Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jio Bharat Mobile Recharge Plan: जिओ भारतचे दोन रिचार्ज प्लॅन सादर; मिळेल अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेटची सुविधा

Jio Bharat Recharge Plan

Image Source : www.businesstoday.in

Jio Bharat Mobile Recharge Plan: नुकताच रिलायन्स जिओने भारतात जिओ भारत व्ही 2 (Jio Bharat V2) हा 4G फोन लॉन्च केला आहे. या फोनसाठी कंपनीने 'जिओ भारत मोबाईल रिचार्ज प्लॅन' काढला आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 123 आणि 1234 रुपयांचे दोन प्लॅन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याबद्दल जाणून घेऊयात.

भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) देशात आपला 4G फोन लॉन्च केला आहे. ज्याचे नाव 'जिओ व्ही 2' (Jio Bharat V2) असे ठेवले आहे. हा फोन भारतभर केवळ 999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या फोनमध्ये वापरकर्त्याला 4G इंटरनेटच्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. याच फोनचा रिचार्ज करण्यासाठी कंपनीने दोन रिचार्ज प्लॅन जाहीर केले आहेत. ज्याची किंमत 123 रुपये आणि 1234 रुपये असणार आहे. या प्लॅनच्या माध्यमातून ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेटचा लाभ घेता येणार आहे. जिओ भारतच्या दोन्ही रिचार्ज प्लॅनचा लाभ केवळ जिओ भारत व्ही 2 (Jio Bharat V2) फोन वापरकर्तेच घेऊ शकतात. इतर वापरकर्ते या सेवेचा लाभ घेऊ शकत नाहीत. जिओ भारतच्या या दोन रिचार्ज प्लॅनबद्दल वापरकर्त्यांना काय काय मिळेल, जाणून घेऊयात.

जिओ भारत 123 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

123 रुपयांच्या या प्लॅनमध्ये वापरकर्त्याला 14GB चा 4G इंटरनेट डेटा उपलब्ध करून दिला जाणार आहे. दररोज 0.5GB इंटरनेट डेटा ग्राहक वापरू शकणार आहेत. तसेच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा (Unlimited Calling Facility) उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवसांची असणार आहे. सध्या इतर टेलीकॉम कंपन्या 179 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सोबत 2GB इंटरनेट डेटा (Internet Data) ऑफर करत आहेत.

सामान्य इंटरनेट युजर्ससाठी हा डेटा पुरेसा असणार आहे. सध्या ग्रामीण भागात 5G सेवा पुरवण्यावर सर्व टेलीकम्युनिकेशन कंपन्या लक्ष केंद्रित करत आहेत. मात्र जो ग्राहकवर्ग अजूनही 2G नेटवर्क वापरत आहेत, अशांना आकर्षित करण्यासाठी जिओने हा प्लॅन आणला आहे. देशभरात सुमारे 25 कोटी ग्राहक अजूनही 2G नेटवर्क सेवा वापरत आहेत. हे सर्व ग्राहक ग्रामीण भागातील आहेत.

जिओ भारत 1234 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओ भारतचा 1234 रुपयांचा हा प्लॅन वार्षिक रिचार्ज प्लॅन आहे. यामध्ये वापरकर्त्याला दररोज 0.5GB इंटरनेट डेटा उपलब्ध करून दिला जाणार आहे. या प्लॅनमध्ये एकूण 128GB इंटरनेट डेटा (Internet Data) मिळणार आहे. सोबत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा (Unlimited Calling Facility) उपलब्ध करून दिली जाणार आहे. या प्लॅनची वैधता 356 दिवसांची असणार आहे. ग्राहकांनी वार्षिक प्लॅन खरेदी केल्यावर त्यांची 242 रुपयांची बचत होणार आहे. 123 रुपयांचे 12 प्लॅन खरेदी केल्यावर ग्राहकांना वर्षाला 1476 रुपये खर्च करावे लागणार आहेत. मात्र 1234 रुपयांमध्ये ग्राहक जिओ भारतचा वार्षिक प्लॅन खरेदी करू शकतात.

Source: navbharattimes.indiatimes.com