Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

माफक गुंतवणूक, छंद जोपसण्याची संधी आणि संधीतून यशस्वी व्यवसायापर्यंत मजल

successful-business-with-less-investment

Image Source : www.yashaswiudyojak.com

स्त्रियांचा एक कम्फर्ट झोन असतो, त्यातून त्या बाहेर पडू इच्छित नाही म्हणजे त्यांच्या डेली रुटीनमधून. तर काही त्यातूनही मार्ग काढून इतरांनाही नवीन मार्ग दाखवतात. अशा स्त्रियांमधून नाव घ्यायचे झाले तर सुषमा माने (Sushma Mane) यांचे नक्कीच घेता येईल. सुषमाताईंनी स्वत:चा छंद जोपासत त्यातून स्वत: उद्योग उभा केला आहे. जाणून घेऊया त्यांच्या हा उद्योगाबद्दल...

अलीकडील महिला सोशल मीडियामुळे म्हणा वा जनजागृतीमुळे त्यांना माहिती प्रचंड प्रमाणात असते आणि घरकाम सांभाळून आपणही आपल्या घराला आर्थिक हातभार लावावा ही मनोमन इच्छा! मग या आवडीचे रूपांतर व्यवसायात करणे एक वेगळीच उपजत कला आहे. याकरीता चिकाटी ,परिश्रम आणि जोडीला भांडवल गरजेचे. काही स्त्रियांचा एक कम्फर्ट झोन असतो, त्यातून त्या बाहेर पडू इच्छित नाही म्हणजे त्यांच्या डेली रुटीनमधून. तर काही त्यातूनही मार्ग काढून इतरांनाही मार्ग दाखवतात. यापैकी स्त्रियांमधून नाव घ्यायचे झाले तर सुषमा माने (Sushma Mane) यांचे घेता येईल. त्या कलाकुसरीचे वेगवेगळे क्लासेस चालवतात, स्त्रियांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहन देतात. आपल्या सारख्याच महिलांची व्यवसायात मदत घेऊन त्यांनी आपल्या आवडीला यशस्वी उद्योगात रूपांतरित करण्याचा जो प्रयत्न केला आहे; तो वाखाण्याजोगा आहे.

क्रोशापासून नक्षीदार कापड बनवण्याची कला

सुषमा माने क्रोशापासून विणकाम करून (क्रोशे म्हणजे आकड्यासारख्या सुईचा वापर करून नक्षीदार कापड बनवण्याची कला) सुंदर कलाकृती तयार करतात. त्यांनी तयार केलेल्या वस्तुंना अगदी गल्लीबोळातून महाराष्ट्राबाहेर गोवामधून मागणी आहे आणि इतर ठिकाणाहून मागणी वाढत आहे.

सुषमा माने क्रोशापासून ते कोणकोणत्या वस्तू बनवतात? 

मायक्रो कॉटनचे झोपाळे, चप्पल, शूजवर विणकाम, कॅप्स, ब्लाऊज, जॅकेट्स, हॉटेल्ससाठी लागणारे टेन्ट आदी वस्तुंच्या त्यांना ऑर्डर्स मिळाल्या आहेत. या सर्व वस्तुंना इतर हॉटेल्समध्ये गोव्यामध्ये मागणी वाढली आहे. 

आवडीचे रूपांतर व्यवसायात

आवडीचे रूपांतर व्यवसायात कसे करायचे हा सुषमा माने याच्या समोर जिकरीचा प्रश्न होता. मग त्यावर मात करण्यासाठी त्यांनी क्रोशाचे ट्युटोरियल द्यायला सुरूवात केली. यामुळे माऊथ पब्लिसिटी तर झालीच तसेच सोशल मिडियाद्वारे फोटो पाहून बनवलेल्या वस्तुंची मागणीही वाझू लागली. नंतर त्यांनी काही वस्तू केवळ विक्रीसाठी बनविण्यास सुरुवात केली. हे फोटोज पाहून काही लोकांनी अगदी हुबेहूब तशाच वस्तू त्यांच्याकडून बनवून घेतल्या. कामातील सातत्य हे सुषमा माने यांच्या यशाचे गमक आहे; हे त्यांनी पुरते जाणले होते आणि त्याच पावलावर त्यांनी चालण्याचा निर्धार करत आजचे यश मिळवले आहे. सुषमा माने या मूळच्या कोल्हापूरच्या असून त्यांनी याबाबतचे सर्व प्रशिक्षण कोल्हापूरमध्येच घेतले होते.

पुणे, छंद आणि व्यवसाय

पुण्यात कायमचे राहायला आल्यावर सुषमाताई बऱ्याच दिवस एक आवड म्हणून त्या हे काम करू लागल्या, येथे त्यांना सर्वाशी परत जुळवून घ्यायचे होते. तसेच ही कला इतर महिलांसोबत शेअर करायची होती. हळुहळू त्यांच्या ओळखीने आणि स्वतःबद्दल विश्वास असल्यामुळे त्या आपली कला इतर महिलांसोबत शेअर करू शकल्या. त्या प्रत्येक महिलेला आपली आवड जोपासण्यासाठी प्रोत्साहित करत राहिल्या.

जिद्द आणि मेहनत

जिद्द आणि मेहनत या गुणांच्या बळावर त्यांना छंदातून सुरू झालेल्या व्यवसायात यश येत होते. पुढे जाऊन त्यांनी त्यांनी या व्यवसायाला आणखी कसे मोठे करता यईल, यावर लक्ष केंद्रित करण्यास सुरूवात केली. या व्यवसायाला कोणतेही आर्थिक पाठबळ लागत नाही. तरीही यातून चांगला नफा कमावता येतो आणि आपली आवडही जोपासता येते, असे त्या सांगतात.

हा व्यवसाय स्त्रियांसाठी सुरक्षित का आहे? 

• कमी भांडवल 
• घरातून काम करण्याची संधी
• कुटुंबाची मदत
• महिलामंडळ सहभागी 
• संघटित व्यवसाय
• भिशीच्या ठिकाणी व्यवसायवाढीसाठी हातभार लागू शकतो

क्रोशासाठी भांडवल म्हणजे लोकर, दोरा, सुतळी इत्यादी साहित्यासाठी गुंतवणूक! ती कोणालाही जमेल. हा व्यवसाय तुमच्या कसबीचा, कल्पक बुद्धीचा वापर करून करण्यासारखा आहे.

सुषमा माने यांनी सणवार, लग्न आणि इतर समारंभ, ऋतू, बदलणाऱ्या फॅशन लक्षात घेऊन कल्पकतेचा वापर करत या व्यवसायाकडे पाहिले. जसे की, त्यांनी  हिवाळ्यात स्वेटर्स, दिवाळीच्या सणाला ओवाळणी पडदा, पणत्या, क्रोशाचे झुले, फ्रॉक, टोपी, रजई तसेच लोकरीच्या दोऱ्यापासूनच्या वस्तू, क्रॉप टॉप, शॉर्ट पॅन्ट, कुशन कव्हर, पडदे, लॅंप शेड करून देणे, सुतळीपासून गालीचा, बॅग, वॉलपीस बनवणे, पेपर क्राफ्टमध्ये पेपरची फुले, फ्लॉवर डेकोरेशन अशा वस्तुंची निर्मिती त्यांनी केली. लग्न आणि इतर समारंभाची डेकोरेशन सुध्दा त्या करून देतात. कॉटन मॅक्रोनीला हॉटेल, रिसॉर्टकडून भरपूर ऑर्डर मिळते. मोठे झोके, खुर्ची, पडदे, बाजली, लॅंप शेड ह्या ऑर्डर्स मोठ्या प्रमाणात असतात. भरतकामाचे क्लासेस, सॅटीन रिबन वर्क क्लासेस त्या घेतात. डिझाईनर साड्यांबरोबरच डिझाईनर ब्लाऊजही त्या बनवून देतात. जरी वर्कच्या साड्यांची आता फॅशन आली आहे. याचे ते क्लासेस ही घेतात इतरांना शिकवतात. 

महिलांना जोडणे तसेच व्यवसायात सामिल करून घेणे यात त्या कोणताही किंतु ठेवत नाही. आपल्या सर्वांना या गुणांचा अंगीकार करता आला पाहिजे. आनंद आणि समाधान त्या जोडीने आवडही जपावी सुषमा माने नेमकं तेच करत आहेत आणि त्याचा व्यवसाय यामुळे दिवसोदिवस वाढत आहे. सुषमा माने यांचा संपर्क क्रमांक 7030292555, 9403984221 हा आहे.

स्त्रोत: यशस्वी उद्योजक