Vande Bharat Train: भारतीय रेल्वे (Indian Railways Latest News) वंदे भारत संदर्भात एक मोठी योजना बनवत आहे. देशभरात या ट्रेनचे जाळे वाढवण्यासाठी वेगाने काम केले जात आहे. सध्या देशात 8 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. नागरिकांचा प्रवास स्वस्त आणि मस्त व्हावा यासाठी सरकार सध्या वंदे भारत ट्रेनमध्ये स्लीपर कोच बसवण्याचा विचार करत आहे. स्लीपर कोचमुळे रेल्वेचे तिकीटही स्वस्त होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. गाड्यांची संख्या वाढल्यामुळे नागरिकांना कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढणार आहे.
200 किमी प्रतितास असेल वेग!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्लीपर कोचसह वंदे भारत ट्रेनचा वेग ताशी 200 किमी असू शकतो. या ट्रेनमधील स्लीपर कोच ऍल्युमिनियचा वापर करून बनवला जात आहे. वंदे भारत एक्सप्रेसचे स्लीपर कोच देशभरात धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या डब्यांना पर्याय असतील . सुमारे 400 वंदे भारत गाड्यांसाठी रेल्वेकडून निविदा काढण्यात येत असून या महिनाअखेरीस त्याला मंजुरी मिळेल अशी चिन्हे आहेत.
ट्रेन किती वेगाने धावू शकेल?
वृत्तसंस्थेनुसार, 4 भारतीय कंपन्यांसह काही विदेशी कंपन्याही या प्रकल्पासाठी पुढे आल्या आहेत. पहिल्या 200 वंदे भारत ट्रेनमध्ये शताब्दी एक्स्प्रेसप्रमाणे आसनव्यवस्था असेल. सध्या या गाड्या ताशी 180 किमी वेगाने धावू शकतील.
रेल्वे रुळांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागेल!
रेल्वेने सांगितले की, रुळांची सुरक्षितता लक्षात घेऊन ताशी 130 किमी वेगाने धावण्याची परवानगी मिळणार आहे. यासोबतच चेअर कार ट्रेनही स्टीलपासून बनवल्या जातील. दुसऱ्या टप्प्यात 200 स्लीपर कोच असलेल्या वंदे भारत ट्रेनची निर्मिती केली जाणार आहे. या गाड्या बनवण्यासाठी ऍल्युमिनियमचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी रेल्वे ट्रॅकबाबतही काम सुरू आहे. यासोबतच सिग्नल आणि पुलाचेही काम सुरू आहे. दिल्ली-कोलकाता आणि दिल्ली-मुंबई दरम्यान हे काम सध्या सुरू आहे.