Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian Railway Luggage Rule: रेल्वेमध्ये सामान विसरल्यावर परत कसे मिळवाल? जाणून घ्या

How to recover lost luggage in train

Image Source : www.downtoearth.org.in

How to recover lost luggage in train: तुमचेही सामान कधी रेल्वेमध्ये विसरले असेल, तर रेल्वे त्याचे काय करते. ते परत कसे मिळवता येऊ शकते, त्यासाठी रेल्वे शुल्क आकारते का? यासारख्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

How to recover lost luggage in train: भारतीय रेल्वेचे जाळे हे संपूर्ण देशात पसरलेले आहे. त्यामुळेच रास्त दर आणि उत्तम सेवा यामुळे बऱ्याच लोकांची रेल्वेने प्रवास करण्याला पसंती असते. रेल्वे ही देशातील सीमा भागांना मोठ्या महानगरांशी जोडण्याचे काम करते. देशभरात दररोज करोडो लोक ट्रेनमधून प्रवास करत असतात. प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी भारतीय रेल्वेने अनेक नियम केले आहेत. ट्रेनमध्ये प्रवास केल्यानंतर अनेक रेल्वे प्रवासी आपले सामान बऱ्याचवेळा घाईगडबडीत ट्रेनमध्येच विसरतात, असे अनेकदा पाहायला मिळाले आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला माहिती आहे का, की भारतीय रेल्वे तुमच्या ट्रेनमध्ये विसरलेल्या सामानाचे काय करते? जर नसेल माहिती तर आजचा हा लेख संपूर्ण वाचा.

रेल्वेमध्ये विसरलेल्या सामानाचे काय होते?

ट्रेनमधून प्रवास करताना आपण बऱ्याच वेळा घाईगडबडीत आपले सामान ट्रेनमध्येच विसरतो. ट्रेनमध्ये विसरलेले सामानही तुम्ही सहज परत मिळवू शकता. रेल्वेत विसरलेले सामान प्रवाशांना परत करण्याचा नियमही भारतीय रेल्वेने केला आहे. वास्तविक रित्या ट्रेनचा प्रवास संपल्यानंतर संपूर्ण ट्रेन तपासली जाते. ट्रेन शेवटच्या स्टेशनवर आल्यानंतर, रेल्वे सुरक्षा दलाच्या प्रतिनिधीसह स्टेशन कर्मचारी संपूर्ण ट्रेनची नीट तपासणी करतात. या दरम्यान ट्रेनमध्ये प्रवाशांची कोणतीही मालमत्ता आढळल्यास त्या प्रवाशाचे मागे राहिलेले सामान स्टेशन मास्टरकडे जमा केले जाते. या हरवलेल्या वस्तूची माहिती रजिस्टरमध्ये नोंद करण्यात येते. ही नोंद करताना वस्तूचे वजन, अंदाजे किंमत इ. माहिती लिहून ठेवली जाते.

रेल्वे सामान परत करण्यासाठी किती शुल्क आकारते?

हरवलेल्या सामानासंबंधित जर एखादी व्यक्ती सामानाच्या शोधात स्टेशनवर परत आली आणि स्टेशन मास्टरला त्याची इत्यंभूत माहिती दिली व स्टेशन मास्तरला त्यासंदर्भात खात्री पटली की हरवलेले सामान हे त्याच व्यक्तीचे आहे, तर या प्रकरणात सामान संबंधित व्यक्तीला परत करण्यात येते. अनेकवेळा लोकांना प्रश्न पडतो की, स्टेशन मास्तरांकडून हरवलेले सामान परत घेण्यासाठी शुल्क आकारले जातात का? तर तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या की भारतीय रेल्वे प्रवाशाचे हरवलेले सामान सापडल्यावर प्रवाशांकडून कोणतेही शुल्क आकारत नाही. अगदी निशुल्क प्रक्रिया असते.