Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

हौसेला मोल नाही; iPhone खरेदीसाठी अवलियाची दुबईवारी!

iPhone 14 Pro

Buy iPhone 14 : केरळमधील एक व्यावसायिक 2017 पासून नित्यनेमाने दुबईत जाऊन iPhone चं लेटेस्ट मॉडेल खरेदी करतोय. यासाठी तो दुबईवारीवर किमान 40 हजार रुपये खर्च करतो.

हौसेला मोल नाही म्हणतात, हे फक्त ऐकलं होतं. पण काही महाभाग आपली हौस भागवण्यासाठी काय-काय करू शकतात, याचा नेम नाही. त्यात आयफोनचं नवीन मॉडेल हे या पृथ्वीतलावरचं जणूकाही आश्चर्यच आहे, असं मानलं जात! कारण ते कधी येणार? त्याच्या लॉन्चिंगचा भलामोठा सोहळा, त्याची किंमत काय असणार? त्यात अॅपल यावर्षी नवीन काय देणार? याची अॅपलप्रेमींना इतकी उत्सुकता असते की, त्यांना धीर धरवत नाही.

असाच एक iPhone प्रेमी अवलिया आहे. तो भारतात आयफोन लॉन्च होण्यापूर्वी एक दिवस दुबईत जाऊन तिथल्या मोबाईल शॉपीमधून iPhone विकत घेतो. या अवलियाचं नाव आहे धीरज पालियिल. धीरज हा एक बिझनेसमॅन असून तो केरळ राज्यातील कोची शहरात राहतो. तो डेअर पिक्चर्स (Dare Pictures) या डिजिटल कन्सलटन्सी कंपनीचा संचालक आहे. धीरजने नव्याने लॉन्च झालेल्या iPhone 14 Pro हा फोन खरेदी करण्यासाठी 15 सप्टेंबरला दुबईवारी केली. या दुबईवारीसाठी त्याने तिकीट आणि व्हिसासाठी 40 हजार रुपये खर्च केलेत. धीरजने 15 सप्टेंबरला दुबईमधील प्रसिद्ध मोबाईल शॉपी मिर्डिफ सिटी सेंटर (Mirdif City Centre)मधून हा आयफोन विकत घेतलाय. धीरज 2017 पासून नियमितपणे दुबईमधून iPhone विकत घेत आहे.

आयफोनची शानच न्यारी!

केरळमधील बिझनेसमॅन धीरज पालियिल 2017 पासून दुबईमधून नियमितपणे iPhone विकत घेत आहे. iPhone 14 Pro खरेदी करण्यासाठी धीरज 15 सप्टेंबरला दुबईला गेला आणि तिथे त्याने तो फोन खरेदी केला. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 सप्टेंबरपासून iPhone 14 भारतात मिळू लागला. धीरज दुबईमधील प्रसिद्ध मोबाईल शॉपी मिर्डिफ सिटी सेंटरमधून आयफोन विकत घेतो. आयफोन विकत घेणाऱ्या ग्राहकांमध्ये धीरजचा पहिला नंबर असतो.

iPhone साठी कायपण!

आयफोन 14 प्रो फोनची किंमत 1,29,000 रुपयांपासून सुरू होते आणि हा फोन खरेदी करण्यासाठी धीरजने विमानाच्या तिकीटासाठी आणि व्हिसासाठी 40 हजार रुपये खर्च केले. तसेच बहुचर्चित लेटेस्ट आयफोन विकत घेण्यासाठी धीरज दुबईला पहिल्यांदा गेला नव्हता. या अगोदर ही तो अनेकवेळा दुबईला खास आयफोन विकत घेण्यासाठी गेला आहे. 2017 मध्ये iPhone 8 विकत घेण्यासाठी धीरज सर्वांत पहिल्यांदा दुबईला गेला होता. तर 2019 मध्ये धीरजने सर्वप्रथमच iPhone 11 Pro Max मिर्डिफ सिटी सेंटरमधून विकत घेतला होता. त्यावेळी आयफोन भारतात लॉन्च होण्यास आठवड्याभराचा अवधी शिल्लक होता. तर iPhone 12 आणि iPhone 13 च्यावेळी धीरज हे फोन विकत घेणारा मिर्डिफ सिटी सेंटरमधील पहिला ग्राहक होता.

iPhone 14 ची भारतातील किंमत!

भारतात iPhone 14 ची 128GB स्टोरेजची किंमत 79,900 आहे; तर 256GB आणि 512GB च्या मॉडेलची किंमत अनुक्रमे 89,900 आणि 1,09,900 रुपये आहे. प्रो मॉडेलच्या बेसिक फोनची किंमत 1,29,000 पासून सुरू होते. तर 256GB, 512GB आणि 1TB च्या मॉडेलची किंमत अनुक्रमे RS. 1,39,900 Rs. 1,59,900 आणि 1,79,900 रुपये असणार आहे. आयफोन प्रो मॅक्स मॉडेलची किंमत Rs. 1,39,900 Rs. 1,49,900 Rs. 1,69,900 आणि Rs. 1,89,900 रुपये असणार आहे.