विवो (Vivo) आपल्या नवीन सिरीजवर काम करत आहे, ज्याचे नाव Vivo S16 आहे. या मालिकेतील तीन स्मार्टफोन 22 डिसेंबर रोजी लॉन्च होणार आहेत. त्यांची नावे Vivo S16 Pro, Vivo S16 आणि S16e असतील. आतापर्यंत या स्मार्टफोन्सबाबत अनेक माहिती समोर आली आहे. तिन्ही मोबाईलमध्ये मोठ्या स्क्रीनचा वापर केला जाणार असून मागील पॅनलवर आकर्षक कॅमेरा बंप दिला जाऊ शकतो. ही आगामी सिरीज Vivo S15 सिरीजचा अपग्रेड प्रकार असेल. या तिन्ही स्मार्टफोन्सची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
Table of contents [Show]
Vivo S16 Pro ची वैशिष्ट्यं
Vivo S16 Pro बाबत आतापर्यंत अनेक लीक आणि रेंडर समोर आले आहेत. त्यात कर्व्ड एज AMOLED डिस्प्ले आणि फिंगरप्रिंट स्कॅनर मिळण्याची शक्यता आहे. लीक झालेल्या रिपोर्टनुसार, यात बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि एलईडी फ्लॅशलाइट वापरण्यात येणार आहे. हे स्क्वेअर शेपच्या मॉड्यूलमध्ये वापरले जाईल. एका ऑनलाइन रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की कॅमेरा बंपमध्ये ग्लॉसी सरफेस दिसू शकतो. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सल्सचा असू शकतो. यासोबतच यामध्ये फास्ट चार्जरही दिला जाऊ शकतो.
Vivo S16 ची संभाव्य वैशिष्ट्ये
Vivo S16 च्या लीक स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर त्यात 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. हा मोबाईल स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसरसह येईल. यामध्ये 12 GB पर्यंत रॅम आणि 512 GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज दिले जाऊ शकते.
Vivo S16 चा संभाव्य कॅमेरा सेटअप
Vivo S16 मध्ये 50-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. यामध्ये 64-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स बॅक पॅनलवर दिला जाऊ शकतो. यात 4,600mAh बॅटरीसह 66W चा फास्ट चार्जर मिळेल.
Vivo S16e ची वैशिष्ट्यं
Vivo च्या या आगामी स्मार्टफोनमध्ये 6.62-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो फुल एचडी प्लस रिझोल्यूशनला सपोर्ट करेल. लीक्स रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की हा फोन Exynos 1080 चिपसेट सह लॉन्च केला जाईल. यामध्ये 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज असेल. तसेच, 66W रॅपिड चार्जर 4,600mAh बॅटरीसह उपलब्ध असेल. हे स्मार्टफोन्स चीनमध्ये या महिन्यात लॉन्च केले जाऊ शकतात.