Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Income Tax Returns : सरकारने 2.40 लाख कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स रिटर्न केला जारी

Income Tax Returns

करदात्यांना दिलासा देत केंद्र सरकारने आयकर परतावा (Income Tax Return) जारी केला आहे. 1 एप्रिल 2022 ते 10 जानेवारी दरम्यान सरकारने 2.40 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे.

करदात्यांना दिलासा देत केंद्र सरकारने आयकर परतावा (Income Tax Return) जारी केला आहे. 1 एप्रिल 2022 ते 10 जानेवारी दरम्यान सरकारने 2.40 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी केला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण 58.74 टक्के अधिक आहे. पीआयबीने रिफंडबाबत माहिती दिली आहे. तुम्हालाही अद्याप प्राप्तिकर परतावा मिळाला नसेल, तर तुम्ही तुमची स्थिती (Income Tax Refund Status) तपासू शकता. कसे तपासायचे ते जाणून घेऊया.

असा तपासा रिफंड स्टेटस

आयकर विभाग करदात्यांना त्यांची आयटीआर रिफंड स्टेटस तपासण्याची परवानगी देतो. आर्थिक वर्षात तुमचा आयटीआर भरल्यानंतर तुम्ही तुमच्या आयकर रिटर्नची स्थिती तपासू शकता. मात्र, आयकर विभागाकडून प्रोसेस होईपर्यंतच तुम्हाला परतावा मिळू शकतो.

लॉगिन न करता आयटीआर स्टेटस तपासा

  • सर्वप्रथम आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर जा.
  • आता इन्कम टॅक्स रिफंड स्टेटस वर क्लिक करा.
  • एकदा नवीन पृष्ठ उघडल्यानंतर, तुम्हाला पावती क्रमांक आणि वैध मोबाइल क्रमांक प्रविष्ट करावा लागेल.
  • पुढील टप्प्यात तुम्ही OTP टाका आणि सबमिट करा.
  • आता तुमच्या समोर संपूर्ण स्टेटस ओपन होईल.

तुम्ही यूजर आयडी आणि पासवर्डसह आयकर रिटर्न देखील तपासू शकता. यासाठी तुम्हाला ई-फायलिंग पोर्टलवर जाऊन यूजर आणि पासवर्डने लॉग इन करावे लागेल. यानंतर, तुम्ही आयटीआर स्टेटस पर्यायावर क्लिक करून संपूर्ण माहिती मिळवू शकता.

पावती क्रमांक कसा आणि कुठे मिळेल?

इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवर स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला पावती क्रमांक आवश्यक आहे. आयटीआर फाइलिंग दरम्यान तुम्हाला मेलवर पोचपावती क्रमांक पाठवला जातो. तसेच, इन्कम टॅक्स वेबसाइटवर लॉग इन केल्यानंतर रिटर्न पावती डाउनलोड करून तुम्ही ती घेऊ शकता.