Maruti vs Toyota मध्ये स्पर्धा बघायला मिळते. याचे कारण म्हणजे या दोन्ही कार सारख्याच आहेत. यातले फीचर्स सारखे आहेत. या दोघांची काय वैशिष्ट्ये आहेत ते जाणून घेऊया.
यामध्ये मेकॅनिकल, प्लॅटफॉर्म तसेच फीचर्स साधारणपणे सारखे आहेत. गेल्या काही दिवसांपासून मारुती सुझुकीची ग्रँड विटारा चर्चेत असलेली दिसते. ग्रँड विटारा ही कार मारुतीची सर्वात महागडी म्हणून ओळखली जाते. या कारसाठी मजबूत हायब्रीड तंत्रज्ञान वापरण्यात आलेले आहे. मारुती सुझुकीची ही suv साधारणत: 28 किलोमीटरपर्यंत मायलेज देते.
आणखी एक SUV ची अशा प्रकारची ओळख बनलेली आहे. ही suv देखील स्ट्रॉंग हायब्रीड टेकनोलॉजीने यूक्त आहे. ही कारसुद्धा जवळपास 28 किमीपर्यंत मायलेज देते. ही कार आहे, टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर. या दोन्ही कार जवळपास सारख्याच दिसून येतात. यात मेकॅनिकल, प्लॅटफॉर्म तसेच फीचर्स साधारणपणे सारखे असल्याने Maruti vs Toyota या सारख्याच वाटतात.
मारुती सुझुकी ग्रँड विटाराची विक्री अधिक होताना दिसत आहे. स्ट्रॉंग हायब्रीड टेकनोलॉजी हा हीच्या विक्रीतील महत्वाचा घटक मानला जातो. मारुती सुझुकीने 2022 च्या नोव्हेंबरमध्ये ग्रँड विटारा या एसयूव्हीच्या 4 हजार 433 युनिट्सची विक्री केलेली आहे. टोयोटा मात्र केवळ 3 हजार 116 युनिट्सचीच विक्री करू शकली आहे.
ग्रँड विटारा आणि हायरायडर या दोन्ही दोन-दोन पॉवरट्रेन ऑप्शनसह उपलब्ध असलेल्या दिसून येतात. या दोन्ही कारला 1.5 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलेले आहे.
मारुती सुझुकी ग्रँड विटाराची शोरूम प्राइज 10.45 लाख रुपयापासून ते 19.49 लाख रुपयापर्यंत जाताना दिसते. त्याचप्रमाणे टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडरची शोरूम प्राइज 10.48 लाख रुपये ते 18.99 लाख रुपयापर्यंत जाते.