Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Post Office Schemes : आर्थिक गुंतवणुकीचा विचार करताय? पोस्टाच्या 'या' योजनांमध्ये मिळतोय 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर

Post Office Schemes

Post Office Scheme : खासगी योजनांमधील आर्थिक गुंतवणुकीपेक्षा सरकारी योजनांमध्ये केलेली गुंतवणूक ही अधिक सुरक्षित मानली जाते. तुम्हीही मासिक किंवा वार्षिक आधारावर गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्टातील काही योजनांबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. ज्यामध्ये 7 टक्क्यांहून जास्त व्याजदर देण्यात येत आहे.

तुम्हीही सर्वाधिक परतावा मिळावा या विचाराने आर्थिक गुंतवणुकीच्या विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवू शकता. या योजना सरकारी असल्याने यातील पैशांची हमी सरकार घेते. तसेच 7 टक्क्यांहून जास्त व्याजदर आणि कर सवलतीचा फायदा यामध्ये ग्राहकांना मिळत आहे. आर्थिक गुंतवणुकीवर जास्त व्याजदर देणाऱ्या  पोस्टाच्या योजनांबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Saving Certificate)

यावर्षीच्या देशाच्या आर्थिक बजेटमध्ये  केंद्रीय अर्थमंत्री  निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी खास महिलांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची (Mahila Samman Saving Certificate) घोषणा केली. या योजनेत केवळ महिलाच दोन वर्षासाठी गुंतवणूक करून सर्वोत्तम परतावा मिळवू शकतात. ही योजना केवळ 2025 पर्यंत वैध आहे. या योजेनेत गुंतवणूक करण्यासाठी पोस्टात खाते ओपन करावे लागेल. या योजनेत किमान 1000 रुपयांपासून ते कमाल 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. याचा परिपक्व कालावधी हा 2 वर्षाचा आहे. यातील गुंतवणुकीवर ग्राहकांना 7.5 टक्के व्याजदर देण्यात येत आहे.

पीपीएफ (PPF)

भारतीयांना गुंतवणुकीची सवय लावण्यासाठी भारत सरकारने पीपीएफ (PPF) योजनेची सुरुवात केली. यामध्ये कोणतीही सर्वसामान्य व्यक्ती गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकते. यामध्ये वार्षिक आधारावर किमान 500 रुपये, तर कमाल 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. सध्या या योजनेत ग्राहकांना 7.1 टक्के व्याज देण्यात येत आहे. या योजनेचा परिपक्व कालावधी हा 15 वर्षाचा आहे. आयकराच्या 80C अंतर्गत ग्राहकांना यामध्ये कर सवलतीचा लाभ घेता येतो.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (Post Office Time Deposit)

पोस्टाच्या टाइम डिपॉझिट योजनेत (Post Office Time Deposit) ग्राहक वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. यातील गुंतवणूक ही 1, 2, 3 आणि 5 वर्षाच्या निहित कालावधीसाठी करता येते.याचा परिपक्व कालावधी हा गुंतवणुकीवर निश्चित असतो. सध्या यातील 3 वर्षाच्या गुंतवणुकीवर ग्राहकांना 7 टक्के तर 5 वर्षाच्या गुंतवणुकीवर 7.5 टक्के व्याज देण्यात येत आहे. किमान 200 रुपयांपासून यामध्ये गुंतवणुक करता येते. तसेच यातील गुंतवणुकीवर ग्राहकांना कर सवलत देण्यात येत आहे.

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (Post Office Monthly Income Scheme)

पोस्टाच्या मंथली इनकम स्कीममध्ये (Post Office Monthly Income Scheme) कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करु शकते. त्यासाठी त्या व्यक्तीला पोस्ट ऑफिसमध्ये खाते ओपन करावे लागेल. या योजनेत मासिक स्वरूपात गुंतवणूक करता येते. त्यासाठी किमान 1000 रुपये, तर कमाल 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. यातील गुंतवणुकीवर ग्राहकांना मासिक स्वरूपात व्याज देण्यात येते. वार्षिक स्वरूपात यामध्ये ग्राहकांना 7. 4 टक्क्यांच्या हिशोबाने व्याजदर देण्यात येत आहे.

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (National Savings Certificate)

पोस्टाच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (National Savings Certificate) योजनेत ग्राहक 5 वर्षासाठी पैशांची गुंतवणूक करू शकतात. यामध्ये किमान 1000 रुपये गुंतवणे गरजेचे आहे. सध्या या योजनेत ग्राहकांना 7.7 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. याशिवाय आयकराच्या 80 C अंतर्गत 1.5 लाखांच्या गुंतवणुकीवर कर सवलत देण्यात आली आहे.

Source: hindi.moneycontrol.com