नवीन वर्षांत परदेश वारी करण्याची इच्छा असेल आणि तीही सहकुटुंबं तर IRCTC ने तुमच्यासाठी एक खास पॅकेज उपलब्ध करून दिलं आहे. देशांतर्गत पर्यटन पॅकेजेसच्या बरोबरीने कंपनी आता परदेशी पॅकेजेसच्या क्षेत्रातही उतरली आहे. आणि इतर पर्यटन कंपन्यांच्या तुलनेत ही पॅकेजेस किफायतशीर असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
IRCTC कंपनीचं थायलंड पॅकेज पाच रात्री आणि सहा दिवसांसाठी आहे. आणि त्याचं नाव ‘थायलंड स्प्रिंग फेस्टिव्हल टूअर’ असं आहे.
Table of contents [Show]
IRCTCचं थायलंड पॅकेज IRCTC Thailand Package
कंपनीचं थायलंड पॅकेज कोलकाता ते थायलंड असं आहे. म्हणजे टूअर कोलकात्याहून सुरू होणार आहे. सुरुवातीला 21 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान हे पॅकेज आखण्यात आलंय. कोलकात्याहून सुरुवातीला पर्यटक थायलंडची राजधानी बँकॉक इथं जातील. आणि तिथून तीन दिवसांनी पर्यटकांना पट्टाया इथं नेण्यात येईल.
हे पॅकेज घेतल्यानंतर जेवण, फिरणं आणि पर्यटन स्थळांचा फेरफटका अशा सगळ्या गोष्टींची व्यवस्था IRCTC कडून करण्यात येईल. आणि शॉपिंग व्यतिरिक्त पर्यटकांना इतर कुठल्याही गोष्टीसाठी खर्च करावा लागणार नाही, असं कंपनीने म्हटलं आहे.
IRCTC पॅकेजमध्ये मिळणार या सुविधा Facilities In the IRCTC Thailand Package
- पर्यटकांच्या राहण्याची सोय कंपनीतर्फे केली जाईल
- हॉटेल ते पर्यटन स्थळ फिरण्याची सोय केली जाईल
- जेवण व नाश्ता IRCTC कडून पुरवला जाईल
- याशिवाय पर्यटन स्थळांच्या ठिकाणी गाईडही दिला जाईल
थायलंड पॅकेजचा खर्च किती? How Much Do I Spend?
IRCTC च्या वेबसाईटवर या पॅकेजची सगळी माहिती देण्यात आली आहे. हा प्रवास एकट्याने करत असाल तर तुम्हाला 54350 रुपये मोजावे लागतील. आणि सहल जोडीदाराबरोबर करत असाल तर प्रत्येकी 46,100 रुपये भरावे लागतील.
तिकीट कसं बुक करायचं? How To Book Tickets?
IRCTC च्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला बुकिंग करता येईल. पैसे भरण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड तसंच युपीआय पेमेंटची सोय आहे. याशिवाय तुमच्या काही शंका असतील तरीही त्याचं निराकरण या वेबसाईटवर होईल.