Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hero Winter Carnival offer: शोरूममधून फक्त 7,777 रुपयांमध्ये कोणतेही वाहन घ्या, किंमतही झाल्या कमी!

Hero Offer

Hero Winter Carnival offer: Hero Moto Corp ने आपली नवीन वर्षाच्या सुरुवातीला आणि जुन्या वर्षाच्या अखेरीस ग्राहकांसाठी खास ऑफर जाहीर केली आहे. ही ऑफर 31डिसेंबर 2022 पर्यंत मर्यादित असणार आहे.

Hero Winter Carnival offer: वर्षां अखेरीस  सर्व मोटर कंपन्या 2022 मॉडेलची उत्पादने काढून टाकण्यासाठी काही ना काही ऑफर देऊन ग्राहकांना आकर्षित करत आहेत. अशाच प्रकारे  दुचाकी उत्पादक कंपन्यांमध्ये सामील असलेल्या Hero Moto Corp ने आपली नवीन वर्ष सुरुवातीस आणि जुन्या वर्षंच्या अखेरीस खास ऑफर जाहीर केली असून 31डिसेंबर 2022 पर्यंत ही ऑफर असणार आहे.

ऑफर काय आहे?

या ऑफरनुसार, तुम्हाला तुमची जुनी दुचाकी एक्सचेंज  केल्यावर ₹6000 पर्यंतचे फायदे दिले जातील, ज्यामध्ये ₹3000 चा रोख बोनस आणि ₹3000 चा एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे. याशिवाय या ऑफरच्या माध्यमातून तुम्ही तुमची कोणतीही जुनी दुचाकी कंपनीला विकू शकता आणि त्याचे पैसे पुढील वाहन खरेदीसाठी अॅडव्हान्स म्हणून वापरू शकता.

नवीन गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक उत्तम ऑफर

जर तुम्हाला हिरोच्या शोरूममधून अगदी नवीन वाहन घ्यायचे असेल, तर तुमच्यासाठी एक चांगली ऑफर आहे, ज्याच्या आधारावर तुम्हाला कोणत्याही व्याजाशिवाय केवळ वाहनाची किंमत मोजावी लागेल.
तुम्ही तुमचे वाहन खरेदी करण्यासाठी Hero MotoCorp कडून कर्ज घेऊ शकता आणि त्यावर नो कॉस्ट EMI निवडू शकता, ज्याद्वारे तुम्ही येणार्‍या वेळेसाठी कोणतेही अतिरिक्त व्याज न देता तुमचे वाहन घेऊ शकता.
यासोबत Hero MotoCorp ने प्रत्येक वाहन खरेदीसाठी SBI कार्डवर 5% अतिरिक्त कॅशबॅक उपलब्ध करून दिला आहे. यामुळे तुमच्या एकूण खरेदीमध्ये ५% सूट जोडली जाईल.
कमी डाउन पेमेंट ऑफरची सुरुवात फक्त 7,777 रुपये इतकी असून Hero MotoCorp शोरूममधून कोणतेही वाहन घेऊ शकता.