देशातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओने आपला 4G फोन 'Jio Bharat V2' नुकताच लॉन्च केला आहे. हा फोन भारतभरात केवळ 999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. रिलायन्स जिओने या मोबाईल फोनला ‘जिओ भारत’ असे नाव दिले आहे. हा मोबाईल ग्राहकांना इंटरनेट सुविधा देखील देणार आहे हे विशेष. युजर्सला 4G इंटरनेट सुविधेचा वापर या मोबाईलद्वारे करता येणार आहे.
सामान्य नागरिकांना परवडेल अशा किमतीत हा मोबाईल उपलब्ध करून दिल्यामुळे येत्या काळात याचा वापर ग्रामीण भागात वाढणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सदर मोबाईल फोन केवळ जिओ नेटवर्क समर्थित असणार आहे. याचाच अर्थ दुसऱ्या कुठल्या कंपनीचे सिमकार्ड यात वापरता येणार नाहीये. या मोबाईलसाठी रिलायन्स जिओने एक रिचार्ज प्लॅन देखील जाहीर केलाय.
शेतात काम करणाऱ्या महिलांसाठी हा फोन खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण महिला नेहमी चर्चा करत असतात की, स्मार्टफोन नको पण साधा मोबाईल पाहिजे. त्यांच्यासाठी हा फोन उपयोगात येणार आहे. शेतात काम करतांना महिलांसाठी मनोरंजनाचे साधन म्हणून हा मोबाईल आता जास्त वापरला जाऊ शकतो. हा मोबाइल शेतात काम करणाऱ्या महिलांना का परवडणारा आहे, जाणून घेऊया.
किंमत कमी आणि फीचर्स जास्त असल्याने शेतमजूर महिलांना खरेदी करणे शक्य
Jio Bharat V2 ची किंमत सर्वसाधारण लोकांना परवडणारी आहे. 999 रुपये मनोरंजनासाठी, कामकाजासाठी सहज खर्च करू शकतात. शेतावर गेल्यानंतर अनेक समस्यांचा सामना महिलांना करावा लागतो. अनेक घटना अशा आहेत ज्या मोबाइल नसल्याने कॉनटॅक्ट झाला नाही म्हणून घडल्यात. या सर्व गोष्टींचा विचार करून आता महिलांसाठी हा मोबाइल परवडणारा आणि उपयोगाचा आहे.
इतर रिचार्ज प्लॅन पेक्षा स्वस्त रिचार्ज
अनेक महिला अशा आहेत ज्यांच्याकडे मोबाइल तर आहेत, पण रिचार्ज प्लॅन महाग असल्याने त्या रिचार्ज करत नाही. त्या महिलांसाठी आता कमी पैशात उत्तम फीचर्स असलेला हा फोन अत्यंत उपयोगाचा ठरणार आहे. आता सर्व महिला वेळोवेळी रिचार्ज करून मनोरंजन आणि शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांशी कॉनटॅक्ट करू शकणार आहे.
कंपनीने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या फोनच्या ग्राहकांना 28 दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनसाठी 123 रुपये द्यावे लागतील. या रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना 14GB 4G डेटा देणार आहे. सामान्य इंटरनेट युजर्ससाठी हा डेटा पुरेसा असणार आहे. सध्या ग्रामीण भागात 5जी सेवा पुरवण्यावर सर्व टेलीकम्युनिकेशन कंपन्या लक्ष केंद्रित करत आहेत.
मात्र जो ग्राहकवर्ग अजूनही 2G नेटवर्क वापरत आहेत, अशांना आकर्षित करण्यासाठी जिओने हा प्लॅन आणला आहे. देशभरात सुमारे 25 कोटी ग्राहक अजूनही 2G नेटवर्क सेवा वापरत आहेत. हे सर्व ग्राहक ग्रामीण भागातील आहेत.