Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Aadhaar Enabled Payment System: ‘आधार’ वापरुन पेमेंट करण्याची पद्धत होतोय लोकप्रिय, ऑक्टोबरमध्ये विक्रमी व्यवहार

aadhaar card, aadhaar

Aadhaar Enabled Payment System: देशभरात सर्व प्रकारच्या कामांमध्ये आधार कार्डचा (Aadhar Card) वापर वाढला आहे. परंतु, पैशांच्या व्यवहारात त्याचा वापर जलद गतीने वाढला आहे.बहुतेक व्यवहार फिंगरप्रिंट बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनद्वारे केल्याचे दिसून आले आहे.

देशभरात सर्व प्रकारच्या कामांमध्ये आधार कार्डचा वापर वाढला आहे. परंतु, पैशांच्या व्यवहारात त्याचा वापर जलद गतीने वाढला आहे. UIDAI (Unique Identification Authority of India) नुसार, ऑक्टोबर 2022 मध्ये, आधारद्वारे 175.44 कोटींहून अधिक ऑथेंटिक व्यवहार केले गेले आहेत. यापैकी बहुतेक व्यवहार फिंगरप्रिंट बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनद्वारे केले गेले. त्यानंतर डेमोग्राफिक आणि ओटीपी ऑथेंटिकेशनद्वारे व्यवहार केले गेले.

1100 योजनांमध्ये आधारचा वापर (Use of Aadhaar in 1100 schemes)

देशात केंद्र आणि राज्यांद्वारे चालवल्या जाणार्‍या 1100 हून अधिक कल्याणकारी योजनांमध्ये आधारचा वापर केला जातो. डिजिटल आयडी म्हणून आधारचा वापर करून पारदर्शकता आणि वितरण सुधारणे. UIDAI ने ऑक्टोबर 2022 साठी मासिक वाढ आणि उपलब्धी अहवाल (monthly growth and achievement repot) प्रस्तुत केला आहे, ज्यामध्ये 175.44 कोटींहून अधिक ऑथेंटिक ट्रान्झक्शन्स केले गेले आहेत. तसेच ऑक्टोबर अखेरपर्यंत 12 अंकी डिजिटल आयडी वापरून एकूण 8426 कोटी ऑथेंटिक ट्रान्झक्शन्स पूर्ण झाले आहेत.

पेन्शनधारकांसाठी आधार हा रामबाण उपाय 

फेस ऑथेंटिकेशनद्वारे झालेल्या व्यवहारांची संख्या 37 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. सप्टेंबर २०२२ च्या शेवटच्या महिन्यात हा आकडा ४.६७ लाख होता. UIDAI पेन्शनधारकांना बँक किंवा सामान्य सेवा केंद्रांना भेट न देता त्यांच्या मोबाईल फोनद्वारे घरबसल्या चेहऱ्याचे ऑथेंटिकेशन करून डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तयार करण्याची सुविधा देत आहे. अशाप्रकारे आधार ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुकर करण्यास मदत करत आहे.

आधार ई-केवायसी व्यवहार वाढले (Aadhaar e-KYC Transactions Increased)

UIDAI नुसार, आधार वापरून ऑक्टोबरमध्ये 23.56 कोटी ई-केवायसी व्यवहार केले गेले. त्याच वेळी, ऑक्टोबरमध्ये, भारतभर 23.64 कोटी AEPS (Aadhaar Enabled Payment System) आधारित व्यवहार केले गेले. हा आकडा सप्टेंबरच्या तुलनेत 12.4 टक्के अधिक आहे. त्याच वेळी, ऑक्टोबर 2022 अखेरपर्यंत, AEPS आणि मायक्रो-एटीएमच्या नेटवर्कद्वारे दुर्गम भागात 1573.48 कोटी बँकिंग व्यवहार शक्य झाले आहेत.

जुलै, ऑगस्टमधील आकडेवारी

ऑगस्ट 2022 अखेरपर्यंत आधार ऑथेंटिकेशनची एकूण संख्या 8074.95 कोटी एवढी झाली. तर जुलै महिन्याच्या अखेरीस ही एकूण संख्या 7855.24 कोटी एवढी झाली होती. ऑगस्ट महिन्यात आधारद्वारे झालेल्या ई-केवायसी व्यवहारांची संख्या 23.45 कोटी तर जुलै महिन्यातील एकूण ई-केवायसी व्यवहारांची संख्या 1249.23 कोटी एवढी झाली होती.