Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian Premier League Auction 2023 साठी कोणत्या संघाच्या पर्समध्ये किती पैसे आहेत?

Indian Premier League Auction:

Image Source : www.cricketaddictor.com

Indian Premier League Auction: आयपीएल लिलाव (IPL auction) 2023 सोहळा 23 डिसेंबर 2022 रोजी कोची येथे होत आहे. यासाठी प्रत्येक संघ किती रुपयांनी भरलेली पर्स घेऊन लिलावात उतरणार आहेत, हे या बातमीतून जाणून घ्या.

Indian Premier League Auction: इंडियन प्रीमीअर लीगने (IPL) पुढील वर्षाच्या सोळाव्या हंगामाची तयारी सुरु केला आहे. गुरुवारी,  23 डिसेंबर रोजी कोची येथे लिलाव सोहळा पार पडणार आहे. आयपील 2023 साठीच्या लिलावासाठी सर्व संघ आपली पर्स घेऊन सज्ज झाले आहेत. सर्व दहा आयपील संघांमध्ये (IPL Teams) 50 परदेशी खेळाडूंसह एकूण 163 खेळाडू असतात. प्रत्येक संघात जास्तीत जास्त 25 सदस्य आणि किमान 18 सदस्य असतात, त्यापैकी 8 परदेशी खेळाडू असतात. तर लिलावातून कळेल की प्रत्येक संघाने, प्रत्येक खेळाडूसाठी पर्समध्ये किती पैसे खर्च केले. लिलावासाठी सनराईज हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) टीमच्या पर्समध्ये सर्वाधिक  42.25 कोटी आहेत. तर, कोलकत्ता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) पर्समध्ये सर्वात कमी 7.05 कोटी शिल्लक आहेत. इतर सर्व संघांच्या पर्सची नेमकी परिस्थिती काय, किती रुपये शिल्लक आहेत ते पाहुयात.    

कोणत्या संघाच्या पर्समध्ये किती पैसे आहेत?    

  • चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings): कूल कॅप्टन धोनीची टिम म्हणून ओळख असणाऱ्या या संघाकडे सध्या परदेशी 6 खेळाडूसंह 18 खेळाडू आहेत. यांच्या पर्समध्ये 20.45 कोटी शिल्लक आहेत.    
  • दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals): या संघाकडे 6 परदेशी खेळाडूंसह 20 खेळाडू आहेत. त्यांच्याकडे 2 परदेशींसह 5 अशा 7 खेळाडूंच्या जागा रिकाम्या आहेत. यांच्या पर्समध्ये एकूण 19.45  उरले आहेत.     
  • गुजरात टायटन्स (Gujarat Titans): या संघाकडे एकूण 23 खेळाडू सध्यातरी आहेत. संघाच्या पर्समध्ये  19.25 कोटी रुपये उरले आहेत.     
  • कोलकत्ता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders): शाखरुख खानच्या या संघात भारतीय आणि परदेशी मिळून एकूण 29 खेळाडू आहेत. त्यांच्याकडे 14 नवे खेळाडू सामील करण्यासाठी वाव आहे. संघाच्या पर्समध्ये केवळ 7.05 कोटी रुपये शिल्लक आहेत. सर्व 10 संघांपैकी सर्वात कमी पैसे कोलकत्ता नाईट रायडर्सकडे आहेत.     
  • लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants): या संघात 4 परदेशी खेळाडूंसह 15 खेळाडू आहेत. तर  नियमानुसार आणखी 14 खेळाडू राखीव ठेवता येऊ शकतात. सध्या संघाच्या पर्समध्ये 23.35 कोटी शिल्लक आहेत.    
  • मुंबई इंडियन्स (Mumbai Indians): हिटमॅन रोहित शर्मा कॅप्टन असलेल्या या संघात 21 खेळाडू आहेत. या संघाच्या पर्समध्ये  20.55 कोटी शिल्लक आहेत.     
  • पंजाब किंग्स (Punjab Kings): या संघात सध्या 21 खेळाडू असून, संघाच्या पर्समध्ये 32.2 रुपये शिल्लक आहेत.     
  • रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore): या  रॉयल संघाच्या पर्समध्ये 8.75 कोटी रुपये आहेत. या संघात नव्या खेळाडुंसाठी 9 जागा शिल्लक असून, सध्या 24 खेळाडू आहेत.     
  • राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals): या संघाच्या पर्समध्ये 13.2  कोटी उरले आहेत. या संघात एकूण 20 खेळाडू आहेत, तर 13 खेळाडू नव्याने सामील करण्यासाठी जागा शिल्लक आहे.     
  • सनराईज हैद्राबाद (Sunrisers Hyderabad): या संघाच्या पर्समध्ये सर्वाधिक 42.25 कोटी रुपये शिल्लक आहेत. तर, सध्या या संघात 15 खेळाडू आहेत.    

सर्व संघाच्या पर्समध्ये जेवढे रुपये आहेत त्याच्या आधारावर 991 खेळाडुंच्या यादीपैकी 369 खेळाडुंची निवड होईल, यासह ऊर्वरीत 36 खेळाडू हे संघांनी दिलेल्या यादीतून निवडले जाणार आहेत, अर्थात एकूण 405 खेळाडुंसाठी सर्व संघाच्या पर्समधील रुपये मिळून 206.5 कोटी एवढी रक्कम आहे.