आर्थिक वर्ष 2022-23 साठी आर्थिक विवरणपत्र (Income tax Return) भरण्याची शेवटची तारीख 31 मार्च होती. पण, ती टळली असेल तर दंडासह विवरणपत्र भरण्याची शेवटची मुदत 31 डिसेंबर ही आहे. त्यामुळे न्यू ईयर सेलिब्रेशन (New Year) पूर्वी विवरणपत्र भरलंय की नाही याची खात्री करून घ्या.
सर्वसाधारणपणे त्या आर्थिक वर्षाच्या 31 जुलैपर्यंत आपल्याला आर्थिक विवरणपत्र भरायचं असतं. पगारदार व्यक्ती, छोटे उद्योजक आणि व्यावसायिक यांच्यासाठी यांना ITR1 भरायचा असतो . आणि त्यासाठीची ही मुदत आहे. पण, पहिल्या मुदतीत विवरणपत्र भरून झालेलं नसेल तर तो बिलेटेड म्हणजे विलंबित रिटर्न धरला जातो. आणि असं विवरणपत्र भरण्यासाठी आयकर कायद्याच्या 139(4) कलमाचं संरक्षण आहे.
विलंबाने भरायचं विवरणपत्र आर्थिक वर्षं संपायच्या तीन महिने आधीपर्यंत भरता येतं. अर्थात, त्यासाठी विलंब का झाला त्याचं कारण आणि विलंब झाल्याबद्दल अतिरिक्त शुल्क द्यावं लागतं. विलंब शुल्क आहे 5,000 रुपयांचं. आणि विलंबाने विवरणपत्र भरल्याचा आणखी एक तोटा म्हणजे त्याचं प्रोसेसिंग नियमित विवरणपत्रांबरोबर होत नाही.
आणि यामध्ये मागच्या वर्षी झालेला तोटा पुढच्या वर्षी गृहित धरला जात नाही.
विलंब शुल्कामध्ये तुम्हाला सूट मिळू शकेल. पण, त्यासाठी तुमचं एकूण उत्पन्न करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत असलं पाहिजे. म्हणजे 60 वर्षांखालील लोकांसाठी 2.5 लाखांच्या आत. आणि 80 वर्षांवरील लोकांसाठी 5 लाखांच्या आत. मात्र या मर्यादेच्या बाहेरच्या लोकांना 31 डिसेंबर नंतर स्वखुशीने विवरणपत्र भरता येणार नाही. त्यासाठी विलंब शुल्क आणि जास्त कडक तपासणीची तयारी ठेवावी लागेल.