Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

जनरल तिकीटात स्लीपरने करा रेल्वेने प्रवास, मग Railway TC च काय? आधी हे जाणून घ्या

Indian Railway

Image Source : www.zoomnews.in

Indian Railway ने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता जनरल तिकीटावर स्लीपरमध्ये प्रवास करता येणार आहे.

Indian Railway ने प्रवास करणाऱ्यांसाठी एक उत्साहवर्धक बातमी आहे.  रेल्वेकडून प्रवाशांच्या हिताचा विचार करून अनेक वेळा काही निर्णय घेतले जातात. असाच एक निर्णय आता घेण्यात आला आहे.  आता तुम्ही जनरल तिकिटात स्लीपर कोचमध्ये प्रवास करु शकणार आहात आणि खास गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला एकही रुपया अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. 

प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेऊन उपलब्ध करुन दिलेली ही सुविधा लक्ष वेधून घेत आहे. गरीब आणि वृद्धांचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. 
देशभरात कडाक्याची थंडी पडत आहे. त्याचा विचार करून भारतीय रेल्वेने (Indian Railways )आता जनरल तिकीट घेणारे प्रवासीही स्लीपर क्लासमध्ये प्रवास करु शकतील असा निर्णय घेतला आहे. वृद्ध आणि गरिबांना लक्षात घेऊन रेल्वेने हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या नागरिकांना  प्रवास करणे सोईचे होणार आहे.

याबाबत प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येत आहे. रेल्वे बोर्डाने स्लीपर कोचचे तपशील मागवले आहेत. ज्या गाड्यांचे स्लीपर कोच 80 टक्क्यांपेक्षा कमी प्रवासी आहेत, त्या सर्व गाड्यांचा तपशील मागवण्यात आल्याचे रेल्वे बोर्डाने सर्व विभागांच्या प्रशासनाला सांगितले आहे. प्रवाशांना  प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी रेल्वे त्या सर्व स्लीपर कोचचे रुपांतर जनरलमध्ये करण्याचा विचार करत आहे, असे सांगण्यात येत आहे.

हिवाळ्याच्या मोसमात अनेक प्रवासी स्लीपर कोचऐवजी एसी कोचने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. यामुळे  स्लीपर कोचमध्ये प्रवासी कमी असल्याचे आढळून येत आहे. यासोबतच रेल्वेने एसी डब्यांची संख्याही वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. हिवाळ्याच्या हंगामामुळे स्लीपर कोचमधील 80 टक्के जागा रिकाम्या राहिल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून  हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, सामान्य तिकिटाने प्रवास करणार्‍यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. हे पाहता रेल्वेने स्लीपर कोचला जनरल कोचचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

त्यामुळे जनरल तिकीटात स्लीपरने रेल्वेने  प्रवास करता  येणार आहे. इतर वेळी  असे   करताना सापडल्यास दंड भरावा लागतो. मात्र याबाबतीत  हा रेल्वेचाच निर्णय असल्याने  Railway TC ची चिंता करण्याचे कारण नाही. मात्र असा प्रवास करताना अगोदर व्यवस्थित माहिती घेणे देखील गरजेचे आहे.