आपल्या दारासमोर एखादी कार असावी अशी कित्येकांची इच्छा असते. पण कार घ्यावी की नाही, घेतल्यास तिचे बजेट कसे ठरवावे, असे अनेक प्रश्न उभे राहतात. त्यासाठी पुढील मुद्यांचा विचार करणे आवश्यक आहे.
Table of contents [Show]
कार घ्यावी की नाही?
यासाठी मासिक मिळकत किती आहे याचा विचार करावा. आपल्यावर कौटुंबिक जवाबदाऱ्या किती आहेत हा मुद्दा सुद्धा याबाबत महत्वाचा ठरतो. जर उत्पन्नाचा बराचसा भाग हा घरातील खर्च भागवण्यासाठीच लागत असेल तर कार घेऊ नये. त्याऐवजी जो थोडी अमाऊंट शिल्लक राहत असेल तिचे योग्य व्यवस्थापन करण्याकडे लक्ष द्यावे, हा विचार यासंदर्भात आदर्श मानला जातो. कारण कार हा मौजमजेचा खर्च मानला जातो. जर क्वचित काही कारणासाठी कार गरज म्हणून लागत असेल तर ती गरज अशा स्थितीत भाड्याच्या कारद्वारे देखील भागावली जाऊ शकते.
डाउन पेमेंट करण्याची क्षमता ( Car loan down payment )
झीरो डाउन पेमेंट कार लोन अशी ऑफर आकर्षक असते, यात शंका नाही. एकही पैसा न देता आपल्या पाहिजे ती कार आपण आपल्या दारसमोर उभी करू शकतो. ही कल्पनासुद्धा सुखदच आहे यात काही शंका नाही. पण सरतेशेवटी हे पैसे आपल्यालाच भरायला लागतात, हे विसरून चालत नाही. यामुळे झीरो पेमेंटपेक्षा 20 टक्क्यापर्यंत तरी आपण डाउन पेमेंट करू शकतो का, याचा विचार करणे आदर्श मानले जाते,
कर्ज किती वर्षात फेडू शकता?
तुम्ही जमिनीसारख्या रिअल इस्टेटमध्ये कर्ज काढून योग्य प्रकारे गुंतवणूक केलीत तरी भविष्यात तुम्हाला भरलेल्या व्याजापेक्षा (रिटर्न) चांगला परतावा मिळू शकतो. पण कारचे तसे नसते ती depreciating asset असते. यामुळे तिचे मूल्य कमी होत जाते. यामुळे 4 वर्षात हे कर्ज फेडणे आदर्श मानले जाते. त्यामुळे याबाबतीत तुमची क्षमता किती आहे, ते तपासून घेणे महत्वाचे ठरते.
ईएमआय किती भरू शकता (Car loan EMI)
कार घेण्यापूर्वी सगळ बर चालल होत पण उतसहात कार घेतली आणि मासिक खर्चाचा ताळमेळ बसवण अवघड झालय, अस कित्येकांच्या बाबतीत घडताना दिसून येत. याच मुख्य कारण म्हणजे ईएमआय चा नीट विचार केलेला नसणे. सामान्यपणे पगाराच्या 10 टक्के ईएमआय असणे हे आदर्श मानले जाते. यामुळे आपल मासिक उत्पन्न आणि ईएमआय यांची आपण योग्य सांगड घालू शकतो का, याचा विचार करणे महत्वाचे ठरते.
स्वत:ची कार खरेदी करणे हा नक्कीच आनंदाचा क्षण असतो. मात्र ते करताना आपल्या बजेटचा नीट विचार नाही केला तर नंतर मासिक बजेट कोलमडून जाऊ शकते. डाउन पेमेंट, ईएमआय, परतफेडीची मुदत याविषयी हा सर्वसामान्य आराखडा आहे. मिळकत, जवाबदाऱ्या या प्रत्येकाच्या भिन्न असतात. त्यामुळे सरासर विचार करून कारच्या बजेटविषयी निर्णय घेणे योग्य ठरते.