Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MSSC : महिलांसाठी नवी गुंतवणूक योजना, परतावा किती अन् फायदे काय? वाचा...

MSSC : महिलांसाठी नवी गुंतवणूक योजना, परतावा किती अन् फायदे काय? वाचा...

Mahila Samman Saving Certificate : महिलांना गुंतवणूक करण्यासाठी आजपासून आणखी एक नवा कोरा पर्याय उपलब्ध झालाय. आजपासून नवं आर्थिक वर्ष सुरू झालंय. त्या पार्श्वभूमीवर ही योजनाही आजपासूनच कार्यान्वित झालीय. महिला सन्मान बचत पत्र योजना (MSSC) असं या योजनेचं नाव आहे. गुंतवणूक करत असताना यातून मिळणारा परतावाही फायदेशीर असल्याचं दिसून येतं. सविस्तर जाणून घेऊ...

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला. यावेळी गुंतवणुकीच्या योजनांची माहिती त्यांनी दिली. दरवर्षी महिलांसाठी काही घोषणा होत असतात. यावर्षीदेखील अर्थमंत्र्यांनी महिलांसाठी बचत योजना आणलीय. महिला सन्मान बचत पत्र योजना (Mahila Samman Saving Certificate) म्हणजेच MSSC ही ती योजना आहे. ही योजना नव्या आर्थिक वर्षापासून म्हणजेच 1 एप्रिलपासून सुरू होणार होती. आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झालंय. त्यामुळे आता महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना गुंतवणुकीत योग्य असा परतावा (Return) मिळणार असून ही योजना महिलांसाठी फायदेशीर ठरू शकते.

काय म्हणाले होते मोदी?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत महिलांना 7.5 टक्के व्याजदर दिला जाणार आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गृहिणी असलेल्या महिलांनाही सक्षम केलं, असं या योजनेच्या घोषणेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. महिला सक्षमीकरणावर एक वेबिनार आयोजित करण्यात आला होता. त्यात त्यांनी हे मत मांडलं होतं.

एकवेळची गुंतवणूक

महिला सन्मान बचत पत्र योजना ही एकवेळची गुंतवणूक योजना आहे. मात्र तरीदेखील त्यावर मिळणाऱ्या व्याजामुळे ही योजना अधिकच आकर्षक झालीय. एमएसएससी योजनेद्वारे महिलांना 7.5 टक्के दरानं व्याज मिळणार आहे. मुदत ठेव योजनेप्रमाणेच ही एक योजना आहे. वयाची अट नाही. कोणत्याही वयातली मुलगी किंवा महिला यामध्ये गुंतवणूक करू शकणार आहेत. गुंतवणुकीची मर्यादा मात्र 2 लाख रुपये आहे. महिला या योजनेत 2 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे गुंतवणूक करू शकत नाहीत.

इतर योजनांपेक्षा अधिक फायद्याची

बँका तसंच पोस्ट ऑफीसच्या विविध योजना सध्या सुरू आहेत. एफडीदेखील अशीच योजना आहे. पोस्ट ऑफीसमध्ये सध्या पाच वर्षांच्या एफडीवर 7 टक्के दरानं व्याज मिळतं. त्याचबरोबर दोन वर्षांच्या एफडीवर 6.8 टक्के दराने व्याज मिळतं. हा विचार करता महिला सन्मान बचत पत्र योजना एक चांगला गुंतवणुकीचा पर्याय ठरतो. तिकडे 6.8 टक्के दर दोन वर्षात मिळतो तर त्याच कालावधीत इकडे मात्र 7.5 टक्के व्याज मिळतं. हा एक फायदा. तर दुसरा फायदा म्हणजे अंशत: पैसे काढण्याची सुविधा यात मिळते. मुदत ठेवीमध्ये हा पर्याय उपलब्ध नाही.

...मात्र तोटेही आहेत

महिला सन्मान बचत पत्र योजना फायद्याची असली तरी काही तोटेदेखील पाहायला मिळतात. या योजनेत मिळणारं व्याज चांगलं आहे, पण गुंतवणुकीच्या रकमेची मर्यादा केवळ 2 लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आलीय. त्यामुळे एखाद्या महिलेला यामध्ये अधिक पैसे गुंतवायचे असतील तर पर्याय उपलब्ध नाही. या योजनेचा कालावधीही केवळ दोनच वर्षांचा आहे. म्हणजे 2025पर्यंत याचा लाभ घेता येईल, त्यानंतर नाही. यावर मिळणारं व्याज करमुक्त असेल की नाही, याबाबतही साशंकता आहे. त्यामुळे फायद्यांसह तोट्याचा सौदा या योजनेत करावा लागू शकतो.