Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Education Loan: शैक्षणिक कर्ज घेणे ही चांगली कल्पना आहे?

Education Loan

Education Loan: वाढत्या महागाईमुळे शिक्षण घेणे कठीण झाले. कित्येक विद्यार्थ्यांना पैश्याअभावी शिक्षण सोडावे लागते. अशात शैक्षणिक कर्ज घेणे ही कल्पना योग्य की अयोग्य याबाबत जाणून घ्या या लेखातून.

 Education Loan: वाढत्या महागाईमुळे शिक्षण घेणे कठीण झाले. कित्येक विद्यार्थ्यांना पैश्याअभावी शिक्षण सोडावे लागते. यावर उपाय म्हणून सरकारने अनेक स्कॉलरशिप आणि शैक्षणिक कर्ज योजना सुरू केल्या आहेत. त्याआधारे विद्यार्थी शिक्षण घेतील आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी करून ते कर्ज आरामात फेडू शकतील या उद्देश्याने शैक्षणिक कर्ज ही योजना सुरू करण्यात आली. शैक्षणिक कर्ज घेणे ही कल्पना चांगली की वाईट(Taking an education loan is a good or bad idea) याबाबत विचार केला तर शैक्षणिक कर्ज हे चांगल्या कर्जात मोडते. तरीही कर्ज हे कर्ज असते, ती आपली देयता असते आणि त्यावर व्याज सुद्धा असते, म्हणून कर्ज घेण्याआधी कोणकोणत्या गोष्टीचा विचार करावा ते जाणून घेऊया. पुढील गोष्टींचा विचार करून कर्ज घ्यावे. 

गरज (The Need)

वाढत्या महागाईमुळे शिक्षण घेणे अतिशय कठीण झाले आहे. परंतु, काही विद्यार्थ्यांचे जीवन शिक्षणावर अवलंबून असते, शिक्षणाशिवाय त्यांना पर्याय नसतो. सर्वात महत्वाचे म्हणजे पैसा सुद्धा नसतो. त्यावेळी मग शैक्षणिक कर्ज घेण्याशिवाय पर्याय नसतो. तरीही कर्ज घेण्याआधी शासनाच्या विविध योजना जाणून घ्याव्यात. काही मार्ग निघत असेल तर तुम्हाला शैक्षणिक कर्ज घेण्याची गरज पडणार नाही. 

नोकरीची शक्यता (Job Prospects)

 तुम्ही जर असा काही कोर्स करत असाल ज्यातून तुम्हाला नोकरी लागण्याची 100% गॅरंटी आहे तर तुम्हाला शैक्षणिक कर्ज घेताना विचार करावा लागणार नाही. तुम्ही निसंकोचपणे कर्ज घेऊ शकता. 

 व्याज (Interest)

कर्ज म्हटल की त्यामागे व्याज तर असतेच. शैक्षणिक कर्ज घेताना सर्वात आधी घेतलेल्या कर्जावर व्याजचा दर किती लागतो याची माहिती घ्यावी. कारण तुम्ही कर्ज घेतल्यानंतर ती रक्कम व्याजासह वाढत जाते. त्यामुळे ते परत करताना तुम्हाला त्रास जाऊ शकतो. 

 बँक (Bank)

सरकारने प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना सुरू केली आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना पोर्टलद्वारे 13 बँकांकडून विविध प्रकारचे कर्ज मिळू शकते. त्यामुळे बँक कोणती निवडायची ते तुमच्या हातात आहे. तुम्ही आधी व्यवहार केलेल्या बँक मधूनच कर्ज घेणे तुमच्यासाठी योग्य राहील. 

कर्जाच्या अटी व शर्ती (Loan terms and conditions)

कर्जासाठी अर्ज करताना कर्जावरील सर्व अटी व शर्ती जाणून घेणे गरजेचे आहे. तुम्हाला लागणारी कर्जाची रक्कम पाहून त्यावर अटी व शर्ती असतात. सरकारी बँकेकडूनच कर्ज घेणे योग्य. अटी व शर्ती जर तुमच्या लाइनच्या बाहेर असतील तर कर्ज घेणे टाळा. 

सुरक्षा ठेव (Security Deposit)

तुम्ही 4 लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जासाठी अर्ज केल्यास, तुम्हाला हे कर्ज तुमच्या पालकांसह संयुक्तपणे मिळेल. आणि यासाठी कोणतीही सुरक्षा ठेव आवश्यक नाही. पण जर तुम्ही 4 लाख ते 6.5 लाख रुपये कर्ज घेत असाल तर तुम्हाला थर्ड पर्सन गॅरंटी द्यावी लागेल. आणि जर विद्यार्थ्याच्या कर्जाची रक्कम 6.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर बँक कोणत्याही मालमत्तेचे तारण मागू शकते. या सर्व बाबींचा विचार करूनच कर्ज घ्या.