Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Aadhar Card अपडेट करण्यासाठी ऑनलाईन 25 रुपये तर ऑफलाईन फक्त 50 रुपयेच द्यावे लागणार

Aadhar Card

Image Source : www.navi.com

Aadhar Card Update: UIDAI च्या ट्विटनुसार जर तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर, तुमचे 'POI' आणि 'POA' दस्तऐवज नेहमी तुमच्या आधारमध्ये अपडेट ठेवावे लागतील.

Aadhar Card Update:  शासकीय कागदपत्रांपैकी एक म्हणून आधार कार्डला(Aadhar Card) ओळखले जाते. सरकारच्या वेगवेगळ्या शासकीय कामामध्ये असेल किंवा सरकारी योजनांचा(Govt schemes) लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला आधार कार्डचा(Aadhar Card)  वापर करणे हल्ली बंधनकारक झाले आहे. बऱ्याच वेळा आधारकार्ड नसल्यामुळे लोकांना अनेक योजनांचा लाभ घेता येत नाही. आधार नंबर कोणत्याही आधारधारकाला(Aadhaar holder) आयुष्यात एकदाच दिला जातो. मात्र, या आधार कार्डला अपडेटही करावे लागते. UIDAI हे आधार जारी करण्याचे काम करते. नुकतेच एका ट्विटनुसार UIDAI ने लोकांना त्यांच्या आधारमध्ये दोन गोष्टी अपडेट करण्यास सांगितले आहे. अशा परिस्थितीत, कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुमच्या आधारमध्ये 'POI' आणि 'POA' अपडेट असणे आवश्यक आहे. हे अपडेट करण्यासाठी नक्की किती खर्च येतो चला तर जाणून घेऊयात.

ऑनलाईन व ऑफलाईन किती खर्च येतो?

नुकतेच UIDAI च्या ट्विटनुसार जर तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर, तुमचे 'POI' आणि 'POA' दस्तऐवज नेहमी तुमच्या आधारमध्ये(Aadhar Card)  अपडेट ठेवावे लागतील. आधारमध्ये 'POI' आणि 'POA' दस्तऐवज अपडेट करण्यासाठी ऑनलाईन 25 रुपये  शुल्क आकारले जातात. तर, हेच काम ऑफलाईन करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतात.

UIDAI ने सांगितल्यानुसार किती वर्षांनी आधारकार्ड अपडेट करावे लागते?

जर तुम्हाला तुमच्या आधारमध्ये नाव(Name), पत्ता(Address), जन्मतारीख(Birthdate), लिंग(Gender), मोबाईल(Mobile) आणि ईमेल(E-mail) अपडेट करायचा असेल, तर तुम्ही 50 रुपये शुल्क भरून ते अपडेट करून घेऊ शकता. बायोमेट्रिक अपडेटसाठी, तुम्हाला 100 रुपये फी म्हणून द्यावे लागतील. तुम्ही तुमचे नाव आणि पत्ता ऑनलाईन देखील अपडेट करू शकता, मात्र तुम्हाला तुमच्या बायोमेट्रिक अपडेटसाठी जवळच्या आधार केंद्राला भेट द्यावी लागेल. अलीकडेच UIDAI ने दर 10 वर्षांनी आधार कार्ड अपडेट करण्यास सांगितले आहे.

'POI' आणि 'POA' म्हणजे नक्की काय?

'POI' आणि 'POA' ला ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा देखील म्हणतात. ते अपडेट करण्‍यासाठी, तुम्हाला नाव व फोटो असे दोन्ही असलेल्‍या कागदपत्रांची आवश्‍यकता लागेल. जसे की पॅन कार्ड(PAN card), ई-पॅन(e-PAN), रेशन कार्ड(ration card), मतदार ओळखपत्र(Voter ID) आणि ड्रायव्हिंग लायसन्स(Driving license) यांसारख्या कागदपत्रांच्या मदतीने ते अपडेट करता येऊ शकते.

आधारकार्ड धारकाला किती वेळा नाव बदलता येते?

तुमचा पत्ता, पालकांचे नाव, वय यासह अनेक तपशील आधार कार्डमध्ये देण्यात आलेले आहेत. UIDAI ने कोणत्याही आधार कार्ड धारकासाठी नाव बदलण्याची मर्यादा निश्चित केली असून कार्डधारक त्याच्या आधार डेटामध्ये त्याचे नाव आयुष्यात फक्त दोनदाच बदलू शकतो.