Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Education Loan : शैक्षणिक कर्जासाठी कसा अर्ज कराल, किती आहे व्याज दर?

Educational Loan

Education Loan: शिक्षणाचे खर्च दिवसें दिवस वाढत चालले आहेत. अशावेळी भारतात बँका आता सर्रास शैक्षणिक कर्जं द्यायला लागल्या आहेत. आणि त्याचा लाभ घेऊन आपलं उच्च शिक्षण स्वत:च्या हिकमतीवर पूर्ण करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. आपणही जाणून घेऊया शैक्षणिक कर्जं कसं मिळवायचं? त्याची प्रक्रिया काय? आणि महत्त्वाचं म्हणजे व्याज दर काय आहेत?

भारतात बारावीपर्यंतचं शिक्षण अजूनही रास्त दरात घेता येतं. निदान सरकारी किंवा अनुदान प्राप्त शाळांमध्ये कमी पैशात शिक्षण घेता येतं. पण, पुढच्या शिक्षणासाठी सरकारी कॉलेजमध्ये जागा कमी असतात. आणि कुठल्याही स्तरावर खाजगी संस्थांमध्ये शिक्षण घ्यायचं झालं तर खर्च लाखांच्या घरात आहे.

अशावेळी तुमच्या मदतीला येतात शैक्षणिक कर्ज देणाऱ्या बँका आणि वित्तीय संस्था. बऱ्याच वेळा गुणवत्ता असूनही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणं हे केवळ अतिरिक्त फीमुळे आणि आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे घेता येत नाही. अनेकजण हा उच्च शिक्षणाचा निधी उभा करण्यासाठी घरातील सोनं विकतात. अशी परिस्थिती प्रत्येकावर येऊ नये म्हणून भारत सरकारकडून शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज (Education Loan) उपलब्ध करून देण्यात येतं. देशातील अनेक सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये (Govt & Private Banks) ही सुविधा देण्यात येते.

शैक्षणिक कर्ज हे प्रामुख्याने बारावीनंतरच्या उच्च शिक्षणासाठी घेतलं जातं. देशात किंवा आंतरराष्ट्रीय शिक्षणासाठीही (International Education) तुम्हाला कर्ज मिळू शकतं. विद्यार्थाने कुठल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलाय आणि कुठलं महाविद्यालय मिळवलंय याचा विचार करून तुम्हाला मिळणाऱ्या कर्जाची रक्कम ठरते.

कर्ज घेताना आपल्यालाही परतफेडीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. शैक्षणिक कर्जाची वैशिष्ट्ये , फायदे, बाजारातील कर्जाची मागणी कशी आहे आणि सध्या बँकांमधील शैक्षणिक कर्जावरील व्याजदर हे सगळं या लेखात जाणून घेऊया…

शैक्षणिक कर्जाची वैशिष्ट्ये

18 ते 35 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती परदेशातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज घेऊ शकते. व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वैद्यकीय, कला, आर्किटेक्चर, वैज्ञानिक शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट आणि इतर क्षेत्रातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी तसेच व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठीही कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

शैक्षणिक कर्जा अंतर्गत ट्यूशन फी, परीक्षा फी, लॅब आणि लायब्ररी फी, प्रवास, पुस्तके आणि उपकरणे, प्रोजेक्ट आणि स्टडी टूर यासारखा खर्च यामध्ये समाविष्ट करण्यात येतो. परदेशी अभ्यासासाठी घेतलेल्या कर्जासाठी कर्जदारांना 5% ते 15% पर्यंत मार्जिन द्यावे लागेल.

शैक्षणिक कर्जाची परतफेड मासिक हप्त्यांमध्ये किंवा बँकेला पोस्ट-डेट चेकद्वारे केली जाऊ शकते. साधारणपणे, बँका अधिस्थगन कालावधीसह (moratorium period), सात वर्षांपर्यंतच्या कालावधीसोबत शैक्षणिक कर्ज मंजूर करतात.

पूर्णवेळ अभ्यासक्रमांसाठी घेतलेल्या शैक्षणिक कर्जासाठी सह-अर्जदाराची निवड करावी लागेल. सह-अर्जदारांमध्ये भावंड, जोडीदार, पालक किंवा कुटुंबातील इतर सदस्यांचा समावेश असू शकतो.

बँका जास्तीत जास्त अधिस्थगन कालावधीसह (With Moratorium Period) 20 लाख आणि कमाल अधिस्थगन कालावधीशिवाय (Without Moratorium Period) कर्जासाठी 10 लाख रक्कम देते. 4 लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जासाठी, काही बँकांमध्ये कोणत्याही तारणाची गरज लागत नाही. विशेष म्हणजे इतर कोणत्याही तारणाशिवाय 7.5 लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्ध होते. 7.5 लाखांवरील कर्जासाठी सुरक्षा आवश्यक असते.

शैक्षणिक कर्जाचे फायदे जाणून घ्या

सर्वांसाठी कर्ज उपलब्ध: कोणताही विद्यार्थी ज्याला शिक्षण घ्यायचे आहे तो शैक्षणिक कर्जासाठी अर्ज करू शकतो. समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटक या अंतर्गत उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करू शकतात.

सर्व अभ्यासक्रमांसाठी लागू: शैक्षणिक कर्जाचा वापर हा सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमासाठी जसे की, पदवी, पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रम यासाठी करता येतो. भारतात किंवा परदेशात शिक्षण घेण्यासाठी हे कर्ज वापरता येते.

सहज उपलब्ध: शैक्षणिक कर्ज मोठ्या प्रमाणावर आणि सहज उपलब्ध आहे. खरं तर, ते RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व बँकांमध्ये उपलब्ध करून देण्यात येते.

Benefits of Educational Loan

वेगवेगळी कर्जाची रक्कम: भारतात शिक्षण घेण्यासाठी बँकेकडून 2 लाख ते 22 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते. अर्थात, कर्जाचा आकार अर्ज केलेल्या कोर्सवर अवलंबून असतो. परदेशात शिक्षण घेण्यासाठी कर्जाची रक्कम 20 लाखांपर्यंत जाते.

शिक्षण पूर्ण होण्यास मदत: वाढती महागाई आणि बदलत्या किमती यामुळे शिक्षणाचा खर्चही वाढत चालला आहे. गुणवत्ता असतानाही केवळ आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अभ्यासात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी शैक्षणिक कर्ज मदत करते.

एकाच कर्जात अनेक गोष्टी कव्हर: शैक्षणिक कर्जा अंतर्गत ट्यूशन फी, परीक्षा फी, हॉस्टेलचे चार्जेस, लॅब आणि लायब्ररी फी, प्रवास, पुस्तके आणि उपकरणे, प्रोजेक्ट आणि स्टडी टूर यासारखा खर्च समाविष्ट करण्यात आला आहे. याशिवाय महिला विद्यार्थ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते

सहज परतफेड: शैक्षणिक कर्जाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे कर्जाची रक्कम त्वरित फेडण्याची गरज नाही. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर परतफेडीचा कालावधी पाच ते सात वर्षांपर्यंत वाढू शकतो. त्यामुळे परतफेड करणे सहज सोपे होते.

शैक्षणिक कर्जाची वाढती मागणी

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या (PSBs) अहवालानुसार, गेल्या 10 वर्षांत एकूण 4,61,017 विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज घेतले, अशी माहिती वित्त मंत्रालयाने सोमवारी लोकसभेत दिली. त्यापैकी 42,364 विद्यार्थ्यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेतले आहे.

संसदेत सामायिक केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 10 वर्षांत शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 2012-13 मध्ये एकूण 22,200 विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज वाटप करण्यात आले आणि 2020 पर्यंत ही संख्या वाढतच गेल्याचे पाहायला मिळाले.

कोविड महामारीच्या वर्षांत 56,930 विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्जाचा लाभ घेतला, जो 2019 मधील विद्यार्थ्यांपेक्षा खूपच कमी होता. 2021 मध्ये 69,898 विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्जाचा लाभ घेतल्याचे अहवालातून समोर आले आहे.

शैक्षणिक कर्ज मिळवण्यासाठी काय करावं

  • या योजनेअंतर्गत, अर्जदार कोणत्याही सरकारी किंवा प्रायवेट बँकेच्या शाखेला भेट देऊन अर्ज करू शकतो 
  • तुम्ही बँक अधिकाऱ्यांना भेटा आणि योजनेशी संबंधित माहिती मिळवून अर्ज करा 
  • तुम्ही अर्जातील संपूर्ण माहिती भरून बँकेला सबमिट करू शकता
  • अर्ज पडताळणीनंतर पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देण्यात येते 
  • या योजनेंतर्गत केंद्र सरकारने शैक्षणिक कर्जावरील व्याज अनुदान सुरू केले आहे 
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला बँकेच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल 
  • वेबसाईटवर गेल्यानंतर लोन या पर्यायावर क्लिक करावे लागेल 
  • या अंतर्गत शैक्षणिक कर्ज हा पर्याय निवडून आवश्यक माहिती भरा 
  • विचारण्यात आलेली कागदपत्रे जोडा आणि सबमिट करा
  • कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली की बँक तुम्हाला कॉल करेल  

बँकेच्या शैक्षणिक कर्जावरील व्याजदर आणि प्रक्रिया शुल्क

सध्या प्रत्येक शासकीय आणि खाजगी बँकेमध्ये शैक्षणिक कर्ज उपलब्ध आहे. प्रत्येक बँकेनुसार शैक्षणिक कर्जावरील व्याजदर आणि प्रक्रिया शुल्क हे वेगवेगळे आहेत. www.bankbazaar.com या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आपण अॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, एचडीएफसी बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) शैक्षणिक कर्जांवरी व्याजदर आणि प्रकिया शुल्क खालील तक्त्याच्या मदतीने जाणून घेऊयात. 

अॅक्सिस बँकेच्या शैक्षणिक कर्जावरील व्याजदर

Axis Bank of Educational Loan

बँक ऑफ बडोदा बँकेच्या शैक्षणिक कर्जावरील व्याजदर 

Bank of Baroda Educational Loan

कॅनरा बँकेच्या शैक्षणिक कर्जावरील व्याजदर

Canara Bank Educational Loan

एचडीएफसी बँकेच्या शैक्षणिक कर्जावरील व्याजदर

HDFC Bank Educational Loan

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) बँकेच्या शैक्षणिक कर्जावरील व्याजदर

SBI of Educational Loan

शैक्षणिक कर्जाची प्रक्रिया सुटसुटीत आणि तिथल्या तिथे पूर्ण होणारी आहे. म्हणजे बँकेला एकदा भेट दिल्यावर आणि प्रक्रिया पूर्ण केल्यावर काही वेळातच तुमच्या खात्यात कर्जाचे पैसे जमा होतात. पण, काही वेळा कर्जाच्या परतफेडीची हमी बँकेला वाटली नाही तर ते कर्ज नाकारूही शकतात. अशावेळी गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला घ्या.