Electric cars: सद्यस्थितीमध्ये सगळीकडे इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड सुरू आहे. लोकांची त्याबाबतीत असलेली लोकप्रियता सुद्धा वाढतांना दिसून येत आहे. पर्यावरण प्रेमींसाठी तर इलेक्ट्रिक व्हेइकल फार महत्वाचे आहे. अनेक लोकांना वाटते की आपल्याकडे इलेक्ट्रिक कार (Electric cars) असावी, पण काही वेळा बजेट नसल्याने अनेकांचे स्वप्न हे स्वप्नच राहून जाते. तुमचे बजेट जर 10 लाखापर्यंत असेल तर तुमच्यासाठी काही बेस्ट ऑप्शन असू शकतात, कमी पैशात उत्कृष्ट फीचर्स असलेल्या कार पुढीलप्रमाणे.
Table of contents [Show]
टाटा टियागो ईव्ही (Tata Tiago EV)
Tata ची Tiago EV ही इलेक्ट्रिक कार पहिल्या क्रमांकावर येते, कारण कमी किमतीत उत्तम वैशिष्ट्ये देणारी ही कार आहे. 28 सप्टेंबर 2022 रोजी टाटा मोटर्सकडून भारतात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारची घोषणा केली. जे एका चार्जवर 315 किमी पर्यंतची रेंज देते. फक्त 8.49 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह, ही भारतातील सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार आहे.
स्पेसिफिकेशन
| रेंज | 250Km/चार्ज, 300 किमी/चार्ज | 
| बॅटरी पॅक | 19.9 kWh/ 24 kWh | 
| चार्जिंग वेळ | 0-80% 57 मिनिटांत | 
| भारतातील किंमत | 8.49-11.79/- लाख | 
PMV Eas-E EV
ही अतिशय परवडणारी इलेक्ट्रिक कार आहे. ही मुंबईस्थित इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप कंपनी आहे. अनेक वैशिष्टे आणि किंमत कमी असल्याने लोकप्रिय आहे.
स्पेसिफिकेशन
| रेंज | 120 किमी, 160 किमी, 200 किमी | 
| बॅटरी पॅक | 48 V ली-आयरन फॉस्फेट बॅटरी पॅक | 
| चार्जिंग वेळ | 3 ते 4 तास | 
| भारतातील किंमत | 4.50 लाख/- | 
टॉर्म मोटर्स R3 (Torm Motors R3)
टॉर्म मोटर्स R3 ही तिसऱ्या क्रमांकावर आहे कारण ती भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारपैकी एक आहे. या कारमध्ये मोठे सन-रूफ देखील आहे. जर तुम्ही दररोज 50 किमी प्रवास करत असाल तर ही कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
स्पेसिफिकेशन
| रेंज | 200 किमी | 
| मोटर आणि टॉर्क | 15 kW | 90 एनएम | 
| सिटिंग | 2 सिटर | 
| किंमत | 4.50/- लाख | 
टाटा टिगोर ईव्ही (Tata Tigor EV)
टाटा मोटर्सने लाँच केलेली ही आकर्षक आणि आलिशान वैशिष्ट्ये असलेली इलेक्ट्रिक कार आहे, जी वैशिष्ट्यांसह रेंज मध्येही आकर्षक बनवण्यात आली आहे. ही 5 सीटर इलेक्ट्रिक कार आहे. यामध्ये तुम्हाला 21.5 kwh ची बॅटरी कॅपॅसिटी मिळेल. त्याची किंमत 9-10 लाखांच्या आत येते. यात रॅपिड चार्जिंगची सुविधा देखील आहे ज्यामुळे वाहन 1.5 तासात 80% पेक्षा जास्त चार्ज होईल.
टाटा टिगोर EV मॉडेल्सची भारतातील टॉप स्पीड किंमत
| XT प्लस | 9.90 लाख | 80 किमी/तास | 
| XM प्लस | 9.75 लाख | 80 किमी/तास | 
| XE प्लस | 9.58 लाख | 80 किमी/तास | 
महिंद्रा ई-व्हेरिटो (Mahindra E-Verito)
महिंद्रा ई-वेरिटो ही इलेक्ट्रिक कार विभागातील सर्वात कमी किमतीची कार आहे. कंपनीने या कारमध्ये 288 Ah क्षमतेचा लिथियम आयन बॅटरी पॅक दिला आहे ज्यामध्ये 72V 3 फेज एसी इंडक्शन मोटर जोडण्यात आली आहे. ही मोटर 41.57 Bhp पॉवर आणि 91 Nm पीक टॉर्क जनरेट करते.
स्पेसिफिकेशन
| रेंज | 110-120 किमी/चार्ज | 
| बॅटरी पॅक | 288 Ah लिथियम आयन बॅटरी | 
| टॉप स्पीड | 86 किमी प्रतितास | 
| किंमत | 9.13 - 9.46/- लाख | 
                
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            