ITR Return : पगारदार आणि ज्यांच्या बॅंक खात्याचे ऑडिट करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्यासाठी ITR दाखल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै, 2022 आहे. पण यावेळी 31 जुलै ही तारीख नेमकी सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी आली आहे. त्यामुळे तुम्हाला 31 जुलैच्या अगोदरच आयटीआर (ITR) दाखल करावा लागणार आहे.
साधारणत: ऑनलाईन पद्धतीने आयटीआर (Income Tax Return) वर्षभरात कोणत्याही दिवशी भरला जाऊ शकतो. म्हणजे रविवार असो, सार्वजनिक सुट्टी असो किंवा बॅंकेची सुट्टी असो, त्याचा आयटीआर फाईल करण्यावर काहीच फरक पडत नाही. तरीही काही जणांकडून शेवटच्या दिवसापर्यंत आयटीआर फाईल करण्यासाठी थांबू नये, असे सल्ला दिला जातो. यावर्षी 31 जुलै रोजी नेमका रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस आला आहे.
सुट्टीच्या दिवशी तांत्रिक गोष्टींमध्ये अडचण आल्यास...
आजकार सर्व काही ऑनलाईन उपलब्ध असले तरी, काही बॅंका किंवा काही संकेतस्थळ सुट्टीच्या दिवशी मेंटनन्सचे काम हाती घेतात. त्यामुळे अशा दिवशी काही बॅंकांची ऑनलाईन सेवा तात्पुरती थांबवलेली असते. तर काही ठिकाणी इंटरनेट सेवेच्या देखभाल दुरूस्तीसाठी ती सुट्टीच्या दिवशी बंद ठेवली जाते. सुट्टीच्या दिवशी अशाप्रकारची कुठलीही समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत आयटीआर रिटर्न फाईल करण्यासाठी थांबू नये, असे सांगितले जाते.
31 जुलैनंतर आयटीआर भरल्यास दंड
इन्कम टॅक्स कायद्यातील नियमानुसार, संबंधित विभागाने नेमून दिलेल्या तारखेनंतर म्हणजेच 31 जुलै, 2022 नंतर आणि 31 डिसेंबर, 2022 पूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यास 5 हजार रूपये दंड भरावा लागेल. ज्यांचे वार्षिक करपात्र उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी आहे; त्यांना 1 हजार रूपये दंड भरावा लागेल.