Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Government scheme : 'मागेल त्याला शेततळे' या योजनेसाठी अर्ज कसा करावा? पात्रता काय आहे? जाणून घ्या

Government scheme

Image Source : www.marathi.krishijagran.com

Government scheme : राज्य सरकारकडून राज्यातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. शेतकऱ्यांसाठी सरकारकडून विशेष योजना असतात त्यापैकी एक म्हणजेच मागेल त्याला शेततळे योजना. या योजनेसाठी अर्ज कसा करावा? पात्रता काय? जाणून घेऊया

Government scheme : राज्य सरकारकडून राज्यातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. शेतकऱ्यांसाठी सरकारकडून विशेष योजना असतात त्यापैकी एक म्हणजेच मागेल त्याला शेततळे योजना. कोरडवाहू शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे उत्पादनावर परिणाम होतो. या पाणी टंचाईवर मत करण्यासाठी मागेल त्याला शेततळे ही योजना उपयोगी पडते. 

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतजमिनीसाठी नियमित आणि अखंड पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याचा उद्देश समोर ठेवून ही योजना राबविली जात आहे. 9 फेब्रुवारी 2016 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मागेल त्याला शेततळे योजना मंजूर करण्यात आली. या योजनेंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्याची मागणी करता येते. या मध्ये जास्तीत जास्त 30 x 30 x 3 मीटर या आकारमानाचे व कमीतकमी इनलेट आणि आउटलेटसह प्रकारामध्ये किमान 15 x 15 x 3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येऊ शकते.

अनुदान किती मिळते? 

या योजनेंतर्गत 30 x 30 x 3 मीटर शेततळ्यासाठी 50,000 रुपये इतके कमाल अनुदान देण्याचे ठरवण्यात आले आहे. इतर शेततळ्यासाठी आकारमानानुसार अनुदान दिले जाणार आहे. या योजनेमध्ये 5 शेतकरी गट करून एक शेततळे घेऊ शकतात. अनुदान व पाण्याचा वापार, पाण्याची हिस्सेवारी याबाबत सर्व बोलणी करून सबंधित शेतकऱ्यांनी 100 रुपयांच्या स्टँम्प पेपरवर करार लिहून घेणे गरजेचे त्याचबरोबर तो अर्जासोबत सादर करणे सुद्धा अनिवार्य आहे.

मागेल त्याला शेततळे योजनेसाठी नियम व अटी कोणत्या? 

या योजनेंतर्गत कृषी विभागाचे सहाय्यक किंवा कृषी सेवक यांनी निश्चित करून दिलेल्या जागेवरच शेततळे बांधावे लागेल. मिळालेल्या आदेशापासून तीन महिन्यात शेततळे बांधून पूर्ण झाले पाहिजेत. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीय बँक किंवा इतर बँकमधील खाते क्रमांक सबंधित कृषी सहाय्यक यांच्याकडे पासबुकच्या झेरॉक्ससह सादर करणे आवश्यक आहे. शेततळ्याच्या कामासाठी कोणतीही अतिरिक्त रक्कम मिळणार नाही. लाभार्थी शेतकऱ्याच्या 7/12 उताऱ्यावर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक आहे. 

या योजनेसाठी पात्रता काय आहे? 

शेतकऱ्यांकडे त्याच्या नावावर कमीतकमी 0.60 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याची शेततळ्या करिता तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी शेततळे किंवा सामुदाईक रित्या शेततळे अशा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा. मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचे बँकेत खाते असणे अनिवार्य  आहे
या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील मूळ रहिवासी शेतकरी घेऊ शकतात.

आवश्यक कागदपत्रे 

  • जमिनीचा 7/12 उतारा
  • जातीचे प्रमाणपत्र
  • आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला
  • दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला
  • आधारकार्ड
  • 8 अ प्रमाणपत्र
  • स्वतःच्या स्वाक्षरी सहित भरलेला अर्ज

अर्ज कसा करावा? 

या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी पात्र शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागेल, या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज आणि नोंदणी करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. 

  • शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या आपले सरकार  या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा लागेल. 
  • या वेबसाईटवर मागेल त्याला शेततळे योजनेचे अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. 
  • अधिकृत वेबसाईटवर प्रथम होम पेजवर ‘’मागेल त्याला शेततळे’’ या पर्यायावर क्लिक करावे.
  • इच्छुक अर्जदार थेट शासनाच्या या लिंकवर जाऊन नोंदणी करू शकता.
  • यानंतर यशस्वीपणे नोंदणी झाल्यानंतर अर्जदार शेतकरी मागेल त्याला शेततळे या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. 
  • यासाठी शासनच्या अधिकृत आपलेसरकार वेबसाईटवर जाऊन, आपले युजरआयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करावे. 
  • आणि इच्छुक अर्जदार शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्जाची पावती डाऊनलोड करून स्वतः कडे ठेवावी.
  • मागेल त्याला शेततळे योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी पात्र शेतकरी जवळच्या पंचायत कार्यालयात, 
  • किंवा तालुका कार्यालयात जाऊन योजनेसाठी नोंदणी करू शकतात.