Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई, महाराष्ट्र राज्य वीज वितरण आणि जिल्हा रुग्णालय जालना येथे विविध पदांसाठी भरती

Jobs

Image Source : www.aai.aero

Job Opportunities: भारतीय विमानतळ प्राधिकरणा अंतर्गत 596 जागा, महाराष्ट्र राज्य वीज वितरण अंतर्गत 37 जागा आणि जालना जिल्हा रुग्णालया अंतर्गत 18 पदांची नियुक्ती केली जाणार आहे.

Job Opportunities: सध्या मोठमोठ्या कंपन्या नोकर कपात करत आहेत. त्यामुळे बरेचजण सध्या चांगल्या नोकरीच्या(Job) शोधात आहेत. सरकारी नोकरी(Government Job) मिळावी अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावामुळे ही संधी हुकते. त्यामुळेच 'Mahamoney'ने पुढाकार घेत, सरकारी नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेल्या किंवा सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नोकरीसाठी सहज व सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल. जिल्हा रुग्णालय जालना, भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई आणि  महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत विविध पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे.या पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यामधील जिल्हा रुग्णालय जालना येथील पदांसाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे. तर इतर भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन(online) पद्धतीने अर्ज करता येणार आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.    

Job Opportunities: भारतीय विमानतळ प्राधिकरण मुंबई

पद: कनिष्ठ कार्यकारी(Junior Executive)
शैक्षणिक पात्रता:  इंजिनिअरिंगमध्ये पदवी
एकूण पद संख्या: 596
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 21 जानेवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ: www.aai.aero   

Job Opportunities: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. पुणे

पद:  इलेक्ट्रिशियन, वायरमन(Electrician, Wireman)
शैक्षणिक पात्रता:  12 वी पास, NCVT नवी दिल्ली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून इलेक्ट्रिशियन, वायरमनमध्ये उत्तीर्ण
एकूण पद संख्या: 37
वयोमर्यादा: 30 वर्षांपर्यंत
नोकरीचे ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 6 जानेवारी 2022
अधिकृत संकेतस्थळ: www.mahadiscom.in  

Job Opportunities: जिल्हा रुग्णालय, जालना

पद:  वैद्यकीय अधिकारी(Medical Officer)
शैक्षणिक पात्रता:  MBBS/ पदव्युत्तर पदवी
एकूण पद संख्या: 18
मुलाखत थेट पद्धतीने होणार आहे 
मुलाखतीची तारीख : 20 डिसेंबर 2022
अधिकृत संकेतस्थळ:  jalna.gov.in      
मुलाखतीच्या ठिकाणाचा पत्ता: जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय जालना, समर्थ नगर, जालना- 431 213