SCSS Investment: ज्येष्ठ नागरिकांसाठी सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीमधील (Senior Citizen Savings Scheme) गुंतवणुकीतून महिना 40 हजार रुपये कमावण्याची संधी मिळू शकते. निवृत्तीनंतरचे आयुष्य जर सुखात जगायचे असेल तर आतापासून गुंतवणुकीचा विचार करायला हवा. अन्यथा उतारवयात अडणी येऊ शकतात. तसेच निवृत्तीनंतर गुंतवणुकीची जोखीम घेण्याची क्षमताही कमी असते. त्यामुळे सुरक्षित कमी जोखीम असेलेला गुंतवणुकीचा पर्याय फायद्याचा ठरू शकतो.
बजेट 2023 मध्ये Senior Citizen Savings Scheme मधील गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. या योजनमध्ये वैयक्तिक किंवा कपलसाठी आधी 15 लाख रुपयांची मर्यादा होती. ती वाढवून आता 30 लाख केली आहे. त्यामुळे निवृत्त झाल्यानंतर पती पत्नी मिळून प्रत्येक तीन लाख रुपये या योजनेत गुंतवू शकतात. सध्या या योजनेवर 8% व्याजदर दिला जातो. जर पती पत्नीने निवृत्तीनंतर प्रत्येकी तीस लाख रुपये गुंतवले तर महिना 40 हजार रुपये व्याज मिळू शकते. यातून सर्व खर्च भागवता येऊ शकतात.
2023 बजेटनुसार गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्यात आली असून 1 एप्रिलपासून लागू होईल. त्यामुळे 1 एप्रिलनंतर जे या योजनेत गुंतवणूक करतील त्यांना जास्त रक्कम गुंतवण्याची संधी मिळेल. याबाबत अद्याप फक्त बजेटमध्ये घोषणा झाली असून सविस्तर नोटिफिकेश जाहीर झाले नाही.
गुंतवणुकीची रक्कम | मासिक व्याज (Rs)* | तिमाही व्याज (Rs)* | वार्षिक व्याज (Rs) | पाच वर्षांचे व्याज (Rs) |
100000 | 665 | 2000 | 8000 | 40000 |
300000 | 2000 | 6000 | 24000 | 120000 |
500000 | 3333 | 10000 | 40000 | 200000 |
1000000 | 6667 | 20000 | 80000 | 400000 |
1500000 | 10000 | 30000 | 120000 | 600000 |
2000000 | 13333 | 40000 | 160000 | 800000 |
2500000 | 16667 | 50000 | 200000 | 1000000 |
3000000 | 20000 | 60000 | 240000 | 1200000 |
सिंगल खात्यामधील गुंतवणुकीची रक्कम गृहित धरुन 8% व्याजदराने कॅलक्यूलेशन केले आहे.
SCSS अकाउंट कसे सुरू करावे (How to open SCSS account)
भारतीय पोस्टच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार 60 वर्षांवरील कोणताही व्यक्ती SCSS खाते सुरू करू शकतो. 55 वर्षांवरील आणि 60 वर्षांखालील सिव्हिलीयन कर्मचारी खाते सुरू करू शकतो. तसेच संरक्षण खात्यातील 50 वर्षांवरील आणि 60 वर्षांपेक्षा कमी वयाचा निवृत्त कर्मचारी SCSS खाते काढू शकतो. वैयक्तिक किंवा जॉइंट खाते सुरू करण्याचा पर्यायही यामध्ये उपलब्ध आहे.
SCSS खात्याला पाच वर्षाची कालमर्यादा आहे. म्हणजेच पाच वर्षांपर्यंत पैसे गुंतवू शकतो. तसेच 3 वर्षांनी कालमर्यादा वाढवताही येऊ शकते. गुंतवणुकीतून मिळालेले व्याज दर तीन महिन्यांनी काढू शकतो. 8 टक्के दराने 30 लाखांच्या गुंतवणुकीवर तीन महिन्यांनी 60 हजार रुपये व्याज मिळू शकते. म्हणजेच मासिक 20 हजार रुपये. जर वृद्ध दाम्पत्याने मिळून प्रत्येक 30 लाख गुंतवणूक केली तर महिना 40 हजार रुपये व्याज मिळू शकते.
SCSS या योजनेचे व्याजदर सरकारकडून दर तीन महिन्यांनी अपडेट केले जातात. सध्या लागू असलेला दर पुढील पाच वर्ष तेवढाच राहील याची हमी देता येत नाही. गुंतवणूक कालावधीत हा दर वाढूही शकतो. तसेच खालीही येऊ शकतो.