Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jobs in India : रोजगारासाठीच्या ऑनलाईन घडामोडींमध्ये अंशत: शिथिलता  

Online Recruitment

कोव्हिड (Post Covid) नंतरच्या काळात ऑनलाईन इंटरव्ह्यू (Online Interview) आणि इतर ऑनलाईन घडामोडी वाढल्या होत्या. पण, नोव्हेंबर महिन्यात त्यामध्ये अंशत: शिथिलता आल्याचं दिसतंय. शिवाय शहरी भागांमध्येही रोजगाराच्या (Employment) संधी कमी झाल्यात. नोव्हेंबरचा जॉब डेटा काय सांगतो बघूया…

भारतात नोकरीच्या संधी नेमक्या कुठल्या क्षेत्रात आहे याची माहिती नोकरींच्या साईटवरून आपल्याला कळत असते. अलीकडेच फाऊंडइट इनसाईट ट्रॅकर (Foundit Insight Tracker) या वेबसाईटने त्यांच्याकडे जमलेल्या उमेदवारांच्या डेटावरून एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार रिअल इस्टेट (Real Estate), रिटेल उद्योग (Retail), बँकिंग आणि फायनान्स (Banking & Finance) या क्षेत्रामध्ये तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळत असल्याचं दिसतंय.  

नोकरी मिळवण्यासाठीच्या ऑनलाईन घडामोडी मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत अंशत: कमी झाल्या आहेत. आणखी एक महत्त्वाचं निरीक्षण माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राबद्दलचं आहे. गेल्या काही महिन्यात या क्षेत्रात रोजगाराच्या संधी कमी झाल्या होत्या. उलट नोकर कपातीच्याच बातम्या येत होत्या. पण, ऑक्टोबरच्या तुलनेत या क्षेत्रात नोकर भरतीचं प्रमाण 8% वाढलं आहे. शिक्षण व आरोग्यसेवा क्षेत्राला तंत्रज्ञान पुरवणाऱ्या कंपन्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर भरती पाहायला मिळत आहे.  

फाऊंडइट इनसाईट ट्रॅकर हा दर महिन्याला निघणारा अहवाल आहे. आणि यात उद्योग क्षेत्र तसंच शहरं, निम शहरी क्षेत्र आणि ग्रामीण भागातल्या रोजगाराचा आढावा घेतला जातो. रिअल इस्टेट क्षेत्रात वाढलेली गुंतवणूक लोकांमध्येही खरेदी करण्याची क्षमता असल्याचं दर्शवते, असं या अहवालात म्हटलं आहे.  

चंदिगड, अहमदाबाद तसंच बडोदा या दुसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये रोजगाराचा दर जास्त आहे. आणि आधीच्या तुलनेत वाढतोय. तर बंगळुरू, दिल्ली, पुणे, हैदराबाद, चेन्नई या शहरांमध्ये रोजगाराची टक्केवारी घटली आहे.  

मुंबईमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात झालेल्या जोरदार नोकर भरतीमुळे हे शहर आपला पहिला क्रमांक राखून आहे.