Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Online Gaming: ऑनलाईन गेमिंगचे भारतातील पहिले Center Of Excellence 'शिलॉंग'मध्ये होणार!

Online Gaming

Image Source : www.menafn.com

Online Gaming: शिलॉंगमध्ये ऑनलाईन गेमिंगसाठी भारतातील पहिले Center Of Excellence स्थापन करण्यात येईल असे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले आहे.

Online Gaming: ऑनलाईन गेमिंग सेंटर हे डिजिटल इंडिया स्टार्टअप हब सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडियाच्या(Digital India Startup Hub Software Technology Park of India) माध्यमातून लवकरच उभारण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने(Ministry of Electronics and Information Technology) अलीकडेच सल्लामसलत करण्यासाठी ऑनलाईन गेमिंगच्या संदर्भात IT नियम 2021 चा मसुदा जारी केला आहे. शिलॉंगमध्ये(Shillong) ऑनलाईन गेमिंगसाठी भारतातील पहिले Center Of Excellence स्थापन करण्यात येईल असे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर(Rajeev Chandrasekhar) यांनी सांगितले आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.

याठिकाणी होणार ऑनलाईन गेमिंगचे पहिले ‘Center Of Excellence’

शिलॉंगमध्ये(Shillong) ऑनलाईन गेमिंगसाठी भारतातील पहिले Center Of Excellence स्थापन करण्यात येईल असे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर(Rajeev Chandrasekhar) यांनी सांगितले आहे. त्यावेळी ते म्हणाले की, Center Of Excellence ऑनलाईन गेमिंगसाठी ईशान्य भागातील स्टार्टअप्स आणि उद्योजकांना गेमिंग इकोसिस्टीम तयार करण्याची प्रेरणा देणार आहे. स्टार्टअप्स व उद्योजकांची पुढची लाट ही शिलॉंग, कोहिमा आणि पूर्वेकडील राज्यातून यावी असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्देश आहे. यावेळी त्यांनी शिलॉंगमधील सॉफ्टवेअर पार्कला भेट दिली असून स्किल्स आत्मसात करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शनही केले आहे. डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी शिलॉंग येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटी(NIELIT) अंतर्गत अत्याधुनिक सुविधा उभारणार असल्याचे देखील सांगितले आहे.

महिला व मुलांसाठी ऑनलाईन गेमिंग अधिक सुरक्षित बनवण्याचे आवाहन

भारतीय कायद्यानुसारच ऑनलाईन गेम(Online games) ऑफर केले जात असून तयार करण्यात आलेल्या मसुद्यात स्वयं नियामक यंत्रणा प्रस्तावित करण्यात आली आहे. तयार करण्यात आलेल्या गेमिंगमध्ये हिंसक, व्यसनावर आधारित आणि लैंगिक काही नाल्याची खात्री केली जाणार आहे. ऑनलाईन गेमिंगसाठी नियम तयार करण्यात येणार असून जे पुढील महिन्यापासून लागू होतील. त्यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, व्हर्चुअल रिऍलिटी आणि Metaverse यांचा देखील समावेश करण्यात येणार आहे. महिला आणि मुलांसाठी ऑनलाईन गेमिंग तयार करताना अधिक सुरक्षा डेव्हलप करण्याचे आवाहन त्यांनी केले.