Apple ही जगातील सर्वांत लोकप्रिय कंपन्यांपैकी एक कंपनी आहे; आणि ही कंपनी जगातील सर्वांत महागडे आणि युनिक असे स्मार्टफोन तयार करते. अॅपल जगभरात सर्वाधिक मागणी असलेलं iPhone हे प्रोडक्ट तयार करते. 2021 च्या अखेरीस Apple कंपनी स्मार्टफोनच्या बाजारपेठेत पहिल्या क्रमांकाची कंपनी म्हणून गणली गेली होती. पण सॅमसंग (Samsung) हा जगातील सर्वाधिक विकला जाणार ब्रॅण्ड आहे. Apple कंपनीचा जागतिक पातळीवर स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये Samsung नंतर दुसरा क्रमांक लागतो.
Table of contents [Show]
iPhone 13 Pro ची किंमत
Apple ने मार्केटमध्ये iPhone 14 आणण्यापूर्वी आयफोन 13 ही लेटेस्ट सिरीज होती. iPhone 13 pro या स्मार्टफोनची किंमत स्टोरेजच्या साईजनुसार $999 (रुपयांत 79,999) पासून $1,449 (रुपयांत 1,15,652) इतकी आहे. ही किंमत इतर फोनच्या तुलनेत खूपच जास्त आहे. त्याहून विशेष म्हणजे हा फोन तयार करण्यासाठी एकूण खर्च फक्त $570 (भारतीय रुपयांत 45,499) येतो.
आयफोन बनवणाऱ्या कामगारांचा पगार किती?
आयफोन हा प्रामुख्याने चीनमध्ये असेम्बल केला जातो. चीन यासाठी तैवानमधील फॉक्सकॉन या कंपनीची मदत घेते. iPhone बनवणाऱ्या कामगारांचा सरासरी किमान पगार हा प्रति तास $10 (रुपयांत अंदाजे 800 रुपये) आणि कमाल प्रति तास $27 (रुपयांत अंदाजे 2100 रुपये) आहे. तर 25 टक्के भागधारकांना प्रति तासाचे $12 (रुपयांत अंदाजे 950 रुपये) मिळतात.
अॅपलचे सीईओ टिम कुक (Tim Cook, the CEO of Apple) हे सांगतात की, चीनमध्ये कमी पैशात कामगार (Low labor cost) मिळतात म्हणून तिथे iPhone असेम्बल केला जातो यात तथ्य नाही. जर खरंच हे कारण असतं तर कंपनीने आणखी दुसऱ्या देशांमध्ये अजून स्वस्तात फोन असेम्बल करून घेतला असता. ते सांगतात की, चीनमधून आयफोन असेम्बल करून घेण्याचं मुख्य कारण म्हणजे, यासाठी आवश्यक असणारं कौशल्यं अमेरिकेत उपलब्ध नाही. जे चीनमध्ये मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून चीनमधून आयफोन असेम्बल केला जातो.
याव्यतिरिक्त, चीनमधून इतर देशांमध्ये माल पाठवणे परवडणारं आहे. कारण जगातील सर्वांत 10 मोठ्या बंदरांपैकी 7 बंदर एकट्या चीनमध्ये आहेत. Appleने iPhone जर अमेरिकेत तयार केला असता तर कंपनीला तो इतर देशांमध्ये पाठवण्यासाठी मोठा खर्च करावा लागला असता, असे कंपनीचे म्हणणे आहे.
चीनमधील कामगारांचं राहणीमान
चीनमधील महत्त्वाची शहरं वगळता, बहुतेक देश अजूनही अविकसित आहे. त्यामुळे इथलं राहणीमान इतर प्रगत देशांच्या तुलनेत स्वस्त आहे. त्यामुळे प्रगत देशांमधील आणि चीनमधील कामगारांच्या पगारात बऱ्यापैकी तफावत दिसून येते. त्यामुळे कंपनीला चीनमधून आयफोन असेम्बल करून घेणं परवडतं.
आयफोन बनवण्यासाठी किती खर्च येतो?
Apple चा मागच्या सप्टेंबरमध्ये म्हणजे 2021 मध्ये आलेल्या iPhone 13 Pro याचा निर्मिती खर्च (Production Cost) $570 (भारतीय रुपयांत 45,499) आहे. फोन असेम्बल केल्या जाणाऱ्या घटकांमध्ये फोन स्क्रीन, फोन केसिंग, कॅमेरा, बॅटरी, सॉफ्टवेअर आणि चिप्स अशा गोष्टींचा समावेश होतो. तसेच Apple त्यांच्या फोनवर मोठ्या प्रमाणात मार्कअप चार्ज करते.
Apple कंपनीचा एका वर्षातील नफा किती आहे?
Apple ने 2021 मध्ये $365.8 अब्ज महसुल मिळवला होता. तर 2020 मध्ये कंपनीने $274.3 अब्ज कमाई केली होती. 2020च्या तुलनेत 2021 मध्ये कंपनीच्या महसुलात 33 टक्क्यांनी वाढ झाली होती.
Samsung Galaxy S फोन बनवण्याचा खर्च किती?
सॅमसंग कंपनीच्या Samsung Galaxy S21 हा फोन बनवण्याचा अंदाजित खर्च $508 (भारतीय रुपयांत 40,500) आहे; आणि ग्राहकांना तो अंदाजे $1,049 (भारतीय रुपयांत 83,000)ला विकला जातो.
Apple ही जगातील एक नामांकित कंपनी असून लोकांचा त्यांच्या प्रोडक्ट्सवर विश्वास आहे. ती दर्जेदार उत्पादनं म्हणून जगभर नावाजली गेला आहेत. त्यामुळे अॅपलचे प्रोडक्ट्स इतर कंपन्यांच्या तुलनेत महाग असूनही लोक मोठ्या संख्येने त्याची खरेदी करतात.