Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian Rupee: रुपयाच्या मजबुतीचे 'असेही'प्रयत्न, कसा मिळतोय अन्य देशांचा प्रतिसाद?

Indian Rupee

Indian Rupee आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरलसमोर आव्हान उभे करणार आहे. आतापर्यंत डॉलर आणि इतर चलनात जागतिक व्यापार होत असतात. पण भारतीय रुपया त्याला पर्याय म्हणून उभा राहणार आहे. भारतीय रुपया आंतरराष्ट्रीय चलन म्हणून नवीन ओळख प्रस्थापित करण्याच्या दिशेने पुढे चालला आहे. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास अमेरिकन डॉलरनंतर (US Dollars) भारतीय रुपया जागतिक पातळीवर दुसरे मोठे चलन ठरेल, अशी शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात Indian Rupee डॉलरलसमोर आव्हान उभे करणार आहे.  आतापर्यंत डॉलर आणि इतर चलनात जागतिक व्यापार होत असतात.  पण भारतीय रुपया त्याला पर्याय म्हणून उभा राहणार आहे. भारतीय रुपया आंतरराष्ट्रीय चलन म्हणून नवीन ओळख प्रस्थापित करण्याच्या दिशेने पुढे चालला आहे. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास  अमेरिकन डॉलरनंतर (US Dollars) भारतीय रुपया जागतिक पातळीवर दुसरे मोठे चलन ठरेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. 

अन्य देशांचा Indian Rupee ला कसा आहे प्रतिसाद ?

WION या संकेतस्थळाप्रमाणे श्रीलंकेने भारतीय रुपयाला पसंती दिलेली आहे.  श्रीलंका सध्या आर्थिक संकटात सापडली आहे. श्रीलंकेकडून  रुपी ट्रेडिंग खाते सुरु करण्यात आले  आहे. या खात्याला  Vostro Accounts असेही  म्हटले जाते.  श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेने भारतीय रुपयाला विदेशी चलन म्हणून मान्यता दिलेली आहे.

भारताच्या या प्रयत्नांमुळे श्रीलंकन नागरिकाला आता लाखो रुपये रोख ठेवता येतील.  8 लाख 26 हजार 823 रुपये म्हणजेच  10 हजार अमेरिकन डॉलर रोख ठेवता येणार आहेत.  याचाच  अर्थ असा की, आता श्रीलंकन नागरिक  आणि व्यापारी डॉलर ऐवजी भारतीय रुपयामध्ये (Indian Rupee) सहज व्यापार करु शकणार आहेत. तसेच  खरेदी-विक्रीसाठी भारतीय चलनाचा वापर करु शकणार आहेत.  

या वर्षीच्या  जुलै महिन्यात केंद्र सरकारने ही महत्वाकांक्षी योजना सुरु केली होती. ज्या देशात अमेरिकन डॉलरची गंगाजळी कमी आहे, अशा देशांना आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी भारतीय रुपयांचा पर्याय उपलब्ध करुन दिला गेला. त्यामुळे या देशांना भारतीय रुपयांमध्ये व्यापारी सौदे आणि व्यवहार, सेटलमेंट पूर्ण करता येतील.

रशिया, श्रीलंका, मॉरिशसचा प्रतिसाद

भारताच्या या प्रयत्नांना 3 देशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये रशिया, श्रीलंका,  मॉरिशसचा समावेश आहे. यामुळे या योजनेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI)  आतापर्यंत 18 Vostro Accounts सुरु केलेली  आहेत. यामध्ये रशियासाठी 12, श्रीलंकेसाठी 5 तर मॉरिशससाठी 1 खात्याचा समावेश झालेला आहे.  या तीन देशांमध्ये भारतीय रुपया आंतरराष्ट्रीय चलन म्हणून वापरता येणार आहे.

संपूर्ण जग सध्या पुन्हा एकदा कोरोना महामारीमध्ये अडकत चालल्याचे चित्र निर्माण होत आहे. दुसरीकडे रशिया-युक्रेन वादाचीही समस्या आहे. या परिस्थितीत भारताने हे एक मोठे धोरण आखले आहे. त्यामुळे जागतिक व्यवहारात भारतीय चलनाला महत्व येईल, अशी चिन्हे दिसत आहेत.