Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Vande Bharat Train: जाणून घ्या, वंदे भारत ट्रेन कशी व कुठे बनली?

Vande Bharat Train

Image Source : http://avenuemail.in/

Train made with Indigenous Technology: भारतातीतल एकमेव इंजिन नसलेली सेमी हायस्पीड ट्रेन म्हणून 'वंदे भारत ट्रेन' कडे बघितले जाते. ही ट्रेन पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने बनली आहे. या ट्रेनची निर्मिती कशी झाली, हे जाणून घेऊयात.

Vande Bharat Express: भारतात पहिल्यांदा सेमी हायस्पीड असलेली स्वदेशी तंत्रज्ञानाने बनलेली ‘वंदे भारत एक्सप्रेस’ लाँच झाली आहे. ही ट्रेन आल्यापासून सातत्याने चर्चेत आहे. या ट्रेनमध्ये काय खास आहे, ती कशी बनली, कुठे धावते हे पाहुयात. 

ही ट्रेन कुठे तयार केली? (Where was this Train Made)

160 किमी प्रतितास वेगाने ही ट्रेन धावते. या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. सध्या ही ट्रेन एकूण 7 मार्गांवर धावते. ही ट्रेन चेन्नईच्या ‘इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी’ (ICF) मध्ये तयार करण्यात आली आहे. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत अशा 75 ट्रेन बनविणार असल्याचे नियोजन आहे. 

कशी तयारी केली? (How did Prepare)

आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देणारी ही वंदे भारत ट्रेन आहे. आम्ही अशी ट्रेन तयार करण्याचे नियोजन अनेक दिवसांपासून करीत होतो. 2016 च्या अखेरीस ICF ने अशी एक ट्रेन बनवण्याची कल्पना समोर ठेवली. आम्हाला अशा 2 गाड्या बनविण्याची परवानगी एप्रिल 2017 मध्ये मिळाली आणि आम्ही ही ट्रेन बनवू  शकलो याचा आम्हाला अभिमान असल्याचे, ICF चे महाव्यवस्थापक सुधांशू मणी यांनी सांगितले.

काय आहे खास? (What is Special)

वंदे भारत ट्रेनच्या प्रत्येक सीटखाली चार्जिंग पॉइंट दिले आहेत. तसेच प्रवाशांच्या मनोरंजनासाठी ट्रेनमध्ये 32-इंच टीव्ही स्क्रीन आहे. यामध्ये प्रवाशांना फायर सेन्सर, जीपीएस आणि कॅमेराची सुविधादेखील देण्यात आली आहे. विशेष म्हणजे दिव्यांग प्रवाशाची पूर्ण काळजी म्हणून सीट क्रमांकही सीटच्या हँडलवर ब्रेल लिपीत लिहण्यात आला आहे. तसेच दिव्यांग फ्रेंडली बायो टॉयलेटदेखील बसविण्यात आले आहेत.

ही ट्रेन कुठे धावते? (Where does This Train Run)

वंदे भारत एक्सप्रेस ही नवी दिल्ली-वाराणसी, नवी दिल्ली-वैष्णो देवी, नागपूर-बिलासपूर, हावडा-न्यू जलपाईगुडी, मुंबई-गांधीनगर,  दिल्ली-आता अंदौरा, चेन्नई-म्हैसूर  या मार्गांवर धावते. 

कोचशिवाय कशी धावते?(How to Run without a Coach)

वंदे भारत ट्रेन या एक्सप्रेसला एकूण 16 डबे आहेत. यामध्ये पहिल्या आणि शेवटच्या डब्यांमध्ये ड्रायव्हर टेलर कोचचा समावेश आहे, ज्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोको पायलट आहेत. ही इलेक्ट्रिक ट्रेन असून, ती चालविण्याची सिस्टीम व मोटर ट्रेनच्या 8 बोगींमध्ये बसवलेली असते.