Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM Modi Mann ki Baat: 2022 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर

Mann ki Baat

PM Modi Mann ki Baat: G20 देशांच्या संघटनेचं अध्यक्षपदही भारताला याच वर्षात मिळाल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

PM Modi Mann ki Baat: यंदाच्या वर्षातील 2022 मधील 'मन की बात(Man ki Baat)' या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधून नागरिकांना संबोधित केलं. 2022 मध्ये सर्वच क्षेत्रात भारताने आपल्या क्षमतेचं दमदार दर्शन घडवलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात(Man ki Baat)' या कार्यक्रमात म्हणाले. यावेळी त्यांनी 2022 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर असल्याचं सांगितलं.

मोदींनी कोणते मुद्दे मांडले?

  • यंदाचे वर्ष हे भारतासाठी खास आहे. त्याचे कारण म्हणजे भारताने स्वातंत्र्य प्राप्तीची 75 वर्षे(75 years of independence) पूर्ण केली आहेत. देशातील विकासाला मिळालेला वेग आणि देशवासीयांनी केलेल्या सर्वोत्तम कामगिरीमुळे आज जगभरात भारतासाठी एक विशेष स्थान निर्माण झाले आहे 
  • 2022 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर(Fifth position in the world) पोचली आहे
  • यावर्षात भारताने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा(corona vaccination) 220 कोटी डोसचा टप्पा पार केला
  • भारताची निर्यात क्षमता 40 कोटी डॉलर्स पर्यंत पोहोचली आहे  तसंच पूर्णपणे भारतात निर्माण झालेली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत(INS Vikrant) याच वर्षी नौदलात दाखल झाली
  • भारताला याच वर्षात G 20 देशांच्या संघटनेचं अध्यक्षपदही मिळालं
  • देशातील लोकांनी एकता आणि एकजुट साजरी करण्यासाठी अद्भूत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले मग त्यामध्ये गुजरातमधली माधवपुर जत्रा असो, जिथे रुक्मिणी विवाह आणि भगवान श्रीकृष्णाचे ईशान्य क्षेत्राशी असलेले संबंध साजरे केले जातात, किंवा काशी-तमिळ संगमम असो, या सर्व पर्वांमध्ये सुद्धा एकतेचे अनेक रंग पाहायला मिळाले 
  • ऑगस्ट महिन्यात राबविण्यात आलेली ‘हर घर तिरंगा(Har Ghar Tiranga)' मोहिमेमुळे अवघा देश तिरंगामय झाला. 6 कोटी पेक्षा जास्त लोकांनी तिरंग्यासोबत काढलेले सेल्फी पाठवल्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीचा हा अमृत महोत्सव कायमस्वरूपी लक्षात राहिला
  • आयुर्वेद आणि योगासारख्या भारतीय पारंपरिक उपचार पद्धती जगात मागे पडत होत्या मात्र आता स्तनांच्या कर्करोगावर(Breast Cancer) योग साधनेचा उपयोग होत असल्याचं सिद्ध झालं आहे. कर्करोग उपचारांसाठी नावाजले मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयाने(Tata Cancer Hospital in Mumbai) केलेल्या रिसर्चमधून हे समोर आलं  आहे आणि याची दखल अमेरिकेत झालेल्या परिषदेत मांडण्यात आली