Online Gaming Policy: सध्या जगभरात मोठ्या प्रमाणावर गेमिंग इंडस्ट्री(Gaming Industry) विकसित होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियासाठी केंद्र सरकारने(Central Govt) सन 2021 मध्ये लागू केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान नियमांतर्गत ऑनलाईन गेमिंग हा उद्योगामध्ये आणण्यात आला आहे. या अंतर्गत ऑनलाईन गेमिंग(Online Gaming) उद्योगासाठी नवीन नियामकाची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच या खेळांमध्ये सहभागी होणाऱ्यांची पडताळणी सुद्धा केली जाणार असून ऑनलाईन गेम तयार करणाऱ्या कंपन्यांना नोंदणी(Registration) करणे यापुढे बंधनकारक होणार आहे . याविषयीच्या नियमांचा मसुदा सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. चला तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
कंपन्यांना नोंदणी करणे असेल बंधनकारक
ऑनलाईन गेमिंगची सुविधा देणाऱ्या कंपनीला खेळासंदर्भातील अॅप(Gaming App) बाजारात आणण्यापूर्वी सर्व नियमांची(Rules) पूर्तता करणे यापुढे बंधनकारक असणार आहे. याखेरीज संबंधित कंपनीला ऑनलाईन गेम लाँच(Game Launch) करता येणार नाही, तो गेमिंग साईटवर(Gaming Site) दर्शवता सुद्धा येणार नाही, कुणाला शेअर करण्याची सुविधा देखील देता येणार नाही तसेच कुणाला खेळण्यासाठी उपलब्धही करून देता येणार नाही. ऑनलाईन गेमिंग कंपनीने स्वतःची नोंदणी प्रक्रिया केल्यानंतर आपल्या साईटवर नोंदणी झाल्याचे चिन्ह(Symbol) दाखवावे लागणार आहे. त्याचप्रमाणे खेळणाऱ्याना किती शुल्क द्यावे लागेल, सशुल्क कोणते खेळ खेळता येतील किंवा एखाद्या खेळात सहभागी वापरकर्ता जिंकल्यास त्याला कशाप्रकारे बक्षीस मिळेल याविषयीचे नियम साईटवर ठळकपणे दाखवावे लागणार आहेत. वापरकर्त्याचे खाते उघडून त्यांची नोंदणी करण्यापूर्वी त्याची केवायसी प्रक्रियाही पूर्ण करून घ्यावी लागणार आहे. याबाबत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने लोकांकडून 17 जानेवारीपर्यंत सूचना व प्रस्ताव मागवले आहेत.
बेटिंग किंवा सट्टा लावण्याची सुविधा पूर्णपणे बंद
ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना कोणत्याही खेळात बेटिंग किंवा सट्टा लावण्याची सुविधा देण्यावर पूर्णतः बंदी घालण्यात आल्याचे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी(IT) मंत्री राजीव चंद्रशेखर(Rajeev Chandrashekhar) यांनी सोमवारी सांगितले आहे. ही नियमावली फेब्रुवारीच्या सुरुवातीला तयार होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. सरकारने तयार केलेला या मसुद्याचे सर्व पातळ्यांवर स्वागत करण्यात येत आहे. या नियमावलीमुळे गेमिंग व्यावसायिक व खेळाडू यांच्यामध्ये समतोल साधून पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होणार आहे.