Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे काय? या फंडमध्ये कोणी गुंतवणूक करावी?

What is Equity Funds

Equity Mutual Fund : इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याचा ट्रेण्ड अलीकडच्या काळात चांगलाच वाढला आहे. गुंतवणुकीच्या इतर कोणत्याही पर्यायात इक्विटीइतके रिटर्न देण्याची क्षमता दिसत नाही.

इक्विटी म्युच्युअल फंड हे सर्व मार्केटमधील सर्व प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून चांगले रिटर्न्स (High Returns) मिळवण्याचा प्रयत्न करतात. इक्विटी फंड हा म्युच्युअल फंड प्रकारातील सर्वात जोखीम असणारा प्रकार आहे; म्हणूनच कदाचित डेब्ट फंड आणि हायब्रिड फंड (Debt & Hybrid Fund)पेक्षा जास्त परतावा देण्याची क्षमता इक्विटी फंडमध्ये असते. अर्थात, गुंतवणूकदारांना त्या पटीने रिटर्न्स देण्यात त्या कंपनीची कामगिरीसुद्धा तितकिच महत्त्वाची असते.

इक्विटी फंड कसे काम करतात? How do Equity Fund works?

इक्विटी म्युच्युअल फंड हे त्यांच्या एकूण निधीपैकी किमान 60 टक्के निधी हा वेगवेगळ्या कंपन्यांच्या इक्विटी शेअर्समध्ये गुंतवतात. ही गुंतवणूक विशिष्ट उद्दिष्टानुसार केली जाते. याचा निर्णय त्या फंड हाऊसचा फंड मॅनेजर घेत असतो. फंड मॅनेजर त्याच्या अभ्यासानुसार आणि शेअर मार्केटमधील परिस्थितीनुसार इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये जमा झालेला निधी लहान, मध्यम किंवा मोठ्या कंपन्यांच्या (Small-Cap, Mid-Cap Or Large-Cap) शेअर्समध्ये गुंतवू शकतो. ही गुंतवणूक Value Oriented किंवा growth oriented या प्रकारची असू शकते. इक्विटीमध्ये किमान निधी गुंतवल्यानंतर उरलेला निधी डेब्ट आणि मार्केटमधून चांगले रिटर्न मिळवून देणाऱ्या स्कीममध्ये गुंतवला जाऊ शकतो. तसेच अशा योजनांमध्ये गुंतवलेला निधी खरेदी किंवा विक्री करण्याचा निर्णय फंड मॅनेजर सतत घेत असतो. जेणेकरून त्याला मार्केटच्या परीस्थितीचा फायदा घेऊन त्यातून जास्तीत जास्त रिटर्न मिळू शकतात.

इक्विटी फंडमध्ये कोणी गुंतवणूक करावी? Who Should invest in Equity Fund?

इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय हा तुमच्या जोखीम प्रोफाईल, गुंतवणुकीच्या मर्यादा आणि उद्दिष्टांवर आधारित असणे योग्य आहे. उदाहरणार्थ, तुम्हचे उद्दीष्ट दीर्घकालीन असेल. जसे की, 5 वर्षे किंवा त्याहून अधिक. तर अशा उद्दिष्टांसाठी इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरू शकते. यामुळे बाजारातील चढ-उतारांचा (Volatility) फायदा किंवा भरपाई भरून काढण्यास आवश्यक वेळ मिळतो.


इक्विटी फंडाची वैशिष्ट्ये | Features of Equity Fund

गुंतवणुकीवरील खर्च (Cost of Investment)

इक्विटी शेअर्सच्या सततच्या खरेदी आणि विक्रीचा इक्विटी फंडाच्या खर्चाच्या गुणोत्तरावर परिणाम होतो. यामुळे सेबीने (Securities and Exchange Board of India - SEBI) इक्विटी फंडाच्या खर्चाचे प्रमाण 2.5 % मर्यादित केले. यामुळे कमी खर्चात गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त परतावा मिळू शकतो.

होल्डिंग कालावधी (Holding Period)

गुंतवणूकदार त्यांच्या फंडमधील युनिट्स रिडीम (विकून) करून त्यावर नफा मिळवतात. हा नफा करपात्र (Taxable) असतो. टॅक्स आकारण्याचा दर हा गुंतवणूकदाराने किती काळ गुंतवणूक केली आहे; यावर अवलंबून असतो. या कालावधीलाच होल्डिंग कालावधी (Holding Period) म्हणतात. एका वर्षापेक्षा कमी कालावधीच्या इक्विटी होल्डिंग्सला अल्प-मुदतीची (Short Term) गुंतवणूक मानली जाते आणि त्यातून मिळणाऱ्या अल्प मुदतीच्या नफ्यावर (Short Term Gain) 15 टक्के टॅक्स आकारला जातो. तर एका वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या इक्विटी होल्डिंगला दीर्घ मुदतीची (Long Term) गुंतवणूक समजली जाते. त्यावर मिळणाऱ्या दीर्घकालीन नफ्यावर (Long Term Gain) 10 टक्के दराने टॅक्स आकारला जातो. एका वर्षात इक्विटी फंडमधून 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नफा झाला असेल तरच 10 टक्के टॅक्स लागू होतो.

कमी खर्चात वैविध्यपूर्ण गुंतवणूक (Cost-Efficiency & Diversification)

इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक केल्याने, तुम्हाला अनेक स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याचे एक्सपोजर मिळते. तसेच तुम्ही अगदी किरकोळ रक्कम गुंतवून हा फायदा मिळवू शकता. पण यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जोखीमसुद्धा प्रवेश करते.


इक्विटी फंडाचे प्रकार (Types of Equity Fund)

गुंतवणुकीच्या उद्दिष्टानुसार आणि ते कोणत्या प्रकारच्या स्टॉक्स आणि क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करतात यावर आधारित त्याचे प्रकार पाडले जातात.

सेक्टर आणि थीमवर आधारित (Based on Sector and Theme)

विशिष्ट क्षेत्र किंवा थीमवर आधारित गुंतवणूक करणारे फंड इक्विटी फंड या प्रकारात येतात. सेक्टर फंड हे एखाद्या विशिष्ट उद्योगात गुंतवणूक करतात. जसे की, FMCG, फार्मा किंवा टेक्नॉलॉजी. तर थिमॅटिक फंड एका विशिष्ट विषयावर किंवा थीमवर आधारित गुंतवणूक करतात. उदाहरणार्थ, नव्याने सुरू झालेल्या कन्झ्युमरबेस कंपन्या किंवा आंतरराष्ट्रीय स्टॉक (International Stocks).

मार्केट कॅपिटलायझेशनवर आधारित (Based on Market Capitalization)

लार्ज-कॅप इक्विटी फंड (Large Cap Equity Fund)

लार्ज-कॅप कंपन्या या बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालेल्या कंपन्या असतात म्हणूनच लार्ज-कॅप फंड स्थिर परतावा (Stable Returns) देण्यास सक्षम असतात.

मिड-कॅप इक्विटी फंड (Mid Cap Equity Fund)

हे फंड मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. मिड-कॅप इक्विटी फंड लार्ज-कॅप फंडसारखे स्थिर नसतात.

मिड-आणि-स्मॉल-कॅप फंड (Mid & Small Cap Fund)

हे फंड मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप अशा प्रकारच्या फंडांमध्ये/कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. त्यातून ते चांगला परतावा देऊ शकतात.

स्मॉल-कॅप फंड (Small Cap Fund)

हे फंड स्मॉल-कॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. स्मॉल-कॅप फंड हे नेहमीच बाजारातील अस्थिरता आणि जोखमीला भरीस पडतात. म्हणजेच याचा त्यांच्यावर लगेच परिणाम होत असतो. याची जाणीन गुंतवणूकदारांनी ठेवली पाहिजे.

मल्टी-कॅप फंड (Multi Cap Fund)

मल्टी-कॅप फंड सर्व मार्केटमधील सर्वा प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. बाजाराच्या स्थितीनुसार फंड मॅनेजर मुख्यत्वे विशिष्ट ठिकाणी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेत असतो.

इक्विटी फंडात गुंतवणुकीचे फायदे (Benefits of Investing in Equity Funds)

  • एक्सपर्ट मनी मॅनेडमेंट 
  • कमी खर्च
  • सोयीनुसार गुंतवणूक
  • वैविध्यपूर्ण गुंतवणूक
  • पद्धतशीर गुंतवणूक
  • फ्लेक्सीब्लिटी
  • लिक्विडिटी