Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IPL Auction 2022 : Sam Curran स्पर्धेच्या इतिहासातला सगळ्यात महागडा खेळाडू 

IPL Auction 2022

Image Source : www.thesportsnews.in

IPL Auction 2022 : इंग्लिश ऑलराऊंडर Sam Curran ने IPL मध्ये नवीन विक्रम रचला आहे. स्पर्धेच्या इतिहासात 18.25 कोटी रुपयांसह तो सगळ्यात महागडा खेळाडू ठरला आहे. कुणी त्याला विकत घेतलं पाहूया…

IPL Auction 2022 नेहमीसारखंच मोठ्या रकमा आणि बोलींचं ठरतंय. आणि पहिल्याच दिवशी आयपीएलमधला एक नवा विक्रमही रचला गेलाय.      

इंग्लिश ऑलराऊंडर (Allrounder) सॅम कुरानवर (Sam Curran) तब्बल 18.25 कोटी रुपयांची बोली लागली. आणि आयपीएलच्या इतिहासातला तो सगळ्यात महागडा खेळाडू (Most Expensive Player) ठरलाय. किंग्ज इलेव्हन पंजाब (King's XI Punjab) टीमने मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपरकिंग्जबरोबर (Chennai Superkings) तगडी स्पर्धा करत कुरानला अखेर आपल्या ताफ्यात आणण्यात यश मिळवलं.      

कुरानसाठी बोली लागत असताना मुंबई इंडियन्स टीम अगदी 18 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. पण, किंग्ज इलेव्हन पंजाबचे मालक नेस वाडिया 18.25 कोटी रुपयांवर पोहोचल्यावर मुंबई टीमने थांबणंच पसंत केलं. सॅम कुरानला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रिटेन केलेल्या विराट कोहली आणि लखनौ जायंट्सनी रिटेन केलेल्या के अल राहुलपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे.      

आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे 2019मध्ये ज्या पंजाब टीमने पहिल्यांदा कुरानला साईन केलं, त्यांच्याचकडे तीन वर्षांनंतर तो परतणारए. फरक इतकाच की, 2019मध्ये त्याच्यावर 7 कोटींची बोली लागली होती. आता त्याची किंमत वाढून 18.25 कोटी रुपये इतकी झाली.      

याला कारण, इंग्लिश सॅम कुरान सध्या टी-20 स्पर्धेतला सगळ्यात फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकात कुरान फायनल सामन्यात आणि संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्तम ठरला होता. यावर्षी सप्टेंबर महिन्यापासून त्याने टी-20 स्पर्धेत 14 सामन्यांत 25 बळी टिपले आहेत. आणि बॅटिंगमध्येही त्याचा स्ट्राईकरेट 154 रन्सचा आहे. म्हणजे शंभर बॉलमध्ये तो 154 रन करतो.      

या त्याच्या खासियतीमुळे तो या लिलावातला सगळ्यात लक्षवेधी खेळाडू होता. आणि अपेक्षेप्रमाणेच त्याच्यावर बोली वाढत गेली. सॅम कुरान ताफ्यात आल्यावर किंग्ज इलेव्हन पंजाब टीमचे मालक नेस वाडिया यांनी आनंद व्यक्त केला आहे.      

तर सॅम कुरानने अजून विश्वास बसत नसल्याची प्रतिक्रिया दिली.