Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सोडणाऱ्या मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी 'Kotak Kanya Scholarship Scheme 2022'

Kotak Kanya Scholarship Scheme 2022

Kotak Kanya Scholarship Scheme 2022: कोटक एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे 1,00,000 रुपयांची शिष्यवृत्ती विद्यार्थिनींना दिली जात आहे.

Kotak Kanya Scholarship Scheme 2022: कुटुंबातील आर्थिक अडचणींमुळे बऱ्याच वेळा मुलींना शिक्षण(Education) सोडावे लागते. म्हणूनच कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या(Kotak Education Foundation) वतीने  विशेषतः मुलींच्या शैक्षणिक पात्रतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोटक कन्या शिष्यवृत्ती योजना(Kotak Kanya Scholarship Scheme) सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत (Scheme) विद्यार्थिनींना लाभ दिला जाणार आहे. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून विद्यार्थिनींना कोटक एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे 1,00,000 रुपयांची शिष्यवृत्ती रक्कम दिली जाईल.

'Kotak Kanya Scholarship 2022' योजनेसाठीची पात्रता  

  • संपूर्ण भारतातील विद्यार्थिनींसाठी खुली  
  • अभियांत्रिकी(Engineering), एमबीबीएस(MBBS), आर्किटेक्चर(Architecture), डिझाईन, इंटिग्रेटेड एलएलबी(Integrated LLB), इत्यादी व्यावसायिक पदवी
  • अभ्यासक्रमांसाठी नामांकित संस्थांमधून (NAAC मान्यताप्राप्त / NIRF रँक) पहिल्या वर्षाच्या अंडरग्रेजुएट प्रोग्राममध्ये प्रवेश मिळवलेल्या गुणवंत मुली यासाठी पात्र आहेत 
  • बारावी बोर्डाच्या परीक्षेत अर्जदारांनी 85% किंवा त्याहून अधिक गुण किंवा समतुल्य  CGPA मिळवलेले असतील तर त्याही विद्यार्थिनी पात्र आहेत
  • अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न  3,20,000 (रुपये तीन लाख वीस हजार) रुपये  किंवा त्यापेक्षा कमी असावे
  • कोटक महिंद्रा ग्रुप(Kotak Mahindra Group), एज्युकेशन फाउंडेशन(Education Foundation) आणि बडी फोर स्टडीच्या(Buddy Four Study) कर्मचाऱ्यांची मुले या योजनेसाठी अर्ज करू शकत नाहीत

'Kotak Kanya Scholarship 2022' साठी अर्ज कसा कराल?

  • कोटक कन्या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यासाठी या वेबसाईटला भेट द्या  
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी Buddy4Study च्या पेजवर ईमेल/मोबाईलच्या मदतीने नोंदणी करा 
  • त्यानंतर तुम्ही ‘कोटक कन्या शिष्यवृत्ती 2022('Kotak Kanya Scholarship 2022')’ अर्ज फॉर्मच्या पेजवर पोहचाल
  • अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी ‘Start Application’ या बटणावर क्लिक करा
  • ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्जामध्ये आवश्यक तो तपशील भरा आणि सांगण्यात आलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  • नियम व अटी स्वीकारा आणि Preview बटनावर क्लिक करा
  • अर्जदाराने भरलेले सर्व तपशील Preview स्क्रीनवर योग्यरित्या दिसत असल्यास, अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 'सबमिट(Submit)' बटणावर क्लिक करा

कोटक कन्या शिष्यवृत्ती अंतर्गत मिळणारे फायदे

  • शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थिनीला व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम/ पदवी पूर्ण होईपर्यंत 1.5 लाख रुपये प्रतिवर्ष दिले जातील
  • कोटक कन्या शिष्यवृत्ती (Kotak Kanya Scholarship) 2022 शिष्यवृत्तीची रक्कम फक्त शैक्षणिक खर्चासाठी वापरली जाऊ शकते
  • यामध्ये इंटरनेट(internet), लॅपटॉप(laptop), पुस्तके(books) आणि स्टेशनरीचा(stationery) समावेश करण्यात आला आहे