Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Aadhaar Card Franchise: आधार कार्ड फ्रँचायझी सुरू करून घरबसल्या लाखो कमवा; अर्जाची प्रक्रिया जाणून घ्या

Aadhaar Card Franchise

Image Source : www.ahmednagarlive24.com

Aadhaar Card Franchise: आधार कार्ड फ्रेंचायझी (Aadhaar Card Franchise) घ्यायची असेल तर अगदी विनामूल्य ती तुम्ही घेऊ शकता

Aadhaar Card Franchise: आधार कार्ड (Aadhaar Card) हा प्रत्येक सरकारी कामकाजामध्ये कामी येणारे दस्तावेज आहे. आपल्याला सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्व ठिकाणी आधारकार्ड देणे बंधनकारक आहे. त्यामुळेच तर प्रत्येक भारतीय नागरिकाकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. अनेक सरकारी तसेच खासगी कामांमध्ये आधार कार्ड आवश्यक असते. आधार कार्ड बनवून घेण्यासाठी किंवा त्यात काही सुधारणा करायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला आधार केंद्रांची सुविधा (Aadhaar Card) उपलब्ध करण्यात आली आहे. पण तुम्हाला माहित आहे का? अशा आधार केंद्राची फ्रेंचायझी (Aadhaar Card Franchise) सुद्धा दिली जाते. जी घेऊन तुम्हीही चांगली कमाई करू शकता. एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा तुमचा विचार असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.

फ्रेंचायझी घेण्यासाठीची प्रक्रिया काय आहे?

तुम्हाला जर आधार कार्ड फ्रेंचायझी (Aadhaar Card Franchise) घ्यायची असेल तर अगदी विनामूल्य ती तुम्ही घेऊ शकता. फक्त हा व्यवसाय सुरू करण्यासाठी परवाना (License) घ्यावा लागतो आणि त्यासाठी एक परीक्षा (Exam) उत्तीर्ण करावी लागेल. यूआयडीएआय प्रमाणपत्रासाठी (UIDAI Certification) यूआयडीएआयतर्फे (UIDAI) ही ऑनलाइन परीक्षा घेण्यात येते. यात उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला आधार नोंदणी आणि बायोमेट्रिक पडताळणी करावी लागते आणि त्यानंतर कॉमन सर्व्हिस सेंटरची (CSC) नोंदणी करावी लागते.

अर्ज करण्याची प्रक्रिया काय?

आधार कार्ड सेंटर उघडण्यासाठी आधी तुम्हाला ऑनलाईन परवान्यासाठी अर्ज करावा लागतो. त्यानंतर तुम्हाला परीक्षा देऊन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यानंतर हा परवाना प्राप्त होतो. परवान्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे.

  1. सगळ्यात पहिल्यांदा एनएसईआयटीच्या (NSEIT) वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा 
  2. तेथे तुम्हाला Create New User ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा
  3. आता एक एक्सएमएल फाईल ओपन होईल
  4. त्या ठिकाणी Share Code enter टाकण्यास सांगितले जाईल
  5. एक्सएमएल फाईल आणि शेअर कोडसाठी आपण आधारच्या वेबसाईट https://resident.uidai.gov.in/offline-kyc वर जाऊन आपले ऑफलाइन ई-आधार डाउनलोड करून घेऊ शकता
  6. एक्सएमएल फाईल आणि शेअर कोड दोन्ही डाउनलोड केल्यावर वरील उल्लेख केलेल्या ठिकाणी त्यांचा वापर करावा
  7. आता आणखी एक फॉर्म येईल ज्यामध्ये आपल्याला काही वैयक्तिक माहिती भरावी लागेल
  8. हा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर यूजर आयडी आणि पासवर्ड पाठ्वण्या येईल
  9. याद्वारे आपण Aadhaar Testing and Certification पोर्टलवर लॉग इन करू शकता
  10. त्यानंतर Continue बटणावर क्लिक करा
  11. आता एक फॉर्म समोर आल्यावर त्यामध्ये विचारलेली माहिती योग्यरित्या भरा
  12. हा फॉर्म भरल्यानंतर तुमचा फोटो आणि सही अपलोड करा
  13. आता तुम्हाला प्रिव्ह्यू ऑप्शन(Preview Option) दिसेल. यामध्ये तुम्ही फॉर्ममध्ये भरलेली माहिती बरोबर आहे की नाही याची खात्री करून घ्या
  14. आता Proceed to submit form वर क्लिक करा
  15. त्यानंतर तुम्हाला पेमेंट करावे लागेल: ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला पेमेंट करावे लागेल. पेमेंट केल्यानंतर साईटच्या मेनूवर जा आणि पेमेंट (Payment) ऑप्शनवर क्लिक करा. आता आपले बँक खाते निवडून Please Click Here to generate receipt वर क्लिक करा. तिथून तुम्हाला चलन पावती डाउनलोड करून ती प्रिंट करावी लागेल

परीक्षेसाठी केंद्र बुक करा

सर्व माहिती भरल्यानंतर सबमिटवर क्लिक करा व त्यानंतर 1 ते 2 दिवसांनंतर वेबसाईटवर परत लॉग इन करा आणि Book Center वर क्लिक करा. त्याठिकाणी  आपल्या जवळचे कोणतेही केंद्र निवडा. तुम्हाला या केंद्रावर आधार परीक्षा द्यावी लागेल. तारीख आणि वेळ निवडा आणि फॉर्म सबमिट करा. यानंतर थोड्या वेळाने तुम्हाला प्रवेशपत्र (Admit Card) पाठवण्यात येईल.  हे प्रवेश पत्र डाउनलोड करून त्याची प्रिंट सोबत ठेवा.