रेल्वेच्या माल लोडिंगमध्ये (Freight Loading in Railways) यावर्षी लक्षणीय वाढ झाली आहे. भारतीय रेल्वे (Indian Railways) हे जगातलं सगळ्यात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. दरवर्षी साधारण 3 कोटी लोक प्रवासासाठी रेल्वेचा वापर करतात. देशातल्या माल वाहतुकीतही रेल्वेचा वाटा मोठा आहे. या घडीला देशातील सगळ्यात जास्त मालवाहतूक रेल्वेनं होते. चालू आर्थिक वर्षं 2022-23मध्ये भारतीय रेल्वेनं माल वाहतुकीत नवा उच्चांक केला आहे. डिसेंबरच्या 6 तारखेपर्यंत रेल्वेनं तब्बल 100.2 टन सामानाचं लोडिंग केलं आहे. भारतीय रेल्वेनं प्रसिद्धी पत्रक काढून ही माहिती दिली आहे.
डिसेंबर महिना संपण्याच्या आत शंभरचा आकडा पार करणं ही मोठी गोष्ट मानली जात आहे. मागच्या वर्षी डिसेंबरच्या 6 तारखेपर्यंत हा आकडा 92.64 टन इतका होता. म्हणजे गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी 8.25% लोडिंग जास्त झालंय. आणि शंभर टन पूर्ण होण्यासाठी गेल्यावर्षी डिसेंबर संपावा लागला होता.
रेल्वेची कमाईही वाढली Increase in Railway Income
रेल्वेनं आपल्या प्रसिद्धी पत्रकात कमाईचे आकडेही दिले आहेत. डिसेंबरपर्यंत केलेल्या लोडिंगमधून रेल्वेला 1,08,593 कोटी रुपये इतकी कमाई झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीच रेल्वेची कमाई 93,532 कोटी रुपये इतकी होती.
रेल्वेनं केलेल्या वाहतुकीत कोळशाचं प्रमाण सर्वाधिक म्हणजे 48.5 कोटी टन इतकं आहे. आणि कोळसा वाहतुकीतही 14.25% टक्क्यांची वृद्धी झाली आहे. तर त्या खालोखाल वाहतूक बॉक्साईट, धातू, वाहनं, जिप्सम सॉल्ट, मीठ यांची झाली आहे.