Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR Deadline : आता उरले फक्त 2 दिवस, टॅक्सपेअर्सला टेन्शन; सरकार मात्र डेडलाईनवर ठाम

ITR Deadline : आता उरले फक्त 2 दिवस, टॅक्सपेअर्सला टेन्शन; सरकार मात्र डेडलाईनवर ठाम

टॅक्स रिटर्नसाठी 31 जुलै 2022 या डेडलाईनपूर्वी अवघे दोनच दिवस हाती उरल्याने टॅक्स कन्सल्टंट आणि सीए यांच्या ऑफिसांत अहोरात्र आयटीआर रिटर्न (ITR) फायलिंगचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. ITR ला मुदतवाढ मिळावी अशी मागणी जोर धरत असली तरी सरकार मात्र ती वाढण्याच्या मूडमध्ये नाही.

टॅक्स रिटर्नसाठी 31 जुलै 2022 या डेडलाईनपूर्वी अवघे दोनच दिवस हाती उरल्याने टॅक्स कन्सल्टंट आणि सीए यांच्या ऑफिसांत अहोरात्र आयटीआर रिटर्न (ITR) फायलिंगचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. ITR ला मुदतवाढ मिळावी अशी मागणी जोर धरत असली तरी सरकार मात्र ती वाढण्याच्या मूडमध्ये नाही.

ITR फायलिंगचा लोड वाढल्याने इन्कम टॅक्सच्या वेबसाईटने पूर्णपणे मान टाकली आहे. यामुळे शेवटच्या टप्प्यात रिटर्न फायलिंग करण्याच्या तयारीत असलेल्या कोट्यवधी टॅक्सपेअर्सच्या मनात घालमेल सुरु झाली आहे. मुदतीनंतर रिटर्न फायलिंग करणाऱ्यांना विलंब शुल्काचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे दंड टाळण्यासाठी टॅक्सपेअर्स रात्र रात्र जागून ऑनलाईन रिटर्न फायलिंग करत आहेत.

इन्फोसिस या कंपनीनं तयार केलेले इन्कम टॅक्स विभागाचे वेबपोर्टल मागील आठवडाभरापासून खूपच स्लो झाले आहे. वेबपोर्टलवरील ट्रॅफिक वाढल्याने ITR फायलिंगची प्रक्रिया पूर्ण होण्यास प्रचंड उशीर लागत आहे. यामुळे वैतागलेल्या करदात्यांनी आणि कर सल्लागार, सीए यांनी #Extend Due Date Immediately अशी मागणी केली आहे. ट्विटवर सध्या या ट्रेंडला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ITR भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी, याकरीता सीए, टॅक्स कन्स्लटंट, वैयक्तिक करदाते विविध माध्यमातून मागणी करत आहेत. आज काहींनी मागील 10 वर्षांत रिटर्न फायलिंगला 9 वेळा सरकारने मुदतवाढ दिली होती अशा पोस्ट टाकल्या आहेत. त्यामुळे या वर्षीही मुदतवाढ मिळेल, अशी अपेक्षा या पोस्टमधून केली आहे.

आता शनिवार आणि रविवार असे दोनच दिवस ITR फायलिंगसाठी शिल्लक आहे.  इन्कम टॅक्सच्या वेबपोर्टलवर 31 जुलै 2022 रोजी रात्री 11.59 मिनिटांपर्यंत रिटर्न फाईल करु शकतात. मुदतवाढ देण्याबाबत केंद्र सरकार आणि अर्थ मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. अर्थात 31 जुलै 2022 या डेडलाईनवर सरकार ठाम असल्याचे बोलले जात आहे.

करदात्यांनी अंतिम मुदतीपूर्वी आयटीआर फाईल करावा, शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहू नका, असे वारंवार आवाहन इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून केले जात आहे. इन्कम टॅक्स विभागाच्या आकडेवारीनुसार आजच्या तारखेपर्यंत 4 कोटी 'आयटीआर'चे फायलिंग झाले आहे. तर 31 जुलै 2022 पर्यंत आणखी किमान 5 कोटी ITR भरले जातील, असा अंदाज आहे. त्यामुळे इन्कम टॅक्सच्या वेबपोर्टलवरील लोड आणि ट्रॅफिक कमी होण्याची चिन्हे नाहीत.