Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Disadvantages of SCSS : ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करताय? फायद्याप्रमाणे तोटेही जाणून घ्या...

Disadvantages of SCSS : ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करताय? फायद्याप्रमाणे तोटेही जाणून घ्या...

Disadvantages of SCSS : ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी बचतीची एक चांगली योजना आहे. मात्र फायद्याप्रमाणे या योजनेचे काही तोटेदेखील आहेत. हे तोटे किंवा या योजनेच्या संदर्भातल्या काही मर्यादा बँकेत किंवा पोस्ट ऑफीसमध्ये पैसे गुंतवण्याच्या आधीच माहीत असायला हव्या.

व्याजावर टीडीएस 

पीपीएफ (Public Provident Fund) यासारख्या योजनांमध्ये सर्वकाही करमुक्त असतं. दुसरीकडे एससीएसएस (Senior Citizen Savings Scheme) ठेवींमधून मिळणारं व्याज आर्थिक वर्षात 50,000 रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त झालं तर त्यावर कर लागतो. म्हणजेच ते करपात्र होतं. सध्या या योजनेमधली ठेव मर्यादा 30 लाख रुपये आहे. ही रक्कम गुंतवल्यास तिमाही व्याज 61,500 आणि वार्षिक व्याज 2.46.000 (8.2 टक्के)असणार आहे. आता ही रक्कम 50,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यानं विशिष्ट दरानं टीडीएस कापला जाणार आहे. खातेदारानं 15G/15H हा फॉर्म सबमिट केला आणि जमा झालेलं व्याज 50,000 रुपयांपेक्षा जास्त नसेल तर टीडीएस लावला जाणार नाही.

स्थिर व्याज दर

व्याजदर स्थिर आहे. सध्याच्या 8.2 टक्के व्याजदरामुळे खातेधारकांसाठी हा एक गुंतवणुकीचा चांगला पर्याय ज्येष्ठ नागरिकांसमोर उपलब्ध आहे. मात्र ज्यांनी आधीच्या कमी दरातच खातं उखडलं असेल त्यांच्यासाठी मात्र ही नुकसानकारक बाब आहे. सध्याच्या जास्तीच्या दराचा फायदा घेण्यासाठी जुनं खातं बंद करू शकतात तसंच नवं खातं उघडू शकतात. मात्र ज्येष्ठ नागरिक बचत योजना खातं वेळेपूर्वी बंद केल्यानं शुल्क आकारणी केली जाते.

कसं ते समजून घेऊ...  
समजा तुम्ही एससीएसएस खातं एका वर्षापूर्वी बंद केलं असेल तर कोणतंही व्याज दिलं जाणार नाही. जर समजा तुम्हाला आधीच व्याज मिळालं असेल, तर ते खातं उघडण्याच्या तारखेपासून 

  • - 1 वर्ष पूर्ण होण्याआधी मुदतपूर्व बंद होण्याच्या मूळ रकमेतून वजा केलं जाणार आहे. 
  • - जर तुम्ही खाते 1 वर्षानंतर मात्र उघडण्याच्या तारखेपासून 2 वर्षापूर्वी बंद केलं तर मूळ रकमेतून 1.5 टक्के इतकी रक्कम वजा होईल. 
  • - 2 वर्षांनंतर आणि 5 वर्षापूर्वी मुदतपूर्व बंद झाल्यास मूळ रकमेतून 1 टक्के रक्कम वजा केली जाईल.

दावा न केलेल्या व्याज उत्पन्नावर कोणतेही व्याज नाही

ज्येष्ठ नागरिक बचत योजना नियम 2019नुसार, एससीएसएस खातं असणाऱ्यांना त्याच्या प्रत्येक तिमाहीमध्ये आपल्या व्याज उत्पन्नावर दावा करावा लागतो. जर प्रत्येक तिमाहीत देय व्याजाचा दावा नाही तेली तर अशा रकमेवर कोणतंही अतिरिक्त व्याज मिळत नाही. जर प्रत्येक तिमाहीत देय व्याजावर खातेधारकानं दावा केला नसेल तर अशा व्याजावर कोणतंही अतिरिक्त व्याज मिळणार नाही, ही एक या योजनेची मर्यादा आहे.

वयोमर्यादा

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचं खातं उघडण्याची सुविधा केवळ 60 वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच उपलब्ध आहे. मात्र खासगी क्षेत्रातल्या एखाद्या कर्मचाऱ्याला वय वर्ष 60च्या आधी निवृत्त व्हायचं असेल आणि या योजनेत खातं उघडायचं असेल तर त्याला तसं करण्याची मुभा मात्र या योजनेत नाही.

निश्चित कालावधी 

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत केलेल्या गुंतवणुकीसाठी 5 वर्षांचा लॉक-इन पिरियड असतो. त्यात आणखी 3 वर्षांनी वाढ केली जाऊ शकते. लॉक-इन पिरियडमुळे काही ठेवीदारांना त्यांच्या उद्दिष्टांनुसार योजना करणं कठीण जाऊ शकते. तसंच ज्यांना फक्त 2-3 वर्षांसाठी गुंतवणूक करायचीय, पुढे काही गुंतवणूकदारांना लॉक-इन पिरियडमुळे आणि मुदतीपूर्वी पैसे काढण्यावर ठरवलेल्या दंडामुळे तरलतेच्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

एकूणच काय तर ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही एक चांगली गुंतवणूक योजना आहे. जे या योजनेसाठी पात्र आहेत, त्यांना हवी व्याज किंवा उत्तम परतावा मिळू शकतो. सध्या 8.2 टक्क्यांचा व्याज दर हा इतर योजनेपेक्षा तसंच बँकांच्या 5 वर्षांच्या एफडी योजनेपेक्षा जास्तच आहे. त्यामुळे ही योजना सरस ठरते. वर्षभरात 1.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक 80C अंतर्गत वजावटीसाठी पात्र ठरते. निवृत्तीनंतर त्रैमासिक व्याज उत्पन्नासह ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र गुंतवणूक करण्यापूर्वी वरील सर्व मुद्देदेखील काळजीपूर्वक तपासायला हवेत.