ITR Late Filing Penalty : जर तुमचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे; तरी तुम्ही तुमच्या आर्थिक नियोजनासाठी रिटर्न फाईल करणं आवश्यक आहे. कारण तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. पण काही बाबींमध्ये तुमची परदेशात प्रॉपर्टी असेल किंवा विदेशातून तुम्हाला ठराविक उत्पन्न मिळत असेल, किंवा मागील वर्षात एक लाख रुपयांपेक्षा अधिक वीज बिल तुम्हाला आला असेल किंवा तुमच्या बँकेत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा आहे. तर तुम्हाला आयटीआर रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे आणि तुमच्यासाठी 31 जुलै, 2022 ही रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख आहे. (Late Fee for ITR ay 2021-22)
विलंब शुल्क (Late fee)
जर तुम्ही 31 जुलै, 2022 च्या आत आयटीआर रिटर्न (Income Tax Return) फाईल करू शकला नाही. तर तुम्ही 31 डिसेंबर, 2022 पर्यंत रिटर्न फाईल करू शकता. पण यासाठी तुम्हाला विलंब शुल्क भरावे लागेल. तुमचे वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला विलंब फी म्हणून 5 हजार रुपये दंड भरावा लागेल आणि जर तुमचे वार्षिक उत्पन्न पाच लाखापेक्षा कमी असेल तर लेट फी म्हणून 1 हजार रूपये दंड (ITR Late Filing Penalty) भरावा लागेल.
देय असलेल्या टॅक्सवर व्याज (Interest on unpaid tax)
जर तुम्ही 31 जुलै, 2022 पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केले नाही तर तुमच्या देय असलेल्या टॅक्सवर 31 जुलैनंतर 1 टक्का व्याज लागू होते. करदात्याने 31 जुलैनंतर रिटर्न फाईल केल्यास त्याला सर्वप्रथम त्या दिवसापर्यंतचे व्याज दंडासह भरावे लागते. त्यानंतर त्याला रिटर्न फाईल करण्याची सुविधा उपलब्ध होते.
तोटा पुढील वर्षात दाखवणे (Carry forward the losses)
करदात्यांना इतर उत्पन्नाच्या तुलनेत व्यवसायिक उलाढालीतून किंवा मालमत्तेच्या विक्रीतून होणारे नुकसान भरून त्याचे उत्तरदायित्व (Tax Liability) कमी करण्याची परवानगी आहे. म्हणजेच त्या वर्षात होणारा तोटा कायद्याने पुढील वर्षांपर्यंत नेण्याची परवानगी आहे. पण, ही सुविधा मुदतीनंतर रिटर्न फाईल करणाऱ्यांना लागू होत नाही. जर करदात्यांनी 31 जुलै 2022 पूर्वी आयटीआर दाखल केला तरच त्यांना यावर्षी होणारा तोटा पुढील वर्षात दाखवण्याची सुविधा घेता येईल.