Highest Selling Car in Dec 2022: मागील वर्ष(2022) हे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी(Automobile Industry) अगदी भरभरून देणारं ठरलं आहे. या वर्षाच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या कारच्या जबरदस्त विक्रीनंतर, ग्राहकांनी डिसेंबर(December) महिन्यातही वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली आहे. डिसेंबरमध्ये कोणत्या कंपनीची सर्वाधिक वाहने विकली गेली आणि कोणती कंपनी पहिल्या स्थानावर विराजित झाले हे जाणून घेण्यासाठी वाचत राहा.
प्रथम क्रमांकावर मारुती सुझुकी(Maruti Suzuki)
डिसेंबर महिन्यात मारुती सुझुकी(Maruti Suzuki) ही पहिल्या क्रमांकाची कार कंपनी ठरली असून मारुतीने 1,39,347 वाहनांची यशस्वी विक्री केली. मात्र, डिसेंबर 2021 च्या तुलनेत कंपनीच्या विक्रीत 9.91 टक्क्यांची घट झाल्याचे सांगण्यात आले आहे. असे असले तरी, विक्रीच्या बाबतीत मारुतीला कोणीही टक्कर देऊ शकले नाही.
टाटा मोटर्स द्वितीय स्थानावर(Tata Motors)
डिसेंबरमध्ये यावर्षीच्या दुसऱ्या क्रमांकाच्या बाबतीत मोठा बदल बघायला मिळाला आहे. बऱ्याच दिवसांपासून दुसऱ्या क्रमांकावर असलेली ह्युंदाई यावेळी तिसऱ्या क्रमांकावर गेली असून हा दुसरा क्रमांक टाटा मोटर्सने(Tata Motors) पटकावला आहे. डिसेंबर महिन्यात टाटा मोटर्सची देशांतर्गत विक्री एकूण 10 टक्क्यांनी वाढून 72,997 युनिट वर पोहोचली आहे. डिसेंबर महिन्यात टाटा कंपनीने 66,307 वाहनांची विक्री केली असून निर्यातीसह इलेक्ट्रिक वाहनांची(Electric Vehicle) विक्री 3,868 युनिट्स इतकी होती, जी डिसेंबर 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 2,355 इलेक्ट्रिक वाहनांच्या तुलनेत 64.2 टक्क्यांनी वाढली आहे.
तृतीय स्थानावर ह्युंदाई मोटर्स(Hyundai Motors)
यावेळी दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर ह्युंदाई - Hyundai Motor India Limited (HMIL) पोहचले आहेत. डिसेंबर महिन्यात कंपनीची विक्री 18.2 टक्क्यांनी वाढून 57,852 युनिटवर पोहोचली असून डिसेंबर 2021 मध्ये कंपनीने 48,933 वाहनांची विक्री केली होती. 2022 मध्ये, Hyundai ने 5,52,511 युनिट्स एवढी आतापर्यंतची सर्वाधिक देशांतर्गत विकली आहेत.