Mhada Lottery वेगवेगळ्या भागासाठी येत्या काही दिवसात निघण्याची शक्यता आहे. यासाठी कोण अर्ज करु शकतो ते जाणून घेणे गरजेचे आहे.
अर्जदार राज्याचा रहिवासी असणे आवश्यक
महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात राहणारी, महाराष्ट्रातील कायमस्वरूपी असणारी व्यक्ती यासाठी पात्र आहे. किमान 15 वर्षांचे वास्तव्य राज्याच्या कोणत्या भागात असावे. महिला किंवा पुरुष अशी कोणतीही व्यक्ती जिने वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली असावीत.नोकरी किंवा व्यवसाय असणारी, उत्पन्नाचा पुरावा असणे आवश्यक आहे. सरकारी किंवा खाजगी नोकरीमधून निवृत्त झालेली व्यक्तीदेखील त्यांना मिळणाऱ्या पेन्शन उत्पन्नाच्या आधारावर कोणत्याही MHADA Lottery साठी अर्ज करू शकते.
कोणत्याही MHADA मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज
मुंबई, पूणे, कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, इ कोणत्याही म्हाडा मंडळाच्या लॉटरीसाठी अर्ज करता येतो. मात्र MHADA Lottery ज्या ठिकाणासाठी आहे तेथील महानगरपालिका /नगरपालिका हद्दीत अर्ज करणाऱ्या व्यक्तीच्या किंवा त्याच्या पती, पत्नीच्या किंवा अज्ञान मुलांच्या नावाने भाडे किंवा मालकी तत्वावर कोणताही भूखंड, घर किंवा गाळा नसावा.
MHADA Lottery मधून पुन्हा घर मिळवता येतं नाही
म्हाडा, सिडकोमधून यापूर्वी घर मिळाले असेल (पती -पत्नी ) अशा व्यक्तीला म्हाडाच्या त्यापुढील कोणत्याही नवीन लॉटरीसाठी पुन्हा अर्ज करता येतं नाही. मात्र आई - वडिलांच्या नावे म्हाडा सिडकोमधून मिळालेले किंवा खाजगी मालकीचे घर असेल तरी त्यांचा मुलगा किंवा मुलगी स्वतःचे उत्पन्न दाखवून वेगवेगळे अर्ज करु शकतात.
म्हाडा लॉटरीमधून घर मिळाले असेल तर पुन्हा पती किंवा पत्नी MHADA Lottery साठी अर्ज करु शकत नाही. मात्र म्हाडा लॉटरीमधून मिळालेल्या घराचा ताबा न घेता घर सरेंडर केले असेल तर त्या व्यक्तीला किंवा त्याच्या पती-पत्नीला त्यापुढील कोणत्याही MHADA Lottery साठी अर्ज करता येतं नाही.
MHADA Lottery च्या वेगवेगळ्या भागासाठी भविष्यात जाहिराती येणार आहेत. त्यासाठी या अटी समजून घेणे आवश्यक आहे.