Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

GST on Ethanol : इथेनॉलवरील ‘जीएसटी’मध्ये किती घट करण्यात आलेय ते घ्या जाणून

GST on Ethanol

वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेची 48 वी बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत 3 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये इथेनॉलवरील ‘जीएसटी’मध्ये (GST on Ethanol) देखील मोठी घट करण्यात आली आहे. यात किती फरक पडणार आहे ते जाणून घेऊया.

GST on Ethanol : इथेनॉलवरील ‘जीएसटी’मध्ये किती घट करण्यात आलेय ते घ्या जाणून 

वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेची 48 वी बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत 3 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये इथेनॉलवरील ‘जीएसटी’मध्ये (GST on Ethanol) देखील मोठी घट करण्यात आली आहे. यात किती फरक पडणार आहे ते जाणून घेऊया.

 Ethanol GST आता इतका असेल 

जैव इंधनयुक्त पेट्रोलमध्ये मिश्रण होणाऱ्या इथेनॉलवरील वस्तू व सेवा कर (GST) 18  टक्के इतका होता. तो आता थेट ५ टक्क्यांपर्यंत  आणण्यात आला आहे. या निर्णयामुळे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करणाऱ्या शुद्धीकरण कारखान्यांना मदत होणार आहे. त्यांचे  आयात कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी होऊन विदेशी चलनाची बचत होणार आहे.  वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या शनिवारी पार पडलेल्या ४८ व्या बैठकीत आणखीही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

 GST परिषदेत झालेले अन्य निर्णय 

वस्तू आणि सेवाकराशी (GST) संबंधित हेतुपुरस्सर केल्या जाणाऱ्या चुका आणि ठराविक अनियमितता यांना गुन्हेगारी स्वरूपाचे ठरवण्याचे यावेळी मान्य करण्यात आले आहे. वस्तू व सेवा कर कायद्याच्या अनुपालनातील अनियमिततेसाठी खटला चालवण्याची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे. ती 2 कोटी रुपये करण्यात आलेली आहे. मात्र बनावट बीजकांसाठी असलेली 1 कोटी रुपयांची मर्यादा कायम ठेवण्यात आलेली आहे. याचबरोबर स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्स अर्थात एसयूव्ही वाहनांच्या वर्गीकरणाबाबत परिषदेने भूमिका यावेळी स्पष्ट केली. एसयूव्ही श्रेणीतील वाहनांवर लागू होणारा 22 टक्के उपकर निश्चित करण्यासाठी  वाहनांची व्याख्या निश्चित करण्यात आलेली आहे. ज्या वाहनाचा उल्लेख एसयूव्ही म्हणून केला आहे,  इंजिन क्षमता 1500 सीसीपेक्षा अधिक, लांबी 4 हजार मिमीपेक्षा जास्त आणि जिचा ग्राउंड क्लीयरन्स 170  मिमी आणि त्याहून अधिक आहे, अशा अटी पूर्ण करणाऱ्या वाहनांवर २२ टक्के उपकराचा उच्च दर लागू होतो.