Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Paper Recycling Business: 60 देशात रद्दी पेपरचा व्यवसाय सुरू करून या भारतीय महिलेने कमावले करोडो रुपये!

Poonam Gupta

Image Source : www.sarahharan.com

PG Paper success story: 2002 मध्ये, पूनम गुप्ता (Poonam Gupta) स्कॉटलंडमध्ये कार्यरत असलेल्या पुनीत गुप्तासोबत विवाहबद्ध झाल्या. रद्दी खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून त्यांनी 1000 कोटींहून अधिक संपत्ती कमावली आहे. आजघडीला पूनम गुप्ता, युनायटेड किंगडमच्या (United Kingdom) प्रसिद्ध महिला उद्योजकांपैकी एक आहेत

रद्दी व्यवसायातून करोडो रुपयांची उलाढाल करणाऱ्या एका महिला उद्योजकाची ही कहाणी तुमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरू शकते. ही गोष्ट आहे पूनम गुप्ता (Poonam Gupta) या महिलेची. 2002 मध्ये त्या भारतातून स्कॉटलंडला स्थायिक झाल्या. नव्या देशात नव्या अर्थव्यवस्थेत व्यापार सुरू करण्याचं त्यांनी ठरवलं. या व्यवसायातून त्यांनी 1000 कोटींहून अधिक संपत्ती कमावली आहे. आजघडीला पूनम गुप्ता, युनायटेड किंगडमच्या (United Kingdom) प्रसिद्ध महिला उद्योजकांपैकी एक आहेत.


पूनम गुप्ता नुकत्याच प्रवासी भारतीय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भारतात आल्या होत्या. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी एक मजेशीर किस्सा सांगितला. 

रद्दीच्या व्यवसायात त्यांनी एकदा तिच्या पतीला एका जॉबची ऑफर दिली. ‘मला परवडणार नाही’, असं त्यांच्या पतीने त्यांना कळवलं. यावेळी त्यांच्या पतीचा पगार वार्षिक 80 लाख रुपये इतका होता. पतीने आपल्या कंपनीत काम करण्यास नकार दिल्यानंतर पूनमने आपला व्यवसाय वाढवत ठेवला. व्यवसाय भरभराटीला आल्यानंतर त्यांनी त्यांच्या पतीला पुन्हा एकदा जॉबची ऑफर दिली आणि ही ऑफर होती दीड कोटी वार्षिक पगाराची! 2002 मध्ये पूनम गुप्ता यांनी स्कॉटलंडमध्ये एका खाजगी कंपनीत नोकरी करणाऱ्या पुनीत गुप्ता (Puneet Gupta) यांच्याशी लग्न केले.

लग्नानंतर स्कॉटलंडला स्थायिक झाल्यावर पूनम गुप्ता यांनी नोकरीची शोधाशोध सुरू केली. त्यांच्याकडे एमबीएची (MBA) पदवी होती पण अनुभव नसल्यामुळे त्यांना कोणीही कामावर घ्यायला तयार नव्हते. त्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. स्कॉटलंड देशाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास केल्यावर, त्यांना जाणवले की युरोपियन (European) आणि अमेरिकन (American) कंपन्या कामकाजासाठी मोठ्या प्रमाणात कागद वापरतात. शेकडो टन रद्दी कागद तयार होत असतात. त्याची विल्हेवाट लावणं हा एक मोठा प्रश्न या कंपन्यांसमोर असतो. कंपन्या स्वतः करोडो रुपये यावर खर्च करत असतात. यावर सखोल संशोधन केल्यानंतर पूनम यांना आढळले की या रद्दी पेपरचा पुनर्वापर केला जाऊ शकतो.तसेच यासाठी रद्दी कागदाला मागणी देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी इटली, फिनलंड, स्वीडन आणि युनायटेड स्टेट्समधील कंपन्यांकडून स्क्रॅप पेपर (रद्दी) खरेदी करण्यास सुरुवात केली.


या व्यवसायात अगदी सुरुवातीला त्यांनी एका इटालियन कंपनीकडून रद्दी खरेदी केली. व्यवसाय नवा असल्याकारणाने कंपनीला रद्दीचे पैसे थोड्या दिवसांत देऊ असे त्यांनी कळवले. रद्दी असल्या कारणाने कंपनीने देखील आढेवेढे घेतले नाहीत. आता खरेदी केलेल्या रद्दीच्या ग्राहक हवा होता. पूनम यांनी भारतात एक ग्राहक कंपनी शोधली आणि त्यांच्या पहिल्याच व्यवहारात,त्यांनी दोन कंटेनर किमतीच्या कागदाच्या बदल्यात 40 लाख रुपयांची कमाई केली.

रद्दी खरेदी-विक्रीतून पैसा कमावला!

2004 मध्ये, पूनम यांनी स्कॉटलंडमध्ये पीजी पेपर (PG Paper) नावाची कंपनी नोंदणीकृत केली. या कंपनीचा नफा झपाट्याने वाढत गेला. वाढत चाललेल्या या व्यवसायात तिला मित्रमंडळींची, कुटुंबाची गरज होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या नवऱ्याला, पुनीतला व्यवसायात सहभागी होण्यास सांगितले. त्यावेळी त्यांचे वार्षिक पॅकेज 80 लाख रुपये होते. पूनमने देऊ केलेला पगार परवडणार नाही असे सांगून पुनीत यांनी पूनम यांची ऑफर नाकारली होती.

केवळ सहा महिन्यांसाठी कंपनीत अर्धवेळ (Part Time) काम करण्याची तिने पुनीत यांना विनंती केली. पुनीतने 6 महिने काम अर्धवेळ काम केलं आणि नंतर तव स्वतःच पूर्णवेळ (Fulltime) जॉईन होण्यास तयार झाले. यावेळी पूनम यांनी पुनीत यांना 1.50 कोटी रुपयांचे पॅकेज दिलं. त्यानंतर या जोडप्याने आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवला. त्यांनी बांधकाम (Real Estate), आयटी (IT) आणि हॉस्पिटॅलिटी (Hospitality) व्यवसायातही हात आजमावला. लवकरच त्यांच्या कंपनीची एकूण संपत्ती 1,000 कोटींहून अधिक झाली. पूनम यांना त्यांच्या कंपनीची एकूण संपत्ती 1 लाख कोटी रूपयांवर घेऊन जायची आहे.

PG Papers च्या आजघडीला 9 कंपन्या वेगवेगळ्या 7 देशांमध्ये कार्यरत आहेत!

पूनम गुप्ता यांनी त्यांच्या राहत्या घरातून व्यवसायाला सुरूवात केली. 2015 पासून, त्यांचे मुख्यालय स्कॉटलंडमधील ग्रीनॉक येथील कस्टम हाऊसमध्ये आहे. आता त्यांच्याकडे पीजी वर्ल्ड (PG World), एसएपीपी होल्डिंग्स (SAPP Holdings), एसएपीपी इंटरनॅशनल (SAPP International), एसएपीपी प्रॉपर्टी (SAPP Property), एनव्हिसेज डेंटल हेल्थ (EnVisage Dental Health), पुनव (Punav) या कंपन्यांची मालकी आहे. त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल 60 मिलियन युरो इतकी असून भारत, अमेरिका, चीन, स्वीडन, तुर्की येथे त्यांची कार्यालये आहेत. पूनम गुप्ता यांनी SRCC दिल्ली येथून अर्थशास्त्रात पदवी मिळवली आणि नंतर हॉलंडमधील मास्ट्रिच स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून (Maastricht School of Management) एमबीए (MBA) केले आहे.