप ब्रँड Apple ने त्याच्या iPhones, iPads, MacBooks आणि इतर उपकरणांवर भन्नाट सवलती आणि ऑफर देत आहे. ऍपलच्या इन्स्टंट सेव्हिंग ऑफरचा लाभ घेऊन ग्राहक Apple ऑनलाइन स्टोअरवर रु. 10,000 पर्यंत सूट मिळवू शकतात. ग्राहकांना ऍपल उत्पादन सवलतीच्या दरात मिळण्याची उत्तम संधी आहे. HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड असलेल्या ग्राहकांना निवडलेल्या उत्पादनांवर 10,000 रुपयांपर्यंत इन्स्टंट सवलत मिळेल आणि त्यांचे विद्यमान iPhones अपग्रेड करताना ते 12,000 रुपयांपर्यंत बचत देखील करू शकतात.
iPad 10 जनरेशच्या किमतीवर 3,000 रुपये, iPad Air च्या किमतीवर 4,000 रुपये आणि 12.9-इंचाच्या iPad Pro च्या किमतीवर 5,000 रुपये सूट ग्राहकांना मिळणार आहे. iPad 10 जनरेशनचे 64 GB वाय-फाय मॉडेल आता फक्त 41,900 रुपयांत या खर्च करता येणार आहे. iPad Air 64GB Wi-Fi फक्त मॉडेलची किंमत 55,900 रुपये आणि iPad Pro 12.9-इंच वाय-फाय मॉडेलची किंमत अनुक्रमे 1,07,900 रुपये इतकी असणार आहे. लक्षात ठेवा की फक्त HDFC बँक क्रेडिट कार्डधारक ग्राहकच या सवलतीसाठी पात्र असणार आहेत.
Apple iPad 10th Gen, iPad Air, iPad Pro 12.9-इंच आणि MacBook Air M2 चिप वर अनुक्रमे रु. 3000, रु. 4000, रु. 5000, आणि 10,000 इन्स्टंट सूट ग्राहक मिळवू शकतात. कंपनी iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro Max वर 7000 रुपयांची सूट देखील देते आहे.
केवळ आयफोनच नाही तर स्मार्ट वॉच आणि एअर पॉड्स खरेदीवर देखील ग्राहकांना मेगा सवलत मिळते आहे. AirPods pro (2nd Gen), Apple वॉच सीरीज 8 आणि Apple वॉच अल्ट्रा वर अनुक्रमे रुपये 2000, रुपये 4000 आणि 5000 रुपये सवलत ग्राहकांना मिळणार आहेत. तेव्हा स्टॉक संपण्याआधी या ऑफरचा फायदा घ्या आणि तुमचे पैसे वाचवा!