जगभरात 23 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून पाळला जातो. संयुक्त राष्ट्रारे विधवा महिलांच्या समस्यांची सर्वांना जाणीव व्हावी, त्यांना गरीबी व अन्यायातून बाहेर काढण्यासाठी हा दिवस पाळला जातो. अनेकदा घरातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाल्यास महिलांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यांना आर्थिक मदत व्हावी व गरिबीतून बाहेर काढण्यासाठी सरकारद्वारे वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. महाराष्ट्रासह इतर राज्यांद्वारे राबवल्या जाणाऱ्या अशाच काही योजनांबाबत जाणून घेऊया.
हे देखील वाचा - Widow Pension Scheme: : जाणून घ्या पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज करण्याची पद्धत!
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
महाराष्ट्र सरकारद्वारे विधवा महिलांसाठी ही योजना राबवली जाते. केंद्र पुरस्कृत या योजनेचा लाभ 40 ते 65 वयोगटातील विधवा महिला घेऊ शकतात. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेंतर्गत महिलांना दरमहिन्याला एकूण 600 रुपये मिळतात. यामध्ये केंद्र सरकारद्वारे 200 रुपये, तर राज्य सरकारद्वारे 400 रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळील तलाठी कार्यालयात जाऊन अर्ज करता येतो.
हे देखील वाचा - Monthly Aid Scheme : तामिळनाडूतील महिलांना 1000 रुपयांचे अर्थसहाय्य; विनाकपात बँकेकडून मिळणार पूर्ण रक्कम
तामिळनाडू सरकारची विधवा महिलांसाठीची योजना
तामिळनाडू सरकारकडून देखील विधवा महिलांसाठी Magalir Urimai Thittam योजना राबवली जाते. या अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहिन्याला 1 हजार रुपये सरकारद्वारे जमा केले जातात. राज्यातील जवळपास 1 कोटींपेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. अल्पभूधारक, अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या 21 वर्षांवरील पात्र महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. विधवा महिलांना अर्थसहाय्य मिळावे, हा या योजने मागचा उद्देश आहे.
हे देखील वाचा - Widow Pension Scheme : महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. या योजनेंतर्गत पात्र व्यक्तींना 20 हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाल्यास ही रक्कम दिले जाते. दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील 18 ते59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास घरातील इतर सदस्यांना ही रक्कम मिळते. पात्र व्यक्ती जवळील तहसील अथवा तलाठी कार्यालयात जाऊन यासाठी अर्ज करू शकतात.
हे देखील वाचा - विधवा महिलांसाठी सरकारच्या आर्थिक साहाय्य योजना!
पात्रता आणि कागदपत्रे
प्रत्येक योजनेनुसार पात्रता वेगवेगळी आहे. प्रामुख्याने दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील विधवा महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. कुटुंबाची वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असायला हवे. तसेच, काही योजनांचा लाभ घेण्यासाठी वयाची अट देखील आहे. या योजनांचा फायदा घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, त्याची यादी पुढे दिली आहे.
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवासी दाखला
- बँक पासबूक
- पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
- उत्पन्न दाखला