Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund Investment 2023: नवीन वर्षात गुंतवणूक करताय? या फंड्सबद्दल नक्की जाणून घ्या!

Mutual Fund Investment in 2023

Mutual Fund Investment 2023: आम्ही तुमच्यासाठी 2023 मध्ये चांगला परफॉर्मन्स देऊ शकणाऱ्या म्युच्युअल फंडची आकडेवारी घेऊन आलो आहोत. या आकडेवारीच्या आधारे तुम्हाला तुमच्या आवडीचा आणि तुमच्या सोयीनुसार फंड निवडण्यात मदत होऊ शकेल.

नवीन वर्षांत नवीन संकल्प, या उक्तीनुसार अनेक जण गुंतवणुकीसाठीसुद्धा नवीन वर्षाला प्राधान्य देतात. तर 2022 हे वर्षा संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत आणि तुम्ही जर नवीन वर्षासाठी गुंतवणुकीचा नवीन संकल्प करणार असाल तर आम्ही तुमच्यासाठी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीसाठी काही योजनांची माहिती घेऊन आलो आहोत.

बॅंकेतील मुदत ठेवींच्या तुलनेत म्युच्युअल फंडमध्ये अधिक रिस्क जरी असली  तरी फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा चांगले रिटर्न्स म्युच्युअल फंड्समधून मिळतात, असे म्युच्युअल फंडच्या रेकॉर्डवरून दिसते आणि काही आर्थिक सल्लागारही त्यानुसार आपले मत मांडतात. म्युच्युअल फंडमधून फायदा मिळत असला तरी सध्या मार्केटमध्ये म्युच्युअल फंडच्या एवढ्या स्कीमस उपलब्ध आहेत की, त्यातून एखादा चांगला फंड निवडणे अवघड काम झाले आहे. यासाठी आम्ही तुमच्यासाठी 2023 मध्ये चांगला परफॉर्मन्स देऊ शकणाऱ्या म्युच्युअल फंडची आकडेवारी घेऊन आलो आहोत. या आकडेवारीच्या आधारे तुम्हाला तुमच्या आवडीचा आणि तुमच्या सोयीनुसार फंड निवडण्यात मदत होऊ शकेल. चला तर पाहुयात कोणता म्युच्युअल फंड 2023 मध्ये सर्वात बेस्ट ठरू शकतो?

इक्विटी फंडस् (Equity Funds)

फंड

(Fund)

एन..व्ही. (NAV)

.यु.एम. (AUM)

3वर्षरिटर्न्स

5वर्षरिटर्न्स

SBI  कॉन्ट्रा फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ 

(SBI Contra Fund- Direct Plan- Growth )

Rs. 227.66

Rs. 5827.07 crore

28.68%

15.28%

IDFC  टॅक्स एडव्हान्टेज फंड - डायरेक्ट प्लॅन ग्रोथ (IDFC Tax Advantage Fund- Direct Plan- Growth)

Rs. 107.14

Rs. 3692.39 crore

22.42%

13.98%

PGIM  इंडिया फ्लॅक्सि कॅप फंड - डायरेक्ट - ग्रोथ 

(PGIM India Flexi Cap Fund- Direct- Growth)

Rs. 27.44

Rs. 5081.26 crore

24.62%

16.19%

HDFC  फ्लॅक्सि कॅप फंड - डायरेक्ट - ग्रोथ 

(HDFC Flexi Cap Fund- Direct Plan- Growth)

Rs. 1139.19

Rs. 30,472.77 crore

18.36%

13.40%

क्वान्ट टॅक्स प्लॅन डायरेक्ट प्लॅन ग्रोथ 

(Quant Tax Plan- Direct Plan- Growth)

Rs. 259.59

Rs. 1584.38 crore

40.70%

23.77%

इक्विटी म्युच्युअल फंड हे सर्व मार्केटमधील सर्व प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून चांगले रिटर्न्स (High Returns) मिळवण्याचा प्रयत्न करतात. इक्विटी फंड हा म्युच्युअल फंड प्रकारातील सर्वात जोखीम असणारा प्रकार आहे; म्हणूनच कदाचित डेब्ट फंड आणि हायब्रिड फंड (Debt & Hybrid Fund)पेक्षा जास्त परतावा देण्याची क्षमता इक्विटी फंडमध्ये असते. अर्थात, गुंतवणूकदारांना त्या पटीने रिटर्न्स देण्यात त्या कंपनीची कामगिरीसुद्धा तितकिच महत्त्वाची असते.

डेब्ट फंडस् (Debts Funds)

फंड

(Fund)

एन..व्ही. (NAV)

.यु.एम. (AUM)

3वर्षरिटर्न्स

5वर्षरिटर्न्स

आदित्य बिर्ला सन लाइफ बँकिंग अँड PSU  डेबीट फंड - डायरेक्ट प्लॅन - ग्रोथ

(Aditya Birla Sun Life Banking & PSU Debt Fund- Direct Plan- Growth)

Rs. 307.88

Rs. 9611.20 crore

6.56%

7.02%

कॅनरा रोबेको बँकिंग अँड PSU  डेबट् फंड - डायरेक्ट - ग्रोथ . (Canara Robeco Banking and PSU Debt Fund- Direct- Growth)

Rs. 9.98

Rs. 509.02 crore

NA

NA

DSP PSU  अँड डेबट् फंड - डायरेक्ट - ग्रोथ .  

(DSP PSU & Debt Fund- Direct Plan-   Growth)

Rs. 20.15

Rs. 2561.70 crore

13.49%

11.28%

L&T  बँकिंग अँड PSU  डेबट् फंड - डायरेक्ट - ग्रोथ

(L&T Banking and PSU Debt Fund- Direct Plan- Growth)

Rs. 20.77

Rs. 4530.30 crore

5.52%

6.27%

मिराई असेट बँकिंग अँड PSU  डेबट् फंड - डायरेक्ट - ग्रोथ .  

(Mirae Asset Banking and PSU Debt Fund- Direct Plan- Growth)

Rs. 10.76

Rs. 107.32 crore

डेब्ट (कर्ज) ही अशी प्रमुख बाजारपेठ आहे, ज्यामध्ये लोक आपले पैसे नफा कमावण्यासाठी गुंतवतात. डेब्ट (debt)  मार्केटमध्ये विविध साधनांचा समावेश असतो, ज्यामुळे इंटरेस्टच्या (interest) बदल्यात कर्जाची खरेदी-विक्री सुलभ होते. इक्विटी (equity)  गुंतवणुकीपेक्षा कमी रिस्क समजले जाणारे, अनेक गुंतवणूकदार डेब्ट सिक्युरिटीजमध्ये खरेदीला प्राधान्य देतात मात्र, इक्विटी गुंतवणुकीच्या तुलनेत डेब्ट गुंतवणूक कमी returns देते.

हायब्रीड फंड (Hybrid Funds)

फंड

(Fund)

एन..व्ही. (NAV)

.यु.एम. (AUM)

3वर्षरिटर्न्स

5वर्षरिटर्न्स

एडलवाईस अग्ग्रेसिव्ह हायब्रीड फंड - डायरेक्ट प्लॅन - ग्रोथ (Edelweiss Aggressive Hybrid Fund- Direct Plan- Growth)

Rs. 42.38

Rs. 311.54 crore

16.27%

12.46%

UTI  हायब्रीड फंड - डायरेक्ट प्लॅन - ग्रोथ 

(UTI Hybrid Equity Funds- Direct Plan- Growth)

Rs. 264.38

Rs.4447.63 crore

15.86%

9.80%

ICICI  प्रुडेंशियल इक्विटी आणि डेबट् फंड - डायरेक्ट प्लॅन - ग्रोथ (ICICI Prudential Equity & Debt Fund- Direct Plan- Growth)

Rs. 247.95

Rs. 20,359.89 crore

20.34%

14.29%

सुंदरम अग्ग्रेसिव्ह हायब्रीड फंड - डायरेक्ट प्लॅन - ग्रोथ (Sundaram Aggressive Hybrid Fund- Direct Plan- Growth)

Rs.123.45

Rs. 3106.16 crore

15.59%

10.89%

कोटक इक्विटी हायब्रीड फंड - डायरेक्ट प्लॅन - ग्रोथ (Kotak Equity & Hybrid Fund- Direct Plan- Growth)

Rs 45.36

Rs. 2907.93 crore

17.99%

13.22%

हायब्रीड म्युच्युअल फंड हा म्युच्युअल फंडाचा एक प्रकार आहे, जो इक्विटी व कर्ज मालमत्तेचे संयोजन अशा एकापेक्षा जास्त मालमत्ता प्रकारात तर काहीवेळा सोने व रिअल इस्टेट यातही गुंतवणूक करतात.

तक्ता स्त्रोत: https://navi.com/mutual-fund

(डिसक्लेमर: शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स व म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)