Paper Cup Business: स्वच्छ भारत अभियानाला चालना देण्यासाठी सरकारने प्लॅस्टिक बंदी आणली आहे. त्यामुळे पेपरचा वापर वाढत चालला आहे. कोणत्याही कार्यक्रमात आता डिस्पोजेबल पेपर कप वापरण्याचा ट्रेंड आहे. याच ट्रेंडचा तुम्ही फायदा घेऊ शकता.
म्हणजेच तुम्ही डिस्पोजेबल पेपर कप बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. त्यापासून तुम्ही वार्षिक 10 लाखांपर्यंत कमाई करू शकता. आजकाल डिस्पोजेबल पेपर कपची मागणी खूप वाढली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी आणि प्लास्टिकला पर्याय म्हणून पेपर कपच्या व्यवसायालाही सरकार मदत करते.
Table of contents [Show]
प्लॅस्टिक बंदीमुळे पेपर कपची वाढती मागणी..
सरकारकडून प्लास्टिक बंदीसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे, त्यामुळेच पेपर कप आणि ग्लासेसला भरपूर वाव आहे. आजकाल डिस्पोजेबल पेपर कपची मागणी खूप वाढली आहे. आता तर कागदी ग्लास देखील बनवले जात आहेत, ज्याचा वापर ज्यूसच्या दुकानात मोठ्या प्रमाणात केला जातो. चहाच्या दुकानात छोटे कप वापरले जातात.
पेपर कप व्यवसायासाठी सरकारकडून मुद्रा लोन..
प्रदूषण दूर करण्यासाठी शासनाकसून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. त्यामुळेच डिस्पोजेबल पेपर कप आणि ग्लास बनवण्यासाठी केंद्र सरकारचे मुद्रा कर्ज घेता येऊ शकते. या व्यवसायासाठी, तुम्हाला खर्चाच्या 25 टक्के रक्कम स्वतः गुंतवावी लागेल आणि उर्वरित 75 टक्के रक्कम मुद्रा लोन म्हणून उपलब्ध होईल.
किती खर्च आणि किती नफा?
कप बनवण्याची मशीन 2 ते 2.5 लाख रुपयांना मिळेल. (business plan for paper cup business) त्याचबरोबर जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची कप बनवणारी मशीन खरेदी केली तर त्यासाठी तुम्हाला 8 ते 10 लाख रुपये मोजावे लागतील. आणि डाईंग मशिनचीही किंमत सुमारे दीड लाख असेल. म्हणजे मशिनवर 10 ते 12 लाख रुपये खर्च केले जातील (cost analysis of paper cup business) आणि सुमारे 15 लाख रुपयांचे खेळते भांडवल घेतले जाईल, ज्यामध्ये कच्चा माल, दुकानाचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार, लाईटचे बिल असा खर्च येतो. या (revenue and profit margins for a paper cup business) व्यवसायातून तुम्ही दरमहा 75 हजार रुपये कमवू शकता.
आपण या व्यवसायात गुणवत्ता नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. तुम्हाला फूड-ग्रेड पेपर वापरावा लागेल जो स्वच्छ आहे. तसेच, जर तुम्ही तुमच्या उत्पादनावर ISI मार्क वापरत असाल तर तुम्हाला BIS नियमांचे पालनही करावे लागेल. आपण निर्जंतुकीकरण असलेले अन्न-दर्जाचे कागद वापरणे आवश्यक आहे.
पेपर कपची ऑनलाइन विक्री कशी करता येईल?
कोरोंना काळात सर्वाधिक प्रचिती ऑनलाइन विक्रीला मिळाली आहे. जर तुम्हाला जास्त पैसे मिळवायचे असतील आणि कोणत्याही व्यवसायात यश मिळवायचे असेल, तर आज ऑनलाइन विक्री हा पर्याय उत्तम ठरतो. इंटरनेटद्वारे आपले प्रॉडक्ट ग्राहकांसमोर प्रेझेंट कार्याचे अनेक मार्ग आहेत. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि आणखी ई-कॉमर्सवर साईटवर तुम्ही तुमचे प्रॉडक्ट विक्रीसाठी टाकू शकता.
पेपर कपचे Distribution and Marketing..
पेपर कप सामान्य लोकांना विकण्यासोबतच इतर कंपन्यांना विकण्यावर भर देऊन त्यासाठी होईल ते प्रयत्न करायला पाहिजे. पेपर कप आयटी सेक्टर, युनिव्हर्सिटी कॅन्टीन, फॅक्टरी कॅन्टीन, हॉटेल आणि फूड जॉइंट्स निवडतात ज्यात फास्ट फूड, कॅटरिंग लोक, चहाचे स्टॉल, पेपर प्रॉडक्ट डीलर आणि सुपर मार्केट यांचा समावेश आहे.
तसेच, रस्त्याच्या कडेला असलेले स्थानिक चहाचे स्टॉल हे पेपर कपचे नियमित खरेदीदार असतात. मोठमोठे होणारे इवेंट सुद्धा तुम्हाला चांगली विक्री करून देऊ शकतात. उन्हाळ्याच्या सीजनमध्ये लग्न समारंभ, इतर वेळेत वाढदिवस आणि इतर कार्यक्रम असतात.