Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Aadhar Card : आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुने झाले आहे, अपडेट केल्याशिवाय मिळणार नाही सुविधा!

Aadhar Card

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने म्हटले आहे की ज्या कार्डधारकांचे आधार 10 वर्षांपेक्षा जुने आहे त्यांनी त्यांची माहिती अपडेट करणे खूप महत्वाचे आहे.

तुमचे आधार कार्ड (Aadhar Card) बरेच जुने झाले आहे आणि या दरम्यान काही माहिती अपडेट झाली असल्यास तुम्हाला ते लवकर अपडेट करणे आवश्यक आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने म्हटले आहे की ज्या कार्डधारकांचे आधार 10 वर्षांपेक्षा जुने आहे त्यांनी त्यांची माहिती अपडेट करणे खूप महत्वाचे आहे. दरम्यान, कार्डशी संबंधित कोणतीही माहिती बदलली असल्यास ती डेटाबेसमध्ये अपडेट करणेही आवश्यक आहे.

UIDAI ने सांगितले की तुम्ही तुमचे आधार कार्ड ऑनलाईन देखील अपडेट करू शकता, तर ऑफलाइन अपडेटसाठी तुम्हाला आधार केंद्रावर जावे लागेल. UIDAI म्हणते की डझनभर सरकारी योजनांमध्ये आधारचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीशी संबंधित माहिती अपडेट न केल्यास त्याला अनेक सुविधांचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अशा सर्व कार्डधारकांनी ज्यांचे आधार 10 वर्षांपेक्षा जुने झाले आहे, त्यांनी ते अपडेट करून घेणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अपडेट कसे करावे?

UIDAI नुसार, आधार कार्डधारक myaadhaar पोर्टलला भेट देऊन त्यांची माहिती ऑनलाइन सुधारू शकतात. यासोबतच तुमच्या ओळखीचा पुरावा आणि अॅड्रेस प्रूफशी संबंधित कागदपत्रेही अपलोड करावी लागतील. जर एखाद्या ग्राहकाला त्याची माहिती ऑनलाइन अपडेट करता येत नसेल, तर तो आधार केंद्रावर जाऊन अपडेट मिळवू शकतो. तुमच्या सर्व कागदपत्रांच्या फोटोकॉपीसुद्धा केंद्रावर जमा कराव्या लागतील.

1,100 योजनांमध्ये आधारचा वापर

ज्यांनी गेल्या 10 वर्षांपासून आधार अपडेट केलेले नाहीत, त्यांनी आपली माहिती पुन्हा तपासावी आणि ती अपडेट करून घ्यावी, असे UIDAI ने म्हटले आहे. सध्या सुमारे 1,100 सरकारी योजनांमध्ये आधारचा वापर केला जातो. त्यापैकी 319 योजना केंद्र सरकारकडून चालवल्या जात आहेत. याशिवाय बँका, एनबीएफसीसह सर्व वित्तीय संस्था त्यांच्या ग्राहकांना सुविधा देण्यासाठी आधारचा वापर करत आहेत.

अपडेटसाठी शुल्क आकारले जाईल

UIDAI ने म्हटले आहे की जर एखाद्या ग्राहकाला केंद्रावर जाऊन त्याची आधार माहिती अपडेट करायची असेल तर त्याला शुल्क भरावे लागेल. मात्र, ऑनलाइन अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. आधार केंद्रावरील माहितीची पडताळणी करण्यासाठी फिंगरप्रिंट, फोटो आणि आयरिश स्कॅन करावे लागतील. 10 वर्षांपेक्षा जुने आधार अपडेट करणे आवश्यक झाले आहे.